भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
SCO Summit India Delegation: नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान आणि चीनच्या दौऱ्यावरुन परतले आहेत. हे दोन्ही दौरे अत्यंत यशस्वी झाले असून सध्या याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. परंतु यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या दौऱ्यासाठी उपस्थित नव