Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Operation Sindoor’ नंतर पाक पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची पहिलीच प्रतिक्रिया; जम्मू-कश्मीरमध्ये अलर्ट, विमानसेवा विस्कळीत

Operation Sindoor : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर (PoK) व पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 07, 2025 | 08:16 AM
Shehbaz Sharif reacts to Operation Sindoor J&K on alert flights hit

Shehbaz Sharif reacts to Operation Sindoor J&K on alert flights hit

Follow Us
Close
Follow Us:

Operation Sindoor : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर (PoK) व पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मुझफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरच्या अहमद पूर्व भागातील हवाई कारवायांची पाकिस्तानने अधिकृतपणे पुष्टी केली असून, यासंदर्भात भारताने देखील ‘सर्जिकल आणि लक्ष्यित हल्ल्यां’ची कबुली दिली आहे.

भारतीय सैन्याने पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत बुधवारी पहाटे हे हल्ले केले. या हल्ल्यात २५ भारतीय नागरिक आणि एक नेपाळी नागरिक ठार झाला होता. याच घटनेनंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत नऊ दहशतवादी छावण्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

शेहबाज शरीफ यांची तीव्र प्रतिक्रिया: “शत्रूच्या घृणास्पद कृत्याचे प्रत्युत्तर देऊ”

भारताच्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “विश्वासघातकी शत्रूने पाकिस्तानमधील पाच ठिकाणी भ्याड हल्ला केला आहे. आक्रमकतेचे हे घृणास्पद कृत्य शिक्षा भोगल्याशिवाय राहणार नाही. आमचे सशस्त्र दल पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत आहेत.” शरीफ यांनी पुढे म्हटले की, “संपूर्ण राष्ट्र आपल्या सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आमचा दृढनिश्चय आणि मनोबल अढळ आहे. शत्रूच्या कोणत्याही कुरापतींना यश येऊ दिले जाणार नाही.”

credit : social media

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindoor: जय हिंद! भारताने घेतला पहलगामचा बदला; पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर Air Strike

DG ISPR आणि संरक्षण मंत्रालयाचे स्पष्टीकरण

पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (DG ISPR) च्या माहितीनुसार, बहावलपूरच्या अहमद पूर्व भागातील सुभानुल्लाह मशिदीवर, तसेच कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये भारताने तीन हवाई हल्ले केले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी वायूदलाने देखील प्रत्युत्तर दिले असून, “पाकिस्तान याला स्वतःच्या वेळेनुसार आणि जागेनुसार प्रत्युत्तर देईल,” असे ते म्हणाले. भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, हल्ल्यांचा उद्देश फक्त दहशतवादी तळांवर होता, कोणत्याही पाक लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आलेले नाही. या कारवाईत हवाईशक्तीचे नियोजनबद्ध आणि मोजमापाने वापर करण्यात आला.

हवाई हल्ल्यांमुळे जम्मू-कश्मीरमध्ये अलर्ट; विमान सेवा विस्कळीत

या कारवाईनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे हवाई वाहतुकीवर प्रत्यक्ष परिणाम झालेला असून, श्रीनगर, जम्मू, चंदीगड, अमृतसर, लेह आणि धर्मशाळा येथील विमान सेवा विस्कळीत झाली आहे. इंडिगो एअरलाइन्सने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत प्रवाशांना त्यांच्या प्रवासाआधी उड्डाण स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, स्पाइसजेट आणि अन्य विमान कंपन्यांनी देखील काही विमानतळ बंद असल्याचे जाहीर केले आहे.

#6ETravelAdvisory: Due to changing airspace conditions in the region, our flights to and from #Srinagar, #Jammu, #Amritsar, #Leh, #Chandigarh and #Dharamshala are impacted. We request you to check your flight status at https://t.co/CjwsVzFov0 before reaching the airport.

— IndiGo (@IndiGo6E) May 6, 2025

credit : social media

सैनिकांप्रती एकजूट आणि कठोर कारवाईचे संकेत

भारताच्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानने जाहीर केले आहे की, त्यांच्याकडे प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते सशस्त्र दलाच्या निर्णयावर विश्वास ठेवतात. भारताने याचे उत्तर देताना स्पष्ट केले की, हे आक्रमण नव्हे, तर सीमित आणि धोरणात्मक कारवाई आहे, जी नागरिकांच्या आणि जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आवश्यक होती.

‘ऑपरेशन सिंदूर’

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत-पाक संबंधांमध्ये नव्याने तणाव निर्माण झाला आहे. भारताने पहलगाममधील हल्ल्याचा तितक्याच तीव्रतेने आणि अचूकतेने बदला घेतल्याचा संदेश दिला आहे. पाकिस्तानच्या भूमिकेत कठोरपणा दिसत असून, दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. जम्मू-कश्मीरसह उत्तर भारतातील नागरिकांना याचे थेट परिणाम भोगावे लागत असून, हवाई वाहतूक ठप्प होण्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असून, सरकार आणि सैन्याच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Shehbaz sharif reacts to operation sindoor jk on alert flights hit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 08:16 AM

Topics:  

  • international news
  • jammu kashmir
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

भारत रशियाला मोठा धक्का देणार? ‘या’ आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी
1

भारत रशियाला मोठा धक्का देणार? ‘या’ आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी

म्यानमार गृहयुद्ध भीषण वळणावर; लढाऊ विमानांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी
2

म्यानमार गृहयुद्ध भीषण वळणावर; लढाऊ विमानांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी

Cloudburst in Kishtwar: किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत ४जणांचा मृत्यूची नोंद, आकडा वाढण्याची शक्यता
3

Cloudburst in Kishtwar: किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत ४जणांचा मृत्यूची नोंद, आकडा वाढण्याची शक्यता

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
4

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.