Stop factionalizing against us Russia slams US during North Korea visit
Russia slams US : रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह सध्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर असून, त्यांनी या दौऱ्यात अमेरिकेसह जपान आणि दक्षिण कोरियेला थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे देश रशिया आणि उत्तर कोरियाविरुद्ध कोणतीही लष्करी किंवा राजकीय युती करू नयेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे आशियाई राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
लावरोव्ह यांनी म्हटले की, अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाची वाढती लष्करी जवळीक ही एक “धोकादायक योजनेचा” भाग आहे, ज्यातून हे देश उत्तर कोरिया व रशियाला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्पष्टपणे सूचित केले की अशा प्रकारच्या युतीमुळे आशियातील स्थिरतेला धोका निर्माण होऊ शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gaza Crisis 2025 : युद्धबंदीच्या आशा क्षीण! गाझामध्ये अन्न-पाण्याविना मृत्यूचे तांडव; 800हून अधिक बळी
अलिकडेच अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने कोरियन द्वीपकल्पाच्या जवळ मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव केले. या सरावामध्ये अण्वस्त्रांनी सुसज्ज असलेल्या अमेरिकन बॉम्बर विमानांचाही समावेश होता. यामुळे रशिया आणि उत्तर कोरिया दोघेही अस्वस्थ झाले असून, त्यांनी याला “नवीन सुरक्षा क्लब” तयार करण्याचा प्रयत्न म्हटले आहे, ज्याचे लक्ष्य त्यांच्यावर केंद्रित आहे.
लावरोव्ह यांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमालाही पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी म्हटले की, “उत्तर कोरियाचे शास्त्रज्ञ अण्वस्त्र विकासासाठी सातत्याने मेहनत घेत आहेत. रशियाला त्यांच्या निर्णयामागची कारणे समजतात. अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करणे हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.”
रशियाच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात असून, अनेक देशांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचण्यांवर आधीच आक्षेप घेतला आहे. मात्र रशियाच्या या समर्थनामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
युक्रेन युद्धात उत्तर कोरियाने रशियाला केवळ शस्त्रसाठा पुरवला नसून, काही अहवालानुसार सैनिकांचीही मदत केली आहे. लावरोव्ह यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, “कुर्स्क सीमेवर युक्रेनियन हल्ला रोखण्यासाठी उत्तर कोरियाच्या साहाय्याची मोठी मदत झाली.” हे वक्तव्य रशिया-उत्तर कोरिया यांच्यातील मजबूत लष्करी सहकार्याचे खुले उदाहरण ठरले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : दरवर्षी थोडं थोडं बुडतंय ‘हे’ विमानतळ, पण जगातलं सर्वोत्तम! जपानचं कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ धोक्यात
लावरोव्ह यांच्या भेटीदरम्यान उत्तर कोरियाच्या वोनसान शहरात ही बैठक झाली. हे शहर समुद्रकिनाऱ्यावरील एक रिसॉर्ट क्षेत्र आहे, जे उत्तर कोरियाने अलीकडेच पर्यटनासाठी विकसित केले आहे. लावरोव्ह यांनी रशियन पर्यटकांसाठी विशेष विमानसेवा सुरू करण्यावर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, “रशिया सर्वतोपरी प्रयत्न करेल की आपल्या नागरिकांना उत्तर कोरियामध्ये प्रवेश आणि प्रवास अधिक सुलभ करता येईल