रशियाच्या विमानाला अपघात (फोटो- सोशल मीडिया)
रशियाच्या इवानावो प्रदेशात मोठा विमान अपघात
टर्बोप्रॉप हे महाकाय विमान कोसळले
विमानातून 7 जण करत होते प्रवास
Russia Aircraft Crash: रशियामध्ये मोठा अपघात घडला आहे. रशियामध्ये विमानाचा मोठा अपघात झाला आहे. हा अपघात इवानावो प्रदेशात ही दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी जगातील सर्वात महाकाय असणारे टर्बोप्रॉप An – 22 हे विमान क्रॅश झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हे विमान रशियन संरक्षण मंत्रालयाचे असल्याचे समोर आले आहे. या विमानातून 7 क्रू मेंबर्स प्रवास करत होते. हा अपघात मास्कोपासून सुमारे 321 किमी दूर ईवानावोच्या जिल्ह्यात झाला आहे. An-22 हे रशियाचे एक महाकाय विमान आहे.
An-22 हे विमान त्याचा बलाढ्यपणा, मोठा आकार, क्षमता यामुळे ओळखले जाते. कमी अंतरावरून टेकऑफ करणे व जड माल वाहून नेण्यासाठी प्रसिद्ध आहे. या विमानात एकावेळेस 290 सैनिक किंवा 150 पॅराट्रूपर्स नेण्याची क्षमता आहे. हे विमान एका वेळेस 60 टन माल वाहून नेऊ शकते.






