Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन

Sheikh Hasina : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या यामुळे अवमी लीगने देशव्यापी बंद पुकारला आहे. याच वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 19, 2025 | 01:07 PM
Donald Trump, Sheikh Hasina, Keir Starmer

Donald Trump, Sheikh Hasina, Keir Starmer

Follow Us
Close
Follow Us:
  • शेख हसीनाला मृत्यूदंडाची शिक्षा
  • ब्रिटन आणि अमेरिका मौन
  • कारण काय?
Sheikh Hasina News in Marathi : ढाका : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर २०२५ बांगलादेशच्या (Bangladesh) आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) हा निर्णय दिला आहे. जुलै २०२४ ते ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर अमानवीय कारवाईचे आदेश देण्याच्या आणि मानव अधिकाराचे उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. परंतु अमेरिका आणि ब्रिटनने अद्यापर हसीनाच्या शिक्षेवर मौन पाळले आहे. यामुळे सध्या जागतिक स्तरावर याची चर्चा सुरु आहे.

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही

शेख हसीनाला फाशीची शिक्षा सुनावून दोन दिवस झाले आहे, परंतु अद्यापही अमेरिका (America) आणि ब्रिटनने (Britain) या निकालावरही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया जाहीर केलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिका आणि ब्रिटन मानवाधिकारांचे उल्लंघन करण्याच्या सतत विरोधात असतात. अशा वेळी त्यांच्याकडून एकही शब्द ऐकायला न मिळणे अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. शिवाय ICT व गेल्या अनेक काळापासून पारदर्शक न्याय आणि कायद्याच्या मूलभूत तत्वांचे पालन न केल्याचा आरोप आहे.

सध्या जगभरात शेख हसीनाच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने ICT च्या निर्णयावर टिका केली आहे. हसीनावरील खटला निष्पक्ष आणि न्यायिक नसल्याचे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनले म्हटले आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांनी दुटप्पी निकष दिला आहे. संयुक्त राष्ट्रांनी हसीनाच्या शिक्षेवर खेद व्यक्त केला आहे, पण मानव अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. तर चीनने हसीनाच्या फाशीवर प्रतिक्रिया देताना हा त्यांचा अंतर्गत निर्णय असल्याचे म्हटले आहे. तर हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने ICT चा निर्णय नाकारला आहे.

भारताची प्रतिक्रिया

भारताने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे. भारताच्या निवेदनानुसार, बांगलादेशातील घडामोडींवर भारताचे बारकाईने लक्ष आहे. ICT च्या निर्णयानंतर बांगलादेशात निर्माण होणारे राजकीय वातावरण, वेगवेगळ्या गटांमधील संवाद आणि राष्ट्रातील शांतता याबाबत भारताची चिंता व्यक्त केली आहे.

अमेरिकेने साधले मौन 

अमेरिका नेहमी जगभरातील मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या घटनवांवर जोरदार आवाज उठवते. परंतु यावेळी हसीना आणि त्यांच्यावरील आरोपांवर, ICT च्या निकालावर अमेरिकेने मौन साधले आहे. २०२३ मध्ये अमेरिकेचे राजदूत पीटर हास यांनी ह्युमन राइट्सला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, अमेरिकेला बांगलादेशातील मानवी हक्क आणि लोकशाहीच्या परस्थितीबद्दल चिंता आहे. तसेच अमेरिकेने मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटननेही पाळले मौन

शिवाय ब्रिटनने देखील अनेक वेळा मानवी हक्क आणि मूलबूत स्वातंत्र्याचा आदर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. २०२४ पासून ब्रिटन बांगलादेशाच्या सरकार आणि राजकीय पक्षांशी समन्वय साधून आहे. ब्रिटनच्या अनेक पंतप्रधान केयर स्टारमरसह अनेक खासदारांनी देखील बांगलादेशातील मानवी हक्कांच्या उल्लंघनावर चिंता व्यक्त केली होती. परंतु यावेळी हसीनाच्या शिक्षेवर ब्रिटनने कोणतेही भाष्य केलेले नाही. याचे कारणही सध्या अस्पष्ट आहे.

शेख हसीना नाही तर इतर नेत्यांच्याही गळ्याभोवती अडकला आहे फास; ‘या’ नेत्यांना मिळाला आहे मृत्युदंड

Web Title: Sheikh hasina death verdict britain and america remain silent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • America
  • Bangladesh
  • britain
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Save Hasina : ‘PM Modi नी माझ्या आईचा जीव वाचवला’ सजीब वाजेदचा सनसनाटी दावा; Sheikh Hasina मृत्युदंडावर गंभीर प्रतिक्रिया
1

Save Hasina : ‘PM Modi नी माझ्या आईचा जीव वाचवला’ सजीब वाजेदचा सनसनाटी दावा; Sheikh Hasina मृत्युदंडावर गंभीर प्रतिक्रिया

जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO
2

जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू
3

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता
4

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.