Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Space War : अमेरिकेने प्रथमच पृथ्वीच्या कक्षेत ‘स्पेस कंट्रोल वेपन्स’ तैनात असल्याची अधिकृत कबुली दिली आहे. शस्त्रांचा प्रकार आणि क्षमता अद्याप गुप्त ठेवण्यात आली असून, या घोषणेमुळे अमेरिका, चीन आणि रशियामधील अंतराळातील लष्करी स्पर्धेला नवे वळण मिळाले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 15, 2026 | 09:59 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • कक्षेत नेमकी कोणती शस्त्रं आहेत?
  • उपग्रहांवर हल्ला करण्याची क्षमता?
  • चीन-रशियासोबत नवा ‘स्पेस वॉर’?
Space War : अंतराळातील महासत्तांची स्पर्धा आता आणखी धोकादायक टप्प्यावर पोहोचली आहे. अमेरिकेने प्रथमच अधिकृतपणे पृथ्वीच्या कक्षेत ‘ऑन-ऑर्बिट स्पेस कंट्रोल वेपन्स’ तैनात असल्याची कबुली दिली आहे. अमेरिकेच्या या घोषणेमुळे चीन आणि रशियासोबत अंतराळातील लष्करी स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र, ही शस्त्रं नेमकी कोणती आहेत, त्यांची संख्या किती आहे आणि त्यांची क्षमता काय आहे, याबाबत अमेरिकेने गुप्तता कायम ठेवली आहे.

कक्षेत नेमकी कोणती शस्त्रं आहेत?

अमेरिकेच्या हवाई दलाचे सचिव ट्रॉय मिंक यांनी अमेरिकेकडे कक्षेत तैनात असलेली ‘स्पेस कंट्रोल वेपन्स’ असल्याचे स्पष्ट केले. ही शस्त्रं शत्रूच्या अंतराळातील कारवायांपासून अमेरिकन सैन्याचे संरक्षण करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. मात्र, त्यांचा प्रकार, संख्या, तैनातीची वेळ किंवा कोणत्या कक्षेत ती कार्यरत आहेत, याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर

उपग्रहांवर हल्ला करण्याची क्षमता?

अंतराळातील ‘स्पेस कंट्रोल’ मोहिमेत शत्रूच्या क्षमतांमध्ये अडथळा निर्माण करणे, त्यांना कमकुवत करणे किंवा गरज पडल्यास नष्ट करण्याच्या क्षमतांचा समावेश होतो. यासाठी इलेक्ट्रॉनिक युद्ध, जॅमिंग किंवा इतर तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. मात्र अमेरिकेने सध्या कोणत्या प्रणाली प्रत्यक्षात तैनात केल्या आहेत, हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे कक्षेत असलेल्या शस्त्रांबाबत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

चीन-रशियासोबत नवा ‘स्पेस वॉर’?

अमेरिकेच्या घोषणेनंतर चीनने अंतराळाला युद्धभूमी बनवू नये, असा इशारा दिला आहे. रशियानेही अंतराळ शस्त्रमुक्त ठेवण्याची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे अमेरिका चीन आणि रशिया दोन्ही देशांकडून अंतराळातील लष्करी क्षमता वाढवल्या जात असल्याचा दावा करत आहे.

उपग्रह हे आज लष्करी संचार, नेव्हिगेशन, गुप्तचर आणि क्षेपणास्त्र इशारा यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भविष्यातील संघर्षात अंतराळातील उपग्रह आणि तंत्रज्ञान हेच मोठे लक्ष्य बनू शकते. अमेरिकेची ही कबुली त्यामुळे नव्या ‘स्पेस वॉर’च्या शर्यतीची सुरुवात मानली जात आहे.

 

Web Title: Space war americas weapons in space preparations for war in earths orbit now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • America
  • Marathi News
  • Space News
  • World news

संबंधित बातम्या

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर
1

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर
2

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी
3

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात
4

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.