Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran US War: श्रीलंकेने अमेरिकेला दाखवले ‘तेवर’! अमेरिकन फायटर जेटला लँडिंग नाकारले; राष्ट्राध्यक्षांनी ठणकावून सांगितले…

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी संसदेला माहिती दिली: "२६ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने आमच्याशी संपर्क साधला. अमेरिकेने अशी विनंती केली की, आम्ही त्यांच्या लढाऊ विमानांना आमच्या तळांवर उतरण्याची परवानगी दिली नाही.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 20, 2026 | 05:12 PM
श्रीलंकेने अमेरिकेला दाखवले 'तेवर'! (photo Credit- X)

श्रीलंकेने अमेरिकेला दाखवले 'तेवर'! (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • श्रीलंकेचा अमेरिकेला ‘नो-एंट्री’चा सिग्नल!
  • फायटर जेटच्या लँडिंगला मज्जाव
  • राष्ट्राध्यक्षांची भूमिका स्पष्ट
सध्या मुस्लिम जगात एकाकी पडलेल्या इराणला श्रीलंकेकडून महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी संसदेत माहिती दिली की, त्यांच्या प्रशासनाने दोन अमेरिकन लढाऊ विमानांना आपल्या हद्दीत उतरण्याची परवानगी नाकारली आहे. अमेरिकेने या परवानगीसाठी वारंवार विनंती केली होती, परंतु श्रीलंकेने ती ठामपणे फेटाळून लावली. जर या दोन लढाऊ विमानांना श्रीलंकेत तळ मिळाला असता, तर अमेरिकेने इराणवर कदाचित मोठा हल्ला चढवला असता. संसदेत बोलताना दिसानायके म्हणाले, “आम्ही युद्धाचे पुरस्कर्ते नाही. तसेच, श्रीलंकेला या संघर्षात ओढले जाण्याची परवानगीही आम्ही देणार नाही. आमच्या दृष्टीने अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश समान पातळीवर आहेत. जर आम्ही या युद्धात इराणला कोणतीही मदत करत नसू, तर मग आम्ही अमेरिकेला का मदत करावी?”
JUST IN: 🇱🇰🇺🇸 President Anura Kumara Dissanayake says Sri Lanka rejected a U.S. request to land warplanes carrying anti-ship missiles at Mattala Airport. pic.twitter.com/d9t4VIvVOe — Asia Nexus (@nexusasian) March 20, 2026


स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी अमेरिकेने श्रीलंकेच्या आग्नेय भागात असलेल्या ‘मट्टाला आंतरराष्ट्रीय विमानतळा’वर दोन लढाऊ विमाने उतरवण्याची परवानगी मागितली होती ही विनंती दिसानायके प्रशासनाने नंतर नाकारली. यापूर्वी, तुर्की आणि स्पेननेही अमेरिकेला त्यांचे लष्करी तळ वापरण्याची परवानगी देण्यास नकार दिला होता.

Foreign Policy: S Jaishankar आणि बांगलादेशच्या उच्चायुक्तांची भेट; Tarique Rahman Govt सोबत भारताची ‘बॅटिंग’ जोरात

श्रीलंकेकडून इराणला महत्त्वपूर्ण मदत

जेव्हा अमेरिकेने अलीकडेच इराणचे ‘देना’ (Dena) हे युद्धनौका बुडवली, तेव्हा श्रीलंकेने इराणला भरीव मदत केली. श्रीलंकेने सर्वप्रथम बचावकार्य हाती घेतले; त्यानंतर, युद्धनौकेवर मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह इराणला परत पाठवण्याची व्यवस्था केली. शिवाय, जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यापूर्वी त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार करण्यात आले. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मते, हे जरी एक मानवतावादी कर्तव्य असले, तरी त्यांचा देश प्रत्यक्ष संघर्षात इराणला पाठिंबा देत नाहीये. “युद्धातून विनाशाशिवाय काहीच निष्पन्न होत नाही. आम्हाला शांततेची पुनर्स्थापना आणि जागतिक विकासाची प्रगती हवी आहे.”

मुस्लिम जगात इराण एकाकी

इराण मुस्लिम जगात एकाकी पडल्याचे दिसून येत आहे; कोणत्याही देशाने या राष्ट्राला आपला पाठिंबा असल्याचे उघडपणे जाहीर केलेले नाही. तथापि, तुर्कीने मात्र अमेरिकेला आपले लष्करी तळ वापरण्याची परवानगी देण्यास नकार दिला. या आठवड्याच्या सुरुवातीला, इराणच्या ‘सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदे’चे तत्कालीन सचिव अली लारीजानी यांनी मुस्लिम जगातील राष्ट्रांना उद्देशून एक पत्र लिहिले होते. या पत्रात, लारीजानी यांनी सर्व देशांना इराणला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते; मात्र, आतापर्यंत कोणत्याही मुस्लिम देशाने त्याला प्रतिसाद दिलेला नाही.

War Update: इराणी दादागिरीला चोख प्रत्युत्तर! नेतान्याहूंनी शोधला होर्मुझला ‘हा’ पर्यायी मार्ग, बनणार जगाचं ‘पेट्रोल स्टेशन’

Web Title: Sri lanka denies us fighter jet landing neutral policy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • America
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • Sri Lanka

संबंधित बातम्या

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
1

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
2

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार
3

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा
4

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.