Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yemen Conflict : मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! हुथींवर मोठ्या लष्करी कारवाईची तयारी; सौदीची 1 लाख सैनिकांसह आक्रमक रणनीती

Yemen Conflict : होर्मुझ आणि बाब-अल-मंदेब संकटाच्या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियाने १,००,००० येमेनी सैनिक आणि हवाई हल्ल्यांच्या साहाय्याने हुथींविरुद्ध मोठ्या लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 03, 2026 | 01:20 PM
Saudi Arabia Houthi attack plan 2026 Pakistan troops in Saudi Arabia

Saudi Arabia Houthi attack plan 2026 Pakistan troops in Saudi Arabia

Follow Us
Follow Us:
  • लष्करी कारवाईची मोठी योजना
  • पाकिस्तानाची ४०,००० सैनिकांची तैनाती
  • अमेरिकेचे गुप्तचर व हवाई संरक्षण साहाय्य

पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. इराण युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर आणि येमेनमधील हुथी बंडखोरांनी रेड सी (तांबडा समुद्र) जोडणाऱ्या बाब अल-मंदेब सामुद्रधुनीवर ताबा मिळवल्यानंतर जागतिक तेल पुरवठा आणि सागरी व्यापारापुढील संकट प्रचंड गडद झाले आहे. या सागरी नाकेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर आणि मालवाहतुकीचा खर्च अनियंत्रितपणे वाढत आहे. हे आंतरराष्ट्रीय संकट मोडून काढण्यासाठी सौदी अरेबियाने हुथींविरुद्ध व्यापक आणि निर्णायक लष्करी कारवाई करण्याची आखणी केली आहे. (Yemen Conflict )

रॉयटर्सच्या विशेष अहवालानुसार, रियाध (सौदी अरेबिया) यावेळी स्वतःचे सैन्य थेट जमिनीवरील लढाईत उतरवण्याऐवजी सौदी-समर्थित १,००,००० हून अधिक येमेनी सैनिकांना आघाडीवर ठेवणार आहे. या जमिनीवरील मोहिमेला सौदी हवाई दलाकडून प्रचंड हवाई हल्ल्यांचे (Airstrikes) आणि रसद पुरवठ्याचे मजबूत कवच दिले जाईल. येत्या काही आठवड्यांत किनारपट्टीच्या मोक्याच्या जागांवर, तसेच अल-बायदा, मारिब, तैझ आणि अल-जॉफ यांसारख्या मुख्य आघाड्यांवर हे चौफेर आक्रमण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बाब अल-मंदेब आणि होर्मुझ सामुद्रधुनीचे सामरिक महत्त्व

जागतिक व्यापाराच्या दृष्टीने तांबड्या समुद्राचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार मानले जाणारे ‘बाब अल-मंदेब’ हे आशिया आणि युरोपदरम्यानच्या सागरी वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे. इराणमधील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी विस्कळीत झाल्यानंतर या मार्गाचे महत्त्व कैक पटीने वाढले आहे. सौदी अरेबियाच्या विश्लेषकांच्या मते, जर हुथींनी बाब अल-मंदेबवर आपले नियंत्रण कायम ठेवले, तर ते आंतरराष्ट्रीय समुदायावर दबाव टाकण्यासाठी याचा गैरवापर करतील. त्यामुळे भविष्यात हुथींसोबत कोणत्याही शांतता वाटाघाटी करणे अशक्य होईल. म्हणूनच या सागरी मार्गावरून हुथींची पकड सैल करणे ही सौदी आणि आंतरराष्ट्रीय मित्रांची प्राथमिक गरज बनली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Visa Policy 2026 : अमेरिकेचा व्हिसा हवाय? तर सोशल मीडिया प्रोफाइल ठेवावे लागणार ‘पब्लिक’; ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश

पाकिस्तानची सौदीत ४०,००० सैनिकांची मोठी तैनाती

या संपूर्ण लष्करी रणनीतीमध्ये पाकिस्तानची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक मानली जात आहे. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की यांच्यात झालेल्या संयुक्त संरक्षण करारांतर्गत पाकिस्तानने सौदी अरेबियात तब्बल ३०,००० ते ४०,००० सैनिकांची तुकडी तैनात केली आहे. या पाकिस्तानी सैनिकांवर सौदी अरेबियाच्या सीमांचे रक्षण करणे, तसेच हुथींकडून होणाऱ्या संभाव्य ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून सौदीच्या तेल पायाभूत सुविधांना (Oil Infrastructure) सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

याशिवाय, पाकिस्तानने गेल्या महिन्यात येमेनमधील एडन येथे हवाई संरक्षण प्रणाली, तोफखाना, ड्रोन आणि ड्रोनविरोधी यंत्रणांनी भरलेली चार मालवाहू विमाने पाठवली आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनर असिम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली ही लष्करी भागीदारी अधिक मजबूत झाली असल्याचे मानले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Flydubai Flight 1073 : ‘मला जिवंत सोडू नका!’ प्रवाशांनी पकडल्यानंतर ओमानच्या वैमानिकाची मृत्यूची याचना

अमेरिकेचे गुप्तचर साहाय्य आणि सौदीसमोरील आव्हाने

अमेरिकेनेही या मोहिमेत सौदी अरेबियाला पाठिंबा दिला आहे. अमेरिकन प्रशासनाने सौदी आणि कतारच्या सुरक्षेसाठी पॅट्रियट हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केली असून उपग्रहांद्वारे मिळणारी गुप्त माहिती आणि हुथींच्या तळांची अचूक माहिती सौदी सैन्याला पुरवली जात आहे. मात्र, या मोहिमेची नेमकी वेळ आणि अमेरिकेच्या थेट सहभागाबाबत वॉशिंग्टनमध्ये अजूनही धोरणात्मक चर्चा सुरू आहे.

तरीही सौदी अरेबियासमोर मोठी आव्हाने उभी आहेत. येमेनमध्ये हुथींविरोधात लढणारे स्थानिक गट आपापसात विभागलेले आहेत. संयुक्त अरब अमिराती (UAE) समर्थित गट आणि सौदी-समर्थित गट यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळे मोहिमेत अडचणी येण्याची शक्यता आहे. तसेच हुथी बंडखोर डोंगराळ भागात गनिमी काव्याने (Guerrilla Warfare) लढण्यात पटाईत असल्याने ही लढाई दीर्घ आणि आव्हानात्मक ठरू शकते.

Web Title: Saudi arabia houthi attack plan pakistan troops deployment 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Saudi Arabia
  • yemen

संबंधित बातम्या

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
1

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य

FlyDubai Attack : कॅप्टन स्मितच्या साहसाचे जगभरातून कौतुक, वाचवले शेकडो प्रवासाचे प्राण
2

FlyDubai Attack : कॅप्टन स्मितच्या साहसाचे जगभरातून कौतुक, वाचवले शेकडो प्रवासाचे प्राण

PTI Long March: 4 ऑक्टोबरला पाकिस्तानात मोठ्या गृहयुद्धाचा इशारा; इम्रान खान यांचा पक्ष अन् शहबाज सरकार आमनेसामने
3

PTI Long March: 4 ऑक्टोबरला पाकिस्तानात मोठ्या गृहयुद्धाचा इशारा; इम्रान खान यांचा पक्ष अन् शहबाज सरकार आमनेसामने

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी
4

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.