
Accident News: दिवाळीचा सण ठरला काळ! ५ डिसेंबरच्या लग्नाआधीच दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू!
मिळालेली माहितीनुसार, अमेय हा पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याचे लग्न अवघ्या एका महिन्यावर, म्हणजेच ५ डिसेंबर रोजी निश्चित झाले होते. या विवाह सोहळ्यासाठी घरातील सर्वजण खूप उत्सुक होते. घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती; नातेवाईकांसाठी पत्रिका छापून त्यांचे वाटप करणे, हॉलचे बुकिंग करणे आणि खरेदीची लगबग अंतिम टप्प्यात आली होती. ज्या घरात काही दिवसांत आनंदाची शहनाई वाजणार होती, तिथे आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दिवाळीचा सण आई-वडिलांसोबत आणि कुटुंबासोबत आनंदाने साजरा करण्यासाठी अमेय पुण्याहून आपल्या दुचाकीवरून कागलकडे निघाला होता. प्रवासादरम्यान उंब्रजनजीक असलेल्या टोलनाक्यावर त्याची दुचाकी अचानक तेथील दांडक्याला धडकली आणि हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भयानक होता की, अमेयच्या डोक्यावरील हेल्मेटचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि जागीच त्याचा प्राण गेला.
ऐन दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे जोशी कुटुंबातील आनंदाचे वातावरण विरले असून सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. मृत अमेयच्या मागे आई, वडील, भाऊ आणि काका असा परिवार आहे.
Ans: अपघातात प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव अमेय दीपक जोशी (वय ३२) असे असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील मुरगूड नाका परिसरातील होता.
Ans: पुण्याहून कागलकडे दुचाकीवरून येत असताना उंब्रजनजीक टोलनाक्याच्या दांडक्याला दुचाकी धडकल्याने हा भीषण अपघात घडला.
Ans: अमेयचा विवाह ५ डिसेंबर रोजी ठरला होता आणि घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती.