Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lashkar E Taiba: ‘भारताचा विनाश अटळ!’ शेख रशीदची भारताला थेट धमकी; हाफिज सईदबाबतचा गुलाम असल्याचा मोठा दावा

Hafiz Saeed Link: पाकिस्तानचे माजी मंत्री शेख रशीद यांनी दहशतवादी हाफिज सईदची प्रशंसा करताना स्वतःला त्याचा गुलाम म्हटले असून, त्याच्यासोबत व्यासपीठावर येऊन भारताला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 13, 2026 | 12:23 PM
Sheikh Rasheed Hafiz Saeed statement

Sheikh Rasheed Hafiz Saeed statement

Follow Us
Follow Us:
  • दहशतवाद्यांसोबत व्यासपीठ
  • हाफिज Saeed चे समर्थन
  • भारताला उघड धमकी

पाकिस्तानचा नापाक आणि दहशतवादपूरक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि अवामी मुस्लिम लीगचे प्रमुख शेख रशीद अहमद हे एका जाहीर कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या (Lashkar-e-Taiba) वरिष्ठ कमांडर्ससोबत एकाच मंचावर उपस्थित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कार्यक्रमाचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामध्ये शेख रशीद यांनी २००८ मधील मुंबई ५६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचे गुणगान गायले आहे. इतकेच नाही तर, “मी हाफिज सईदचा गुलाम आहे,” असे वक्तव्य करत त्यांनी आपल्या भारतविरोधी विकृत मानसिकतेचे उघड प्रदर्शन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा वादग्रस्त कार्यक्रम नुकताच पार पडला असून, या मंचावर लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर आणि पाकिस्तान सेंट्रल मुस्लिम लीगचा अध्यक्ष खालिद मसूद संधू याच्यासह दहशतवादी संघटनेच्या मध्यवर्ती सल्लागार समितीचा सदस्य याकूब शेख देखील उपस्थित होता. अत्यंत कुख्यात आणि बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखांशी व त्यांच्या हस्तकांशी हस्तांदोलन करत राजकीय व्यासपीठ सामायिक केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या राजकीय नैतिकतेवर पुन्हा एकदा जोरदार प्रहार होत आहेत.

‘मी हाफिजचा गुलाम’; व्यासपीठावरून जाहीरपणे स्वाभिमान गहाण

या जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना शेख रशीद यांनी हाफिज सईदप्रती आपली आंधळी निष्ठा व्यक्त केली. “मी हाफिज साहेबांचा गुलाम आहे आणि मी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन,” असे ते उघडपणे म्हणाला. एका सार्वभौम देशाच्या माजी गृहमंत्र्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर घोषित असलेल्या कुख्यात दहशतवाद्याला “साहेब” संबोधून स्वतःला त्याचा गुलाम म्हणवून घेणे, हे पाकिस्तानच्या प्रशासकीय रचनेत दहशतवाद्यांचे किती खोलवर वर्चस्व आहे हे स्पष्ट करते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz : 2029 पर्यंत बंद राहील होर्मुझ? ट्रम्प कसे अडकले मुज्तबाच्या पटावर; इराणच्या चक्रव्यूहाने अमेरिका हतबल

आपल्या भाषणात पुढे बोलताना रशीद यांनी भारतावर निशाणा साधत अमानुष आणि चिथावणीखोर विधाने केली. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याचा किंवा वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर अल्ला भारताचा सर्वनाश करेल, असा अवाजवी दावा त्यांनी केला. युद्धाची भाषा करताना त्यांनी सीमा ओलांडली आणि असा दावा केला की, “युद्ध झाल्यास भारतात एकही पक्षी किलबिलाट करणार नाही आणि कोणत्याही मंदिराची घंटा वाजणार नाही.” या अत्यंत प्रक्षोभक वक्तव्यामुळे भारतभरातून तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणातून त्यांच्यावर कडक शब्दांत टीका होत आहे.

🚨 EXPOSED: “I AM A FOLLOWER OF HAFIZ SAEED SAAB”: PTI LEADER SHEIKH RASHEED’S SHOCKING ADMISSION Former Pakistani minister and Imran Khan ally Sheikh Rasheed openly declared himself a “follower and servant” of Hafiz Saeed. He claimed he was kicked out of the US because Hafiz… pic.twitter.com/OJEilhAPoR — OsintTV 📺 (@OsintTV) August 12, 2026

credit – social media and Twitter

अमेरिकेतून हद्दपारीचा हास्यास्पद दावा

आपल्या भारतविरोधी अजेंड्याला खतपाणी घालण्यासाठी आणि दहशतवाद्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी शेख रशीद यांनी स्वतःचा एक जुना आणि हास्यास्पद किस्साही ऐकवला. रशीद यांनी दावा केला की, जेव्हा ते अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा तेथील सुरक्षा यंत्रणांना त्यांच्या मोबाईल फोनमध्ये हाफिज सईदचा नंबर सापडला होता. या कारणामुळे अमेरिकन प्रशासनाने त्यांना तातडीने देशातून हद्दपार (Expell) केले होते. स्वतःच्या बेकायदेशीर व संशयास्पद संबंधांचा अभिमान बाळगत त्यांनी दहशतवादी हाफिज सईदशी असलेले आपले निकटचे नाते पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला.

वास्तविक पाहता, शेख रशीद यांचा वादग्रस्त आणि दहशतवादधार्जिणा इतिहास नवीन नाही. याआधी २०१२ मध्येही लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याच्या संशयावरून अमेरिकेतील ह्युस्टन विमानतळावर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. इतकेच नाही तर, रावळपिंडीतील आपल्या खाजगी फार्महाऊसवर त्यांनी काश्मिरी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याची कबुली खुद्द त्यांनीच भूतकाळात दिली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारमध्ये २०२० ते २०२२ दरम्यान गृहमंत्री म्हणून काम केलेले रशीद हे सातत्याने अशाच प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांद्वारे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran War Strategy: ‘ट्रम्पचा कार्यकाळ संपेपर्यंत इराण युद्ध सुरूच ठेवणार’; IRGC अधिकाऱ्याचा अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याचा मोठा दावा

पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा जगजाहीर

एकीकडे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आणि फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) समोर आपण दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करत असल्याचे दावे करतो, तर दुसरीकडे त्याच देशाचे माजी गृहमंत्री उघडपणे लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांच्या मंचावर बसून भारतविरोधी विधाने करतात. या घटनेमुळे पाकिस्तानच्या प्रशासकीय आणि लष्करी व्यवस्थेचे दहशतवाद्यांशी असलेले घट्ट नाते पुन्हा एकदा जगासमोर उघड झाले आहे.

भारतात राजकीय व सामाजिक स्तरावर या विधानाचा जोरदार निषेध केला जात असून, पाकिस्तानने आपल्या देशातील अशा दहशतवादी विचारसरणीच्या नेत्यांवर व संघटनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. शेख रशीद यांच्या या कृत्यामुळे राजकीय क्षेत्रात त्यांच्या उरल्यासुरल्या पतवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Sheikh rasheed hafiz saeed slave statement india threat marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • India-Pakistan Conflict
  • Lashkar-e-Taiba terrorist
  • terror attack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.