आता ऑर्डरशिवायही मिळणार जेवण... ; AI शहरात घडणार चमत्कारिक अन् आश्चर्यकारक गोष्टी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अबू धाबी: अलीकडे जगभरात नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीन अनेक गोष्टींमध्ये मोठे आणि अद्भुत असे बदल होत आहे. पूर्वी मानवाला अन्न, वस्त्र निवाऱ्यासाठीही धडपड करावी लागत होती. परंतु आता सर्व गोष्टी मानवाला सहज आणि काही वेळातच उपल्बध होत आहेत. तसेच अलीकडे AI च्या मदतीने देखील अनेक देश विकसित होत चालले आहे. AI रोबोट, AI कार अशा अनेक गोष्टी अस्तित्वात येत आहेत, ज्याची मानवाने कल्पनाही केली नसेल. आता विचार करा जर एखादे शहर पूर्णत: AI द्वारे चालवण्यात आले तर. जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट AI च्या मदतीने केली जाईल.
आश्चर्य वाटले ना? तर संयुक्त अरब अमिराती (UAE)ने AI शहर उभारणार असल्याची घोषणा केली आहे. यूएईने राजधानी अबू धाबीला AI शहरात बदलण्याची तयारी केली आहे. २०२७ पर्यंत अबू धाबीमधील प्रत्येक सरकारी आणि खाजगी सेवा आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून चालवली जाणार असल्याचे म्हटले आहे.
यासाठी यूएई सरकाने Aion Sentia नावाने एक प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पासाठी २.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. हा प्रकल्प इटालियन कंपनी सिनॅप्सिया आणि यूएईच्या बोल्ड टेक्नॉलॉजीज अंतर्गत तयार केला जाणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यावर असताना यूएईला भेट दिली होती. यावेळी यूएीने जगातील सर्वात मोठे AI कॅम्पस बांधण्याच्या प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला ट्रम्प यांनी मंजपर दिली. अमेरिका आणि यूएईमध्ये यावर करार करण्यात आला असून याअंतर्गत अमेरिका यूएईला तांत्रिक गोष्टींमध्ये मदत पुरवणार आहे. यूएईला हे तंत्रज्ञान चीनच्या हाती लागले याची भीती होती, परंतु अमेरिका आणि यूएईमध्ये झालेल्या कराराने अबू धाबीच्या एआय प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरु यशस्वी झाला आहे.
यूएईने Aion Sentia नावाने हा प्रकल्प सुरु केला आहे. याअंतर्गत अबू धाबीमधील प्रत्येक सुविधा AI द्वारे चालवली जाणार आहे. यामध्ये वाहतूक सेवा, सार्वजनिक घरे, रस्त्यावरील लाईटचे खांब आणि स्मार्ट घरे, तसेच आरोग्य सेवांचाही समावेश आहे. यूएईची ही संपूर्ण प्रणाली MAIA नावाच्या प्रगत AI इंजिनद्वारे चालवली जाणार आहे. MAIA मुळे भविष्यातील गरजांचा अंदाज घेता येईल आणि नवे AI शहर तयार करता येईल असे यूएईने म्हटले आहे.
गेल्या बऱ्याच काळापासून यूएई AIला त्यांच्या राष्ट्रीय धोरणाचा भाग बनवण्याच्या प्रयत्ना होते. यूएईचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेख तहनौन बिन झायेद अल नाह्यान यांनी स्वत: AI क्षेत्रात परकीय गुंतवणूकीलाही प्रोत्साहन दिले आहे. यामध्ये सौदी अरेबियाने देखील AI-व्यवस्थापन बनवण्यावर इच्छा व्यक्क केली आहे.
एकीकडे यूएईच्या या प्रकल्पाचे कौतुक केले जात आहे. याकडे एक सकारात्मर दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. परंतु दुसरीकडे याचे काही तोटोही असल्याचे अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, AI मुळे मानसाचे जीवन सहज आणि सोपे होईल पण यामुळे भविष्यात अनेक मोठ्या समस्या उत्पन्न होण्याची शक्यता आहे.