Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशात स्टारलिंक आणणार एलॉन मस्क? मोहम्मद युनूस यांच्या भेटीदरम्यान काय घडलं?

बांगलादेशने नवीन राजकीय डावपेच खेळत एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला देशात आमंत्रित केले आहे. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी एलॉन मस्क यांच्यासोबतच्या बैठकी हा निर्णय घेतला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 15, 2025 | 04:25 PM
Starlink to Bangladesh Muhammad Yunus- Elon Musk Hold Talks

Starlink to Bangladesh Muhammad Yunus- Elon Musk Hold Talks

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: बांगलादेशने नवीन राजकीय डावपेच खेळत एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला देशात आमंत्रित केले आहे. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांच्यासोबतच्या बैठकीत दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशमध्ये स्टारलिंक लॉन्च करण्याच्या प्रक्रियेवर लवकरच काम सुरू होईल, असे यूनुस यांनी स्पष्ट केले.

युनुस यांनी गुरुवारी मस्कसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना सरकारने बांगलादेश सोडल्यानंतर मोहम्मद यूनुस सत्तेवर आले. या राजकीय उलथापालथीनंतर बांगलादेशमध्ये हिंदू समुदायावर वाढत्या अत्याचारांची नोंद झाली आहे. अल्पसंख्यांक हिंदू समुदायाला लक्ष्य करून लूटमार, घरांची तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अवैध स्थलांतरितांची दुसरी तुकडी लवकरच पोहोचणार; ‘इतके’ भारतीय परतणार मायदेशी

Bangladesh Chief Adviser Professor Muhammad Yunus on Thursday held an extensive video discussion with @elonmusk, the owner of SpaceX, Tesla, and X, to explore future collaboration and to make further progress to introduce Starlink satellite internet service in Bangladesh. pic.twitter.com/X2cMwF4OvW — Chief Adviser of the Government of Bangladesh (@ChiefAdviserGoB) February 13, 2025


नरेंद्र मोदी बांगलादेशचा निर्णय घेतील- ट्रम्प 

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशच्या मुद्द्यावर बोलताना या प्रश्नाचे उत्तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवले आहे. एका पत्रकाराच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी म्हटले की, “बांगलादेशातील परिस्थितीवर कोणतेही डीप स्टेट कार्यरत नाही. मोदी या मुद्द्यावर बऱ्याच काळापासून काम करत आहेत. मी आता बांगलादेशचा प्रश्न मोदींच्या हाती सोपवतो.”

शेख हसीना यांच्या सरकारच्या अपयशानंतर अमेरिकेने मोहम्मद यूनुस सरकारला मोठा झटका दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने बांगलादेशला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवली आहे. मोहम्मद यूनुस यांचे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि जो बायडेन यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते.

अमेरिकेसोबत संबंध सुधारण्याचा युनूस यांचा प्रयत्न

याचवेळी बांगलादेशच्या नवीन राजकीय समीकरणांमध्ये एलॉन मस्कची स्टारलिंक नेटवर्थला मोठे महत्त्व प्राप्त होत आहे. इंटरनेट सेवेत सुधारण करुन देशात डिजिटल क्रांती गडवून आणण्याचा बांगलादेशचा उद्देश आहे. मात्र, ट्रम्प यांनी आर्थिक मदत थांबवल्याने यावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे एलॉन मस्क यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न युनूस करत आहेत. अमेरिकेसोबतच्या राजकीय आणि व्यापार संबंधामुळे काही महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतील, असे युनूस यांनी म्हटले आहे.

सध्या बांगलादेश राजकीय अस्थिरतेचा सामना करत असलेल्या परिस्थितीत भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे लक्ष या भागाकडे वेधले आहे. हिंदू समुदायावरील वाढत्या हल्ल्यांमुळे भारताकडून कठोर भूमिका घेतली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त धोरण अन् युएस लष्करातून ‘Transgender’ बाहेर

Web Title: Starlink in bangladesh muhammad yunus elon musk hold talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Donald Trump
  • Muhammad Yunus
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

तेलावरुन पेटले आंतरराष्ट्रीय राजकारण! डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट केले निकोलस मादुरो यांचे अपहरण
1

तेलावरुन पेटले आंतरराष्ट्रीय राजकारण! डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट केले निकोलस मादुरो यांचे अपहरण

नेपाळमध्ये सत्ता हालवण्यासाठी शिजतोय कट? चार राजकीय पक्षांच्या कुटनीतीची जगभरात चर्चा
2

नेपाळमध्ये सत्ता हालवण्यासाठी शिजतोय कट? चार राजकीय पक्षांच्या कुटनीतीची जगभरात चर्चा

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का
3

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…
4

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.