Photo Credit- Team Navrashtra
कोलंबो: श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या प्रादेशिक जलक्षेत्रात अवैध शिकार केल्याप्रकरणी आणखी 11 भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. एका अधिकृत अहवालानुसार, या वर्षी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या भारतीय मच्छिमारांची संख्या 333 वर पोहोचली आहे. या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. श्रीलंकेने वारंवार केलेली ही कारवाई चिंताजनक असल्याची खंत त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.
हेदेखील वाचा: लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांची महत्त्वपूर्ण माहिती; म्हणाले, ’31 ऑगस्टपर्यंत भरलेले अर्ज…’
अकरा भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली असून त्यांची मासेमारी नौका शुक्रवारी उत्तरेकडील जाफना प्रांतातील पॉइंट पेड्रो किनारपट्टीवर जप्त करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने प्रसिद्धीपत्रकात जारी केली आहे. पकडण्यात आलेल्या भारतीय मच्छिमारांना पुढील प्रक्रियेसाठी कानकेसंथुराई मासेमारी बंदरात आणण्यात आले होते. यासह श्रीलंकन नौदलाने या वर्षी अटक केलेल्या भारतीयांची संख्या 333 वर पोहचली असून त्यांच्या जप्त केलेल्या जहाजांची संख्या 45 झाली आहे.
गेल्या दोन दिवसांत श्रीलंकेच्या नौदलाने आणखी 11 मच्छिमारांच्या अटक केल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. “मी वारंवार अधोरेखित केले आहे की अशा घटना चिंताजनक असून त्या वारंवार घडत आहेत. एकट्या 2024 मध्ये 324 मच्छिमार आणि 44 नौका श्रीलंकेच्या नौदलाने पकडल्या होत्या. तामिळनाडूतील मच्छिमारांना वारंवार अटक करण्यात येत असल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्याचा त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवर गंभीर परिणाम होत आहे. असे स्टॅलिन यांनी आपल्या पत्रात लिहीले आहे.
हेदेखील वाचा: मनसे पाठोपाठ ‘आप’देखील महाराष्ट्र विधानसभा स्वबळावर लढणार; अरविंद केजरीवालांकडून तिसरा उमेदवार जाहीर