Saudi Arabia introduces AI robot guide for Hajj pilgrims
रियाध: हज यात्रा ही मुस्लिम धर्मीयांसाठी एक अत्यंत पवित्र आणि अध्यात्मिक अनुभव असतो. यासाठी जगभरातीन लाखो प्रवासी सौदी अरेबियाच्या मक्का मशीदीला येतात. अशा परिस्थितीत या ठिकाणी धार्मिक विधी, मार्गदर्शन आणि अनेक सोयीसुविधांची गरज असते. याचे अयोजन सौदी अरेबियाच्या प्रशासनाकजून केले जाते. यावेळी हज यात्रेकरुंसाठी सर्व सोयीचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु यामध्ये हज यात्रेकरुंना आणखी एक विलक्षण अनुभव अनुभवायला मिळणार आहे. यासाठी सुलभ आणि तांत्रिकदृष्ट्या सौदी अरेबियाने एक अनेखो पाऊल उचलले आहे.
सौदी अरेबियाच्या प्रेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीत मक्केच्या पवित्र मशीदित मनारत-अल-हरमैन नावाचा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)आधारित रोबोत ठेवला आहे. हा रोबोट हज यात्रेसाठी आलेल्या प्रवाशांचे इस्लामी मार्गदर्शन, धार्मिक शंका निरसन आणि आवश्यक माहिती देण्यासाठी मदत करणार आहे. यात्रेकरुंच्या प्रत्येक धार्मिक प्रश्नांचे उत्तर देण्यास या रोबोटची मदत होणार आहे.
हा रोबोट ग्रॅंड मशीद आणि मदीना येथील मशिद-ए-नबवीसाठी धार्मिक व्यवहार पाहण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सध्या या रोबोटचे अपडेट व्हर्जन वापरण्यात येत आहे. या रोबोटमध्ये इस्लामिक स्थापत्य शास्त्रावर आधारित माहिती आहे. परंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या संगम याचे एक उत्तम उदाहरण आहे.
सौदी अरेबियाचा हा प्रकल्प व्हिजन २०३० च्या दीर्घकाली योजनेचा भाग आहे. यामध्ये पर्यटन, अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण केले जात आहे. यामुळे हज यात्रेचा अनुभवल लोकांसाठी अधिक सुरक्षित सोयीस्कर बनवण्याचा सौदी अरेबियाचा हा प्रयत्न आहे. यंदा हज यात्रा ४ जून ते ९ जून दरम्यान होणार आहे. यासाठी यात्रेकरुंचे आगमन सुरु झाले आहे. सौदी अरेबियाच्या या प्रकल्पाकून श्रद्धा आणि नवोपक्रमचे एकत्रीकरण पाहायला मिळणार आहे. यामध्ये आध्यात्मिक प्रवासाही जोडला गेला आहे.