जेरुसेलम: मध्य पूर्वेत इस्रायल आणि हुथी बंडखोरांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. हुथी बंडखोरांनी पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला केला आहे. परंतु इस्रायलने हुथींचे हल्ले हवेतच हाणून पाडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २५ मे रोजी हुथी बंडखोरांनी इस्रायलवर हल्ला केला होता, पण इस्रायच्या डिफेंस सिस्टीमने सर्व हल्ले उद्ध्वस्त केले आहे.
यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलच्या संरक्षण व्यवस्थेचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमची संरक्षण प्रणाली सतत अर्लट मोडवर असते. आमच्या संरक्षण प्रणालीच्या तांत्रिक क्षमतेला कोणीही टक्कर देऊ शकत नाही. इस्रायलच्या डिफेंस सिस्टीमने येमेनच्या हुथी बंडखोरांनी डागलेले क्षेपणास्त्र यशस्वीरित्या हवेतच पाडले आहे.
या हल्ल्यात इस्रायलचे कोणतेही नुकसान झाललेला नाही. परंतु इराण समर्थित हुथी बंडखोर इस्रायलवर सतत हल्ले करत आहे. काही दिवसांपूर्वीच हुथी बंडखोरांनी इस्रायलची राजधानी जेरुसेलमवर हल्ला केला होता, तर या हल्ल्याच्या काही दिवस आधी इस्रायलचे प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला होता.
इस्रायलच्या गाझातील हमासविरोधी कारवायांच्या निषेधार्थ हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजांना लक्ष्य केले आहे. हुथींनी इस्रायलला गाझातील कारवाया थांबवण्याची चिथावणी दिली आहे. परंतु इस्रायलने हुथींच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षेशी संबंधी कोणतीही तडजोड करणार नाही असे म्हटले आहे. इस्रायलची आयर्न डोम संरक्षण प्रणाली आणि हावई संरक्षण यंत्रणेने वारंवार आपली ताकद सिद्ध केली आहे. यावेळी इस्रायलच्या संरक्षण दलाने हुथींचे क्षेपणास्त्र हवेतच उद्ध्दवस्त करुन आपली ताकद दाखवून दिली असल्याचे नेतन्याहूंनी म्हटले आहे.
दुसरीकडे अमेरिकेने देखील हुथींविरोधात कारवाई सुरु केली आहे. तसेच ट्रम्प यांनी या महिन्याच्या सुरुवातील हुथींना बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली होती. पण तरीही हुथी बंडखोर सातत्याने इस्रायलवर हल्ले करत आहे. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सर्व हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर मिळेल अशी धमकी हुथींना दिली आहे.
याशिवाय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला देखील धमकी दिली आहे. नेतन्याहूंनी इराणला हुथीं दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबवण्यास सांगितले आहे. असे न केल्यास इराणच्या अणु तळांवर हल्लाची धमकी नेतन्याहूंनी दिली आहे. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, येमेनमधील हुथी, गाझातील हमास या दहशतवादी गटांना इराणचे समर्थन मिळते. यामुळे याविरोधात कारवाई करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. इस्रायल इराणच्या अणु तळांवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचीही माहिती समोर आली आहे.