
आपत्कालीन लँडिंगवेळी फ्लाईट हायवेवरील कारला धडकले
अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील घटना
व्हीईदो सोशल मीडियावर झाला व्हायरल
अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात एक भीषण अपघात घडला आहे. एक विमान थेट हायवेवरील कारला जाऊन धडकले (Plane Crash) आहे. फ्लोरिडा येथे एका विमानाला काही कारणामुळे तेथील रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग करणे भाग पडले. प्लेन लँडिंग करत असताना ते थेट एका कारला जाऊन धडकले आहे. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. तांत्रिक अडचणीमुळे पायलटने प्लॅन रस्त्यावर लँडिंग करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडा येथे हि घटना घडली आहे. एक लहान विमान हायवेवॉर इमर्जन्सी लँडिंग करत असताना एका कारला धडकले आहे. अचानक या विमानातील इंजिन बंद झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
INSANE footage: plane lands RIGHT on a car in Brevard County, Florida https://t.co/u8Va7MENN3 pic.twitter.com/TXM1NI41vY — RT (@RT_com) December 9, 2025
सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर याची खूप चर्चा सुरु झाली आहे. या विमानातून पायलट आणि त्याचा साठी प्रवास करत होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान हे विमान इमर्जन्सी लँडिंग करत असताना थेट गादीवर जाऊन आदळले. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि स्थानिं प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान विमानाचा मलबा हटवेपर्यंत हायवेची एक बाजू बंद ठेवावी लागली. घटनास्थळी हे काम अनेक तास सुरु होते. त्यानंतर जवळपास दुसऱ्या दिवशी सकाळी ९ च्या सुमारास हा रास्ता वाहतुकीला खुला करण्यात आला.
Russian सैन्याचे बलाढ्य An-22 प्लेन क्रॅश
रशियामध्ये मोठा अपघात घडला आहे. रशियामध्ये विमानाचा मोठा अपघात झाला आहे. हा अपघात इवानावो प्रदेशात ही दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी जगातील सर्वात महाकाय असणारे टर्बोप्रॉप An – 22 हे विमान क्रॅश झाले आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, हे विमान रशियन संरक्षण मंत्रालयाचे असल्याचे समोर आले आहे. या विमानातून 7 क्रू मेंबर्स प्रवास करत होते. हा अपघात मास्कोपासून सुमारे 321 किमी दूर ईवानावोच्या जिल्ह्यात झाला आहे. An-22 हे रशियाचे एक महाकाय विमान आहे.
Russian सैन्याचे बलाढ्य An-22 प्लेन क्रॅश; रेस्क्यू ऑपरेशन सुरू, 7 क्रू मेंबर्स…
An-22 हे विमान त्याचा बलाढ्यपणा, मोठा आकार, क्षमता यामुळे ओळखले जाते. कमी अंतरावरून टेकऑफ करणे व जड माल वाहून नेण्यासाठी प्रसिद्ध आहे. या विमानात एकावेळेस 290 सैनिक किंवा 150 पॅराट्रूपर्स नेण्याची क्षमता आहे. हे विमान एका वेळेस 60 टन माल वाहून नेऊ शकते.