
Saudi-China significant agreement signed on visa exemptions
सौदी आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान आमंत्रण दिले होते. या निमंत्रणावरुन वांग यी रविवारी (१४ डिसेंबर) सौदी अरेबियाला पोहोचले. यावेळी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी व्हिसा सवलती करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांतील राजनियक संबंधांना मजबूत करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. वांग यी यांनी या करारानंतर सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचीही भेट घेतली.
दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, चीन आणि सौदीमध्ये व्हिसा सवलती करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत दोन्ही देशांनी राजनैतिक आणि विशेष पासपोर्ट धारकांसाठी परस्पर व्हिसा सवलतींवर सहमती दर्शवली आहे. याशिवाय परराष्ट्र मंत्र्यांनी उर्जा, गुंतवणूक, नवीन उर्जा आणि हरित परिवर्तन यांसारख्या क्षेत्रांमध्येही दोन्ही देशांतील संबंधांना प्रात्सोहन देण्याचे म्हटले.
बैठकीत दोन्ही देशांनी आर्थिक, व्यापार, गुंतवणूक आणि उर्जा क्षेत्रांसह वाढत्या संबंधांचा आढावा घेतला. चीननचे परराष्ट्र मंत्री सध्या मध्य पूर्वेच्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. याची सुरुवात संयुक्त अरब अमिराती (UAE) पासून झाली होती. यानंतर त्यांनी सौदी अरेबियाला भेट दिली. सौदीच्या दौऱ्यानंतर वांग यी जॉर्डनला जाणार आहे.
सौदी आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी चीनने सौदी आणि इराण संबंधावर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. चीनने सौदी आणि इराणमध्ये संबंध सुधारण्याला आणि अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नांना पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, स्थिरतेसाठी सौदीच्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे. सध्या चीन आणि सौदी अरेबियातील संबंधांना अधिक बळकटी मिळणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठा बदल होणार आहे.
हज यात्रेला आता डिजिटल सुरक्षा; Nusuk Card शिवाय करता येणार नाही सौदीचा प्रवास, जाणून घ्या माहिती
Ans: चीन आणि सौदी अरेबियामध्ये रायजनियक आणि विशेष पासपोर्ट धारकांसाछी परस्पर व्हिसा सवलतींचा करार करण्यात आला आहे.
Ans: चीन आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत दोन्ही देशांनी व्यापार, उर्जा, गुंतवणूक, नवीन उर्जा आणि हरित परिवर्तनावर सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर देखील दोन्ही देशांनी संबंध मजबूत करण्याचा निर्धार केला.
Ans: सौदी-इराण संबंध सुधारण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी चीनने सौदीला आपाला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. प्रादेशिक स्थर्य आणि सुरक्षेसाठी सौदीच्या प्रयत्नांचेही चीनने कौतुक केले आहे.