Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या क्वेटा शहरात आत्मघातकी हल्ला; बलुचिस्तानच्या नॅशनल पार्टीला लक्ष्य, १४ जण ठार

Quetta blast News : पाकिस्तानच्या क्वेटा शहरात एका रॅलीदरम्यान प्राणघातक हल्ला झाला आहे. यामध्ये बलुचिस्तानच्या नॅशनल पार्टीला लक्ष्य करण्यात आले आहे. यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 03, 2025 | 01:32 PM
Suicide attack in Pakistan's Quetta on Balochistan National Party targeted, 14 killed

Suicide attack in Pakistan's Quetta on Balochistan National Party targeted, 14 killed

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या क्वेटा शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बलुचिस्तानच्या नॅशनल पार्टीने आयोजित केलेल्या रॅलीदरम्यान मोठा स्फोट घडला आहे. या स्फोटात किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याचे आणि २० हून अधिक लोक जखमी असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी सांगितले. वृत्तानुसार, मंगळवारी २ सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे.

क्वेटामध्ये रात्री सरदार अताउल्लाह मेंगल यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा स्फोट घडला. बलुचिस्तानच्या प्रांताचे आरोग्य मंत्री बख्त मुहम्मद काकर यांनी या घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच त्यांनी या घटनेचे आत्मघातकी हल्ला म्हणून वर्णन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदार अताउल्लाह मेंगल यांची चौथी पुण्यतिथी साजरी केली जात होती. बलुचिस्तानच्या नॅशनल पार्टीने याचे आजोयन केले होते. दरम्यान या रॅलीसंपल्यानंतर लोक घरी जात असताना १५ मिनीटांनी अचानक मोठा स्फोट झाला.

पुतिन यांचा पंतप्रधान मोदींना भेटीचा खास नजराणा; भारताला S-400 ची मिळणार आणखी एक खेप

#Quetta: Initial reports suggest that at least five people have been killed and dozens injured, including BNP central member Mussa Jan, in what police believe was a suicide bombing. Party officials confirmed that BNA chief Akhtar Mengal escaped unharmed.#Balochistan https://t.co/iLiIYhjgY3 pic.twitter.com/kOeOUJl65p

— Saeed Buzdar (@Buzdar_Baluch) September 2, 2025


पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, सध्या या घटनेमागे नेमके कोण आहे याचा तपास सुरु आहे. प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला बीएनपी पक्षाचे प्रमुख अख्तर मेंगल यांच्यासाठी रचण्यात आला होता. परंतु मेंगल थोडक्यात बचावले असे पोलिसांनी सांगितले. परंतु यामध्ये बीएनपी पक्षाचे १३ कार्यकर्ते ठार झाले आहे.

दरम्यान या घटनेनंतर मेंगल यांना सुरक्षा दलांनी लगेचच सुरक्षित ठिकाणी नेले. याच वेळी बचाव पथकांनी जखमींना देखील जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

Thank you for your prayers and messages. Alhumdulillah I am safe, but deeply heartbroken at the loss of our workers. Around 15 have been martyred and many injured. They stood by me and gave their lives for our cause. Their sacrifice will never be forgotten. May Allah grant them…

— Akhtar Mengal (@sakhtarmengal) September 2, 2025

सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. मेंगल यांनी त्यांच्या सुरक्षिततेची पुष्टी केली असून पक्षातील कार्यकर्त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, मी तुमच्या प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल आभार मानतो. मी सुरक्षित आहे, पण आमच्या सहकाऱ्यांनी या हल्ल्यात प्राण गमावले. यामुळे मला खूप दु:ख झाले आहे. या हल्ल्यात १५ शूर लोकांनी प्राण गमावले आणि अनेक गंभीर जखमी झाले आहेत. मी जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. तसेच मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो असे त्यांनी म्हटले.

चीन-जपान दौऱ्यावर एकटेच गेले पंतप्रधान मोदी… परराष्ट्र मंत्र्यांनी SCO परिषदेपासून ठेवले अंतर, कारण काय?

Web Title: Suicide attack in pakistans quetta on balochistan national party targeted 14 killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Ismail Azizi Tanzania : मृत्यूला हरवणारा टांझानियन इसम; सहा वेळा ‘मरण पावला’, पण प्रत्येक वेळी जिवंतच परतला
1

Ismail Azizi Tanzania : मृत्यूला हरवणारा टांझानियन इसम; सहा वेळा ‘मरण पावला’, पण प्रत्येक वेळी जिवंतच परतला

भारत, अमेरिका की जपान…; चीनच्या लष्करातील नव्या आधुनिक शस्त्रांचा धोका सर्वाधिक कोणाला? जाणून घ्या सविस्तर 
2

भारत, अमेरिका की जपान…; चीनच्या लष्करातील नव्या आधुनिक शस्त्रांचा धोका सर्वाधिक कोणाला? जाणून घ्या सविस्तर 

भारत अन् चीनशी नीट वागायचं! टॅरिफ वाढीवरून पुतिन यांनी अमेरिकेला सुनावलं, म्हणाले…
3

भारत अन् चीनशी नीट वागायचं! टॅरिफ वाढीवरून पुतिन यांनी अमेरिकेला सुनावलं, म्हणाले…

क्षणात नष्ट झालं सगळं! पाकिस्तानाच्या महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral
4

क्षणात नष्ट झालं सगळं! पाकिस्तानाच्या महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.