Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! अवैध मासेमारीच्या आरोपाखाली १२ भारतीयांना श्रीलंकेकडून अटक; आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ बोटी जप्त

श्रीलंकेच्या नौदलाने मच्छिमारांना अटक केली आहे. भारतीय मच्छिमारांना  श्रीलंकेच्या प्रादेशिक जलक्षेत्रात अवैध शिकार केल्याप्रकरणी मच्छिमारांना अटक केली होती. अटक झालेल्या भारतीय मच्छिमारांची संख्या ४६२ वर पोहोचली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 27, 2024 | 06:33 PM
मोठी बातमी! अवैध मासेमारीच्या आरोपाखाली १२ भारतीयांना श्रीलंकेकडून अटक; आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ बोटी जप्त
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: भारताची आणि श्रीलंकेची सागरी सीमा ही एक आंतरराष्ट्रीय सीमा आहे. आंतरराष्ट्रीय सीमा परवानगीशिवाय पार करणे हे कायद्याने गुन्हा आहे. दरम्यानया श्रीलंकेने भारताच्या १२ नागरिकांना अटक केली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने ही कारवाई केली आहे. अवैध मासेमारीच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या नौदलाने १२ नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व जण भारतीय मच्छिमार असल्याचे म्हटले जात आहे.  श्रीलंकेकडून करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत ४६२ मच्छीमाराना अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने त्यांच्या बोटी देखील जप्त केल्या आहेत.

अवैध मासेमारीच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या नौदलाने १२ भारतीय मच्छीमार नागरिकांना अटक केली आहे. श्रीलंकेच्या सीमेत घुसून अवैधरित्या मासेमारी केल्याच्या आरोपखाली नौदलाने त्यांना अटक केली आहे. तसेच श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मच्छीमारांची बोट देखील जप्त केली आहे. एका निवेदनातून याची माहिती देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने १२ लोकांना अटक केल्याने आता अटक झालेल्या मच्छिमार नागरिकांची संख्या ४६२ वर पोहोचली आहे.

श्रीलंकेच्या नौदलाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. उत्तरेकडील जाफना प्रांतातील पॉइंट पेड्रो किनाऱ्याजवळ त्यांची बोटही जप्त करण्यात आली आहे. या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, काकेसंथूराई बंदरात १२ मच्छीमाराना नेण्यात आले आहे. श्रीलंकेच्या नौदलाने २०२४ या वर्षात ४६२ मच्छीमाराना अटक केली आहे. तसेच आतापर्यंत ६२ बोटी देखील जप्त केल्या आहेत.

या मच्छिमारांना कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. श्रीलंकेच्या मत्स्यमंत्रालयाने सांगितले की, दोन्ही देशांच्या सीमेमध्ये असे प्रकार वारंवार घडतात. या सातत्याने निर्माण होणाऱ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अथवा त्यातून तोडगा काढण्यासाठी १२ सदस्यांचे भारतीय शिष्टमंडळ मंगळवारी श्रीलंकेत येणार आहे. अनेकदा मच्छिमार बांधव मासेमारी करण्याच्या ओघात नकळतपणे आंतरराष्ट्रीय सीमा पार करतात. त्यामुळे त्यांना भारताच्या किंवा श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक केली जाते.

हेही वाचा: श्रीलकेंच्या नौदलाकडून भारतीय मच्छीमारांना अटक; एम.के. स्टॅलिन यांचे एस. जयशंकर यांना पत्र

ऑगस्ट महिन्यात देखील श्रीलंकेची कारवाई

श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. भारतीय मच्छिमारांना  श्रीलंकेच्या प्रादेशिक जलक्षेत्रात अवैध शिकार केल्याप्रकरणी आणखी ११  भारतीय मच्छिमारांना अटक केली होती. एका अधिकृत अहवालानुसार, या वर्षी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या भारतीय मच्छिमारांची संख्या ४६२ वर पोहोचली आहे. या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. श्रीलंकेने वारंवार केलेली ही कारवाई चिंताजनक असल्याची खंत त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. “मी वारंवार अधोरेखित केले आहे की अशा घटना चिंताजनक असून त्या वारंवार घडत आहेत. एकट्या 2024 मध्ये 324 मच्छिमार आणि 44 नौका श्रीलंकेच्या नौदलाने पकडल्या होत्या. तामिळनाडूतील मच्छिमारांना वारंवार अटक करण्यात येत असल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्याचा त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवर गंभीर परिणाम होत आहे. असे स्टॅलिन यांनी आपल्या पत्रात लिहीले आहे.

Web Title: Sri lanka navy arrest 12 indian fishermen for illegally cross international border

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 06:33 PM

Topics:  

  • Fishermen community
  • World news

संबंधित बातम्या

Abraham Accords : लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबणार? अब्राहम अकॉर्ड्स करारावर ट्रम्प यांचे मोठे संकेत
1

Abraham Accords : लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबणार? अब्राहम अकॉर्ड्स करारावर ट्रम्प यांचे मोठे संकेत

Iran Attack Kuwait : इराण-अमेरिका संघर्षाचा फटका कुवैतला; पाणीपुरवठा यंत्रणा धोक्यात?
2

Iran Attack Kuwait : इराण-अमेरिका संघर्षाचा फटका कुवैतला; पाणीपुरवठा यंत्रणा धोक्यात?

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
3

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता
4

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.