Sudan Deadly RSF attacks in Darfur famine-hit camps
नवी दिल्ली: सुदानमध्ये पुन्हा एखदा हिंसाचार उफाळून आला आहे. अलीकडेच सुदानच्या दार्फुर भागात हिंसक, अत्यंत धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. संयुक्त राष्ट्रासंघाने दिलेल्या माहितीनुसार, रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) या लष्करी गटाने उत्तर दार्फुरमधील अल-फशएर शहर आणि जवळील झमझम भागात, तसेच अबू शौक येथी निर्वासित छावण्यांवर सलग दोन दिवस तीव्र हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिका लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये 20 मुलांचाबही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुदानमधील संयुक्त राष्ट्रांचे निवासी आणि समन्वयक क्लेमेंटाइ एनक्वेचा-सलामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शुक्रवारी सुरु झाली. या हल्ल्यांमध्ये नउ मदत कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. यामध्ये छावण्यांमध्ये राहत असलेल्या निर्दोष लोकांवर झालेल्या हल्ल्यांमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुदानमध्ये सुरु असलेल्या दोन वर्षाच्या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले करण्यात आले आहेत. या ठिकाणी लष्कर आणि RSF मध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे.
सुदानच्या डॉक्टर्स युनियनने दिलेल्या माहितीनुसार, झमझम छावणीतील त्यांच्या रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात सहा वैद्यकीय कर्मचारी ठार झाले आहेत. यामध्ये डॉक्टर महमूद बाबाकार इद्रिस आणि रिलीफ इंटरनॅशनलचे प्रदेश प्रमुख आदम बाबाकार अब्दुल्ला यांचा समावेश होता. या अमानवी हल्ल्याची जबाबदारी थेट RSF वर टाकण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, या संघर्षात आतापर्यंत 24,000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे, परंतु कार्यकर्त्यांचे दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात ही संख्या यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. बेघर नागरिक, महिलावर्ग, लहान मुले आणि मदत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे हे अत्याचार म्हणजे आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांचा भंग असून त्याची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे.
संयुक्त राष्ट्रांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून सुदानमधील यादवी संघर्षात निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. जगभरातील देशांनीही या अमानवी कृत्यांविरुद्ध एकत्र येऊन कारवाई करणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु झालेल्या यादवी गृहयुद्धात लष्कर RSF विरोधात लढत आहे. पुन्हा एकदा यादवी गृहयुद्ध सुरु झाले असून यामुळे मोठे जीवीतहानी झाली आहे.