Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan : इम्रान खाननंतर आता बिलावल भुट्टो यांचा काटा काढणार: पाकिस्तानात मुनीर-नक्वी यांची काय आहे कुटील योजना?

Pakistan News: असिम मुनीर आणि मोहसिन नक्वी हे बिलावलला राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी सिंधचे विभाजन करण्याची योजना आखली आहे. बिलावलने कराचीच्या रस्त्यांवर रक्तपात होण्याचा इशारा दिला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 18, 2026 | 01:48 PM
Bilawal Bhutto Sindh Division Warning Asim Munir Mohsin Naqvi Plan

Bilawal Bhutto Sindh Division Warning Asim Munir Mohsin Naqvi Plan

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या राजकारणात नवा भूकंप
  • सिंध प्रांताच्या विभाजनाचा डाव
  • बिलावल भुट्टो यांचा थेट इशारा

पाकिस्तानचे (Pakistan News) राजकारण आणि तिथली सत्तासमीकरणे कधी कोणावर उलटतील, याचा नेम नाही. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात डांबून त्यांचा पक्ष खिळखिळा केल्यानंतर, आता पाकिस्तानचे सत्ताधारी आणि लष्करी आस्थापनाने आपला मोर्चा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांच्याकडे वळवला आहे. विशेष म्हणजे, बिलावल भुट्टो यांचा पक्ष सध्या केंद्रातील शहबाज शरीफ सरकारला बाहेरून पाठिंबा देत असतानाही, पडद्यामागे त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याची मोठी तयारी सुरू झाली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि त्यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे केंद्रीय गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी मिळून बिलावल यांना शह देण्यासाठी एक खतरनाक व्यूहरचना आखली आहे.

मंगळवारी, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी कराची प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना बिलावल भुट्टो यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट कराची आणि हैदराबादच्या रस्त्यांवर रक्तपात होण्याचा जाहीर इशारा दिला. बिलावल यांच्या या आक्रमक पवित्र्यामागे मोहसिन नक्वी यांचा एक वादग्रस्त प्रस्ताव आहे. पाकिस्तानी माध्यमांतील आणि ‘डॉन’च्या वृत्तांनुसार, पाकिस्तान सरकार देशातील सध्याच्या चार मोठ्या प्रांतांची पुनर्रचना करून नवीन छोटे प्रांत बनवण्याच्या तयारीत आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंध आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांतांचे विभाजन करण्याचा आणि त्यासाठी जनतेचे सार्वमत (Referendum) घेण्याचा प्रस्ताव पुढे आणला जात आहे.

बिलावल भुट्टो यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याची मुनीर-नक्वी यांची नेमकी योजना काय?

पाकिस्तानच्या राजकारणात लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि गृहमंत्री मोहसिन नक्वी यांची जोडी अत्यंत शक्तिशाली मानली जाते. सध्या बिलावल भुट्टो हे सरकारचे मित्रपक्ष असले तरी, भविष्यात ते लष्कर आणि सत्ताधारी आघाडीसाठी मोठे आव्हान ठरू शकतात, याची जाणीव मुनीर आणि नक्वी यांना आहे. त्यामुळेच बिलावल यांचे राजकीय पंख छाटण्यासाठी त्यांच्या बालेकिल्ल्यावरच घाव घालण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या रणनीतीचा मुख्य भाग म्हणजे सिंध प्रांताचे दोन भागांत विभाजन करणे.

गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानमधील काही गटांकडून प्रशासकीय सोयीचे कारण देत सिंधचे विभाजन करण्याची मागणी होत आहे. आता मोहसिन नक्वी यांनी या जुन्या मागणीला हवा देत सार्वमताचा प्रस्ताव मांडला आहे. सिंध हा पारंपरिकरीत्या भुट्टो कुटुंबाचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो. अत्यंत कठीण आणि प्रतिकूल राजकीय परिस्थितीतही सिंधमधील जनतेने नेहमीच भुट्टो कुटुंबाला आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीला साथ दिली आहे. आजही सिंध प्रांतात पीपीपीचेच सरकार सत्तेत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi: मनिलामध्ये मोदींची अनोखी ‘गिफ्ट डिप्लोमसी’; अमेरिकेपासून जपानपर्यंत जागतिक नेत्यांना दिल्या अनोख्या भेटवस्तू

दुसरीकडे, सिंध प्रांताची राजधानी असलेले कराची हे शहर पाकिस्तानची आर्थिक राजधानी असून, देशाच्या महसुलात या शहराचा सर्वात मोठा वाटा आहे. याशिवाय कराचीमध्ये पाकिस्तानचे एक अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे लष्करी तळही आहे. जर मुनीर आणि नक्वी हे सिंध प्रांताचे विभाजन करून कराची किंवा शहरी भाग वेगळा करण्यात यशस्वी झाले, तर तो भुट्टो कुटुंबाच्या राजकारणासाठी सर्वात मोठा धक्का असेल. असे झाल्यास भुट्टो कुटुंबाचे संपूर्ण सिंधवरील नियंत्रण संपुष्टात येईल आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय राजकारणात त्यांचा प्रभाव जवळपास संपुष्टात येईल.

