Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi Prince: आत्महत्या की ओव्हरडोस? सौदी राजकुमाराचा लंडनच्या 5-स्टार हॉटेलमध्ये दुर्दैवी अंत; कोरोनर कोर्टाने दिला अंतिम निकाल

दोन पुनर्वसन केंद्रांना भेट दिल्यानंतर पश्चिम लंडनमधील मॅरियट हॉटेलमध्ये २९ वर्षीय सौदी राजकुमार मृत आढळले. राजकुमार अब्दुल्ला बिन फहद बिन अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज बिन जलावी अल सौद यांचे पश्चिम लंडनमधील मॅरियट हॉटेलमध्ये निधन झाले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 24, 2026 | 04:12 PM
saudi prince abdullah bin fahd death london marriott hotel drug overdose

saudi prince abdullah bin fahd death london marriott hotel drug overdose

Follow Us
Follow Us:
  • लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये दुर्दैवी मृत्यू
  • ड्रग्ज, औषधे अन् दारूचे घातक मिश्रण
  • न्यायालयाचा निष्कर्ष अपघात

जागतिक स्तरावर आपल्या आलिशान आणि वैभवशाली जीवनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सौदी राजघराण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियाचे २९ वर्षीय राजकुमार अब्दुल्ला बिन फहद बिन अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज बिन जलावी अल सौद (Prince Abdullah bin Fahad Al Saudi) यांचा लंडनमधील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लंडनच्या केन्सिंग्टन भागातील ‘मॅरियट हॉटेल’ (London Marriott Hotel Kensington) मधील त्यांच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या न्यायालयीन तपासात आणि वैद्यकीय अहवालात राजकुमाराचा मृत्यू विषारी ड्रग्ज, दारू आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या तीव्र औषधांच्या घातक मिश्रणामुळे (Drug Overdose) झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार अब्दुल्ला हे १९ नोव्हेंबर रोजी एका रात्रीसाठी सुमारे ६०० युरो (अंदाजे ५५,००० रुपये) भाडे असलेल्या केन्सिंग्टन मॅरियट हॉटेलमध्ये एक आठवड्यासाठी मुक्कामाला आले होते. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी जेव्हा हॉटेलचा सफाई कर्मचारी त्यांच्या पाचव्या मजल्यावरील खोलीत गेला, तेव्हा राजकुमार बाथरुमच्या फरशीवर बेशुद्ध अवस्थेत कोसळलेले आढळले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ आणीबाणीच्या वैद्यकीय पथकाला (Paramedics) पाचारण केले. डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुनरुज्जीवित करण्याचे आणि सीपीआर (CPR) देण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

विषशास्त्र अहवालात दारू अन् पार्टी ड्रग्जचा धक्कादायक खुलासा

या प्रकरणाची सखोल चौकशी इनर वेस्ट लंडन कोरोनर कोर्टात (Inner West London Coroner’s Court) सुरू होती. वैद्यकीय तज्ज्ञांनी न्यायालयात सादर केलेल्या टॉक्सिकॉलॉजी (Toxicology) अहवालातून भयंकर माहिती उघडकीस आली. चाचणीनुसार, राजकुमाराच्या रक्तामध्ये अल्कोहोलची पातळी प्रति १०० मिलीलीटर रक्तामागे २२२ मिलीग्राम आढळली, जी ब्रिटनमधील दारू पिऊन वाहन चालवण्याच्या कायदेशीर मर्यादेपेक्षा (Drink-Driving Limit) तब्बल तिप्पट होती. केवळ दारूचे हे प्रमाणच कोणत्याही सामान्य व्यक्तीला कोमामध्ये ढकलण्यासाठी पुरेसे असते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : California Diwali Holiday: कॅलिफोर्निया न्यायालयाचा निकाल! सरकारकडून दिवाळीची सुट्टी दिली जाणार नाही; कायदा रद्द

परंतु, ही शोकांतिका केवळ दारूपुरती मर्यादित नव्हती. तपासात राजकुमाराच्या शरीरात GHB (Gamma-hydroxybutyrate) नावाचे अत्यंत घातक पार्टी ड्रग्ज, कॅनाबिस (गांजा) आणि चिंतेवर/नैराश्यावर दिली जाणारी ‘झानेक्स’ (Xanax) सारखी तीव्र औषधे अतिप्रमाणात आढळली. हे सर्व पदार्थ एकाच वेळी शरीरात गेल्यामुळे राजकुमाराच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर (Central Nervous System) तीव्र परिणाम झाला आणि त्यांना भीषण हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

UK coroner rules 2025 Saudi prince death in London hotel was drug, alcohol overdose
——
Prince Abdullah bin Fahad bin Abdullah bin Abdulaziz bin Jalawi Al Saud died on 25 November 2025, from an accidental overdose after ingesting a fatal mixture of alcohol, party drugs, and… pic.twitter.com/3AFDvWp4tF
— The Cradle (@TheCradleMedia) July 24, 2026

credit – social media and Twitter

व्यसनमुक्ती केंद्रात उपचार अन् आत्महत्येचा नकार

न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यांनुसार, राजकुमार अब्दुल्ला हे गेल्या काही काळापासून नैराश्य, अल्कोहोलचे व्यसन आणि वैद्यकीय औषधांच्या अतिसेवनाशी झुंज देत होते. ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी दक्षिण-पश्चिम लंडनमधील प्रसिद्ध ‘रोहॅम्पटन प्रायोरी हॉस्पिटल’ (Priory Hospital, Roehampton) आणि नंतर मर्सिसाइड येथील ‘रेनफोर्ड हॉल’ (Rainford Hall Clinic) या पुनर्वसन केंद्रांमध्ये उपचार घेतले होते. तेथील मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, त्यांनी डिटॉक्सिफिकेशन (Detoxification) कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. डिस्चार्ज देताना डॉक्टरांना त्यांच्यामध्ये आत्महत्येची कोणतीही लक्षणे दिसली नव्हती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Erbil Strike: इराकमधील अमेरिकी तळाजवळ 7 मोठे स्फोट; संपूर्ण मध्य पूर्वेत हाय-अलर्ट, US-Iran संघर्षाने जागतिक बाजारात धुमाकूळ

सहाय्यक कोरोनर जीन हार्किन (Assistant Coroner Jean Harkin) यांनी प्रकरणाचा अंतिम निकाल देताना स्पष्ट केले की, हा आत्महत्येचा प्रकार नाही. घटनेच्या आदल्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, राजकुमार रात्री सिगारेट ओढण्यासाठी हॉटेलच्या बाहेर आले होते आणि ते अगदी एकटे होते. खोलीत कोणतीही सुसाईड नोट (Suicide Note) किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपाचे पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने अधिकृतपणे हा ‘दुर्दैवी अपघाती मृत्यू’ (Death by Misadventure) असल्याचे घोषित केले. सौदी राजघराण्याने या वृत्ताला दुजोरा दिला असून, रियाधमधील व्हीआयपी इमाम तुर्की बिन अब्दुलअझीझ मशिदीत त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली.

Web Title: Saudi prince abdullah bin fahd death london marriott hotel drug overdose

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Drugs Case
  • hotel
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
1

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
2

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध
3

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश
4

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.