Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या परदेशी दौऱ्यावर बंदी; मार्शल लॉ प्रकरणाचा तपास सुरू

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्या राजकीय अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मंगळवारी त्यांनी देशात मार्शल लॉ लागू केल्यामुळे राजकीय परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 09, 2024 | 02:28 PM
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष येओले यांच्या परदेशी दौऱ्यावर बंदी; मार्शल लॉ प्रकरणाचा तपास सुरू

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष येओले यांच्या परदेशी दौऱ्यावर बंदी; मार्शल लॉ प्रकरणाचा तपास सुरू

Follow Us
Follow Us:

सियोल: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्या राजकीय अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मंगळवारी त्यांनी देशात मार्शल लॉ लागू केल्यामुळे राजकीय परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. यामुळे विरोधी पक्ष आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. त्यांनी आपल्या निर्णयाबाबत माफी मागितली असली तरी त्यांच्या विरुद्ध निदर्शने तीव्र झाली आहेत. सध्या त्यांच्या परदेश दौऱ्यावर बंदी घालण्यात आली असून मार्शल लॉ प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

परदेश दौऱ्यावर बंदी

मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियातील पोलीस राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना परदेश प्रवासावर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. त्यांच्या नावाचा समावेश नो-फ्लाय यादीत करण्याची शक्यता आहे. यामुळे अध्यक्षांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडणार आहे. मार्शल लॉच्या निर्णयानंतर देशातील अनेक विरोधी पक्षांनी युन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या निर्णयाला असंवैधानिक, बेकायदेशीर बंड आणि सत्तापालटाचे रूप दिले असल्याचे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग प्रस्ताव अयशस्वी; विरोधकांकडे फक्त 192 मतं

माजी संरक्षण मंत्र्यांना अटक

पोलिसांनी माजी संरक्षणमंत्री किम योंग ह्यून यांची या प्रकरणात अटक केली आहे. युन यांना मार्शल लॉ लागू करण्याचा सल्ला देणारे किम हे या प्रकरणात अटक झालेले पहिले व्यक्ती आहेत. तसेच, संरक्षण मंत्रालयाने तीन वरिष्ठ लष्करी नेत्यांना त्यांच्या कथित सहभागाबद्दल निलंबित केले असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या सुरक्षेचा लाभ मिळत असला तरी बंडखोरी व देशद्रोहासारख्या गंभीर आरोपांपासून युन यांना सूट मिळणार नाही असे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. त्यांच्या विरोधकांनी नव्या महाभियोग याचिकेची तयारी सुरू केली आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन-सुक येओल यांच्या विरोधात निदर्शने( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

युन सूक येओल यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह

युन यांनी मार्शल लॉ लागू करताना संसदेला ‘गुन्हेगारांचा अड्डा’ असे संबोधले होते आणि उत्तर कोरियाच्या समर्थक व राज्यविरोधी शक्तींचा नायनाट करण्याची शपथ घेतली होती. मात्र, त्यांचा निर्णय विरोधकांसाठी संधी ठरला असून युन यांच्या राजकीय भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील देशात अस्थिरता निर्माण झाली असून तेवढ्याच वेगाने त्यांच्याविरोधातील निदर्शने वाढत आहेत.

‘मार्शल लॉ’ च्या निर्णयासाठी देशवासीयांची माफी मागतली

दरम्यान राष्ट्राध्य युन-सुक यांनी मार्शल लॉ लागू केल्याच्या निर्णयावर जनतेची माफी मागितली, पण राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटले की, हा निर्णय वैयक्तिक किंवा राजकीय फायद्यासाठी नव्हता, तर देशातील वाढत्या अस्थिरतेमुळे घेतला गेला. राष्ट्राध्यक्षांना या वादग्रस्त प्रकरणामुळे टीकेचा सामना करावा लागत आहे.

जागति घडामोडी संबंधित बातम्या- ‘तात्काळ युद्धविराम झाला पाहिजे…’; डोनाल्ड ट्रम्प यांचे रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचे आवाहन, काय म्हणाले झेलेन्स्की?

Web Title: South korea bans presidents foreign trips investigation into martial law case underway nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 02:28 PM

Topics:  

  • South korea
  • World news

संबंधित बातम्या

French Open 2026:  विजयाच्या उंबरठ्यावर स्वप्नं भंगलं! PV Sindhu ची झुंज अपुरी;  An Se Young ने सलग तिसऱ्यांदा जिंकले जेतेपद
1

French Open 2026: विजयाच्या उंबरठ्यावर स्वप्नं भंगलं! PV Sindhu ची झुंज अपुरी; An Se Young ने सलग तिसऱ्यांदा जिंकले जेतेपद

World News :सैन्याने करारातील अटी मोडल्या’; स्टारलिंकवरील निर्बंधांचे समर्थन करताना इलॉन मस्क यांचा मोठा दावा
2

World News :सैन्याने करारातील अटी मोडल्या’; स्टारलिंकवरील निर्बंधांचे समर्थन करताना इलॉन मस्क यांचा मोठा दावा

Bangladesh : ‘गेल्या अनेक वर्षांतील सर्वोत्तम दुर्गापूजा’ तारिक रहमान सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे बांगलादेशात नांदणार शांतता
3

Bangladesh : ‘गेल्या अनेक वर्षांतील सर्वोत्तम दुर्गापूजा’ तारिक रहमान सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे बांगलादेशात नांदणार शांतता

Japan Earthquake : तिबेटनंतर जपानमध्ये 6.5 तीव्रतेचा जोरदार भूकंप! बोनिन बेटांमध्ये हादरली जमीन; पण त्सुनामीचा धोका टळला
4

Japan Earthquake : तिबेटनंतर जपानमध्ये 6.5 तीव्रतेचा जोरदार भूकंप! बोनिन बेटांमध्ये हादरली जमीन; पण त्सुनामीचा धोका टळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.