बिलावल भुट्टो यांचा सरकारवर हल्लाबोल आणि रक्तपाताची धमकी

सरकारच्या या गुप्त हालचालींची कुणकुण लागताच बिलावल भुट्टो यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्यावर जोरदार टीका केली. बिलावल म्हणाले की, “प्रांत विभाजनासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर सरकारने सर्व राजकीय पक्षांशी सखोल चर्चा केली पाहिजे आणि घटनात्मक व लोकशाही मार्गाचा अवलंब केला पाहिजे. परंतु, आमच्याशी कोणतीही चर्चा न करता बंद दाराआड निर्णय घेतले जात आहेत. जर जबरदस्तीने किंवा घटनाबाह्य मार्गाने सिंधचे विभाजन करण्याचा प्रयत्न झाला, तर कराची आणि हैदराबादच्या रस्त्यांवर रक्ताचे पाट वाहतील.”

बिलावल यांनी सार्वमताचा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला असून, हा घटनेला बगल देण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर, त्यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही निशाणा साधला. “जर पंतप्रधान आपल्याच मंत्र्यांवर नियंत्रण ठेवू शकत नसतील, तर देशाची संपूर्ण व्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर आहे,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेत बिलावल यांनी तुरुंगात असलेले इम्रान खान यांना ‘राजकीय कैदी’ संबोधत पाकिस्तानमधील राजकीय सूडबुद्धीच्या राजकारणावरही बोट ठेवले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Microsoft Outage: अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलच्या सेवा का बंद पडल्या? ‘ती’ 3 प्रमुख कारणे आली समोर

पाकिस्तान सरकारची प्रतिक्रिया आणि वाढता राजकीय तणाव

बिलावल भुट्टो यांच्या या अत्यंत तीव्र आणि रक्तरंजित इशाऱ्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या पीपीपीच्या अध्यक्षांनीच थेट रक्तपाताची भाषा केल्याने शहबाज शरीफ सरकार बॅकफूटवर गेले आहे. यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे माहिती मंत्री अता तरार (Attaullah Tarar) यांनी बिलावल यांचे हे विधान अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. नवीन प्रशासकीय प्रांत निर्माण करण्याबाबत जनतेचे मत जाणून घेण्यासाठी सार्वमत हा सर्वात लोकशाही मार्ग आहे, असे समर्थन करत तरार यांनी दंगली किंवा रक्तपाताची भाषा करणाऱ्यांवर टीका केली.

एकंदरीत, पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकट, महागाई आणि दहशतवादाशी झुंजत असतानाच आता देशांतर्गत राजकारणात नवा संघर्ष पेटला आहे. लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि मोहसिन नक्वी यांची ही चाल बिलावल भुट्टो यांना नमवणार की पाकिस्तानमध्ये आणखी एका मोठ्या गृहयुद्धाची ठिणगी टाकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बिलावल भुट्टो यांनी कराचीच्या रस्त्यांवर रक्तपात होण्याचा इशारा का दिला आहे?

    Ans: पाकिस्तान सरकारने सार्वमताच्या आधारे सिंध प्रांताचे विभाजन करण्याचा प्रस्ताव मांडल्याने बिलावल भुट्टो संतापले असून, जबरदस्तीने सिंधचे तुकडे केल्यास कराची आणि हैदराबादमध्ये रक्तपात होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

  • Que: बिलावल भुट्टो यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याची योजना कोणी आखली आहे?

    Ans: पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि केंद्रीय गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी बिलावल भुट्टो यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंध प्रांताचे विभाजन करून त्यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याची योजना आखल्याचे बोलले जात आहे.

  • Que: सिंध प्रांताचे विभाजन झाल्यास बिलावल भुट्टो यांच्या पक्षावर काय परिणाम होईल?

    Ans: सिंध हा भुट्टो कुटुंबाचा आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचा (PPP) पारंपरिक बालेकिल्ला आहे; प्रांताचे विभाजन झाल्यास भुट्टो कुटुंब कराची आणि सिंधवरील नियंत्रण गमावेल आणि त्यांचा राजकीय प्रभाव संपुष्टात येईल.

Web Title: Bilawal bhutto warns bloodshed karachi sindh division hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Pakistan News
  • Pakistan Politics

संबंधित बातम्या

Pakistan: लाईक्स आणि व्ह्यूजचे खूळ जीवावर बेतले; पाकिस्तानात टिकटॉक व्हिडिओ शूट करताना सिंहिणीने घेतला 19 वर्षीय तरुणाचा जीव
1

Pakistan: लाईक्स आणि व्ह्यूजचे खूळ जीवावर बेतले; पाकिस्तानात टिकटॉक व्हिडिओ शूट करताना सिंहिणीने घेतला 19 वर्षीय तरुणाचा जीव

Pakistan News : इम्रान खान यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा; दोन बहिणींची तुरुंगातून सुटका, तिसरी बहीण अजूनही कैदेत!
2

Pakistan News : इम्रान खान यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा; दोन बहिणींची तुरुंगातून सुटका, तिसरी बहीण अजूनही कैदेत!

India-Pakistan Trade News : व्यापार बंदी असतानाही पाकिस्तानने भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलरच्या वस्तू केल्या खरेदी
3

India-Pakistan Trade News : व्यापार बंदी असतानाही पाकिस्तानने भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलरच्या वस्तू केल्या खरेदी

Trump News : अमेरिकेत नवा वाद; ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो व्यवसायाचे पाकिस्तान कनेक्शन; चौकशीची मागणी सुरु
4

Trump News : अमेरिकेत नवा वाद; ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो व्यवसायाचे पाकिस्तान कनेक्शन; चौकशीची मागणी सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.