Israel launches fierce attack on tehran airport, destroyed F-14 aircraft says IDF VIDEO
Israel Iran War News Marathi : जेरुसेलम : मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायलमधील युद्ध तीव्र पेटले आहे. दोन्ही देशांचे सैन्या एकमेकांवर सतत क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले करत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून हे युद्ध सुरु आहे. दरम्यान इस्रायलने एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये इराणच्या विमानतळावरील हल्लाचे विध्वंसक दृश्य दिसत आहे. इस्रायली सैन्याने तेहरानमधील विमानतळावर हल्ला केला होता. यामध्ये इस्रायलने इराणचे दोन एफउ-१४ लढाऊ जेट नष्ट केले आहे. इस्रायलमे इराणचे लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे.
इस्रायलच्या सुरक्षा दलाचे (IDF)चे प्रवक्ते एफी डेफ्रिन यांनी या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने इराणची राजधानी तेहरानमधील विमानतळावर हल्ला केला. यामध्ये इराणचे दोन लढाऊ विमाने पाडण्यात आली. इस्रायली विमानांना रोखण्यासाठी इराणने ही लढाऊ जेट तैनात केली होत. याशिवा इस्रायलवर इराणने केलेल्या यूएव्ही लॉंचरचा हल्ला देखील परतवून लावण्यात आल्याचे एफी डेफ्रिन यांनी म्हटले आहे.
इराणचे एफ-१४ लढाऊ विमान हे अमेरिकेच्या टॉमकॅट कंपनीचे आहे. हे विमान १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपूर्वी इराणला देण्यात आले होते.१९७९च्या पूर्वीच्या काळात इस्रायल आणि इराणमध्ये देखील चांगले संबंध होते. परंतु १९७९ नंतर इस्लामिक क्रांतीची इराणमध्ये स्थापना झाली. नवीन सरकारने इस्रायलला शैतान म्हणून घोषित केले. त्यानंतर दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध बिघडले.
⭕️ The IDF completed several extensive strikes on military targets of the Iranian regime in western Iran, including:
– Surface-to-surface missile storage sites
– Launch infrastructure
– Surface-to-air missile launchers
– UAV storage sites pic.twitter.com/IdeDKCkMAj— Israel Defense Forces (@IDF) June 17, 2025
दरम्यान याच वेळी G-7 शिखर परिषदेच्या नेत्यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. G-7 शिखर परिषदेच्या नेत्यांनी तेहरानला आण्विक शस्त्रे बनवण्यापासून मागे हटण्यास सांगतिले आहे. तसेच इस्रायलवरील हल्ले थांबवण्यासही सांगतिले आहे. G-7 परिषेदेच्या मते, मध्य पूर्वेत दहशतवाद आणि अस्थिरता पसरवण्यात इराणचा हात आहे. यामुळे इराण आण्विक शस्त्रे बनवून शकत नाही, असे G-7 च्या देशांनी म्हटले आहे. या देशांनी इस्रायलला पूर्ण पाठिंबा दिला आहे. या परिषदेत अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आणि इटली या देशांचा समावेश आहे.
Israel Iran War : इस्रायलला G7 देशांचा खंबीर पाठिंबा; इराणची अणुशक्ती कमी करण्याचा दिला इशारा