Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट; शहराचा पाणी पुरवठा 36 तास पूर्णपणे राहणार बंद

नागरिकांनी दैनंदिन वापराचे पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे, पाणी साठवताना अपव्यय टाळावा आणि पाण्याची नासाडी करू नये, असे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 22, 2026 | 09:38 AM
ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट; शहराचा पाणी पुरवठा 36 तास राहणार बंद

ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट; शहराचा पाणी पुरवठा 36 तास राहणार बंद

Follow Us
Follow Us:
  • पाणीकपातीचा मोठा फटका ठाणे शहराला बसणार
  • काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू
ठाणे : मान्सूनने वेळेपूर्वीच घेतलेली माघार आणि अल निनोच्या प्रभावामुळे धरणांमधील घटलेल्या जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या १० टक्के पाणीकपातीचा मोठा फटका ठाणे शहराला बसणार आहे. नियोजित पाणीकपातीमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सलग ३६ तास ठाण्यातील प्रमुख प्रभागांमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी पावसाळ्यानंतरचा कमी पाऊस व अलनिनोचा प्रभाव आणि ऑक्टोबर २०२६ पासून मान्सूनने लवकर माघार घेतल्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे १० टक्के पाणीकपात करणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी वर्षभरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने ठाणे महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, पाणीगळती व पाणीचोरीला आळा, अनधिकृत नळजोडण्यांवर कठोर कारवाई, पर्यायी जलस्त्रोतांचा विकास आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण या बाबींवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व संबंधित विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन पुढील ९ ते १० महिन्यांसाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले.

काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

१६ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू होईल. ही कपात नागरिकांना त्रास देण्यासाठी नसून पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई किंवा टँकरवर अवलंबून राहण्याची परिस्थिती ओढवू नये, यासाठी केलेली पूर्वतयारी असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

या भागांतील पुरवठ्यावर होणार परिणाम

शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा ३६ तासासाठी पूर्णपणे बंद राहील.

FAQ

ठाण्यात पाणी कपात नक्की कधी आहे? किती तास?
– TMC ने जाहीर केले, आज रात्रीपासून 36 तास पूर्ण बंद राहणार आहे. तर गुरुवारी रात्री 22 ऑक्टोबर 2026 – मध्यरात्री 12:00 वाजल्यापासून सुरु होणार आहे. तर शनिवारी दुपारी 24 ऑक्टोबर 2026 – दुपारी 12:00 वाजता सुरु होणार आहे.

ठाण्यात रोज किती पाण्याची तूट आहे?
– 621 MLD (Million Litres per Day)मिळते. फक्त 585-590 MLD रोजची तूट: 31 MLD – म्हणजे 31 लाख लिटर कमी आहे.

धरणात पाणी असूनही 10% कपात का?
– राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. पाणी आता जपून वापरावे लागेल – 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचे पाणी पुरेल याची काळजी घ्यावी.

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद

Web Title: Water cut crisis for thane residents citys water supply to remain shut for 36 hours nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • Water Crisis
  • Water Issue
  • Water Shortage

संबंधित बातम्या

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद
1

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद

अकोल्यात भीषण पाणी टंचाईचे संकट; शहरात 10 दिवसाआड पाणीपुरवठा
2

अकोल्यात भीषण पाणी टंचाईचे संकट; शहरात 10 दिवसाआड पाणीपुरवठा

Pune Drought: पुणे जिल्ह्यात दसऱ्यावर दुष्काळाचे सावट! १३ पैकी १० तालुके दुष्काळग्रस्त
3

Pune Drought: पुणे जिल्ह्यात दसऱ्यावर दुष्काळाचे सावट! १३ पैकी १० तालुके दुष्काळग्रस्त

बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट? आमदार संजय गायकवाडांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश
4

बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट? आमदार संजय गायकवाडांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.