Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Shortage: पाण्यासाठी हाहाकार…! अल निनोमुळे १.१५ लाखांहून अधिक नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी संकटात

Water Shortage: अल निनोमुळे वाढते तापमान आणि अपुऱ्या पावसाचा फटका श्रीलंकेला बसत असून अनेक भागांतील दुष्काळ गंभीर झाला आहे. देशातील सात जिल्ह्यांमध्ये १.१५ लाखांहून अधिक नागरिक पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने प्रभावित झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन केंद्राने म्हटले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 08, 2026 | 05:46 PM
पाण्यासाठी हाहाकार...! अल निनोमुळे १.१५ लाखांहून अधिक नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी संकटात

पाण्यासाठी हाहाकार...! अल निनोमुळे १.१५ लाखांहून अधिक नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी संकटात

Follow Us
Follow Us:
  • पाऊस घटला, जलसाठे आटले!
  • श्रीलंकेत भीषण दुष्काळ
  • लाखो नागरिकांवर जलसंकटाचे सावट
Water Shortage: अल निनोच्या प्रभावामुळे श्रीलंकेतील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी झाले असून वाढत्या तापमानामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला बसत आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या (DMC) माहितीनुसार देशातील सात जिल्ह्यांमध्ये १ लाख १५ हजारांहून अधिक नागरिक जलसंकटाने प्रभावित झाले आहेत.

सात जिल्ह्यांना दुष्काळाचा फटका

श्रीलंकेतील २५ प्रशासकीय जिल्ह्यांपैकी सात जिल्ह्यांतील नागरिक अल निनोशी संबंधित हवामान परिस्थितीमुळे प्रभावित झाले आहेत. दीर्घकाळ पुरेसा पाऊस न पडणे आणि वाढलेले तापमान यामुळे अनेक भागांतील नैसर्गिक जलस्रोत आणि जलाशयांतील पाणीसाठा कमी झाला आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अल निनोची स्थिती विकसित होत असून त्यामुळे आगामी काळातील हवामान पद्धतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Russia-Middle East : मध्यपूर्वेच्या रणधुमाळीत रशियाची एंट्री; लावरोव्ह म्हणाले, ‘मॉस्को मदतीसाठी तयार’

जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने घटला

उत्तर-मध्य भागातील अनुराधापुरा जिल्ह्यातील सुमारे ३,५०० एकर-फूट क्षमतेच्या एरुवेवा जलाशयातील पाणीसाठा सुमारे १,००० एकर-फूटपर्यंत खाली आल्याचे सिंचन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मटाले आणि नंदिकदलसह अन्य भागांतील जलस्रोतांच्या पातळीतही घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत सिंचनासाठी आवश्यक पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे.

हजारो माशांचा मृत्यू

दुष्काळाचा परिणाम जलचरांवरही होत असल्याचे समोर आले आहे. ईशान्य श्रीलंकेतील मुल्लैथिवु भागातील तलावात हजारो लहान मासे मृतावस्थेत आढळल्याचे सांगण्यात आले आहे. खारे आणि गोडे पाणी मिसळल्याने ही घटना घडली असावी, असा अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. नैसर्गिक जलस्रोत आटत असल्यामुळे वन्यजीवांनाही पाण्याच्या शोधात दुसऱ्या भागांत जावे लागत असल्याचे चित्र आहे.

शेतीवर मोठे संकट

श्रीलंकेच्या कृषी क्षेत्रालाही पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. धान, नारळ, केळी आणि पेरू यांसारख्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक भागांत पारंपरिक सिंचन स्रोतांतील पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सप्टेंबरअखेरीस पावसाची आशा

सप्टेंबरच्या अखेरीपासून काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अपेक्षेप्रमाणे पाऊस झाल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि शेतीवरील संकट काही प्रमाणात कमी होऊ शकते. तोपर्यंत प्रभावित भागांत पाणीपुरवठा आणि इतर मदतकार्यांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.

Eiffel Tower Controversy : अन् पॅरिस पेटलं ;आयफेल टॉवरवर ‘लेडीज फर्स्ट’चा वाद

Web Title: Sri lanka drought crisis el nino over 115000 people face drinking water shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • El Nino
  • Sri Lanka
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Koyna River: कोयना नदीची पाणीपातळी घटली; पाटण तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली
1

Koyna River: कोयना नदीची पाणीपातळी घटली; पाटण तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

चारा-पाणी नियोजनावर लक्ष द्यावे, देऊळगाव राजात पाणीटंचाईचे सावट; आमदार मनोज कायंदेंनी दिले निर्देश
2

चारा-पाणी नियोजनावर लक्ष द्यावे, देऊळगाव राजात पाणीटंचाईचे सावट; आमदार मनोज कायंदेंनी दिले निर्देश

ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट; शहराचा पाणी पुरवठा 36 तास पूर्णपणे राहणार बंद
3

ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट; शहराचा पाणी पुरवठा 36 तास पूर्णपणे राहणार बंद

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद
4

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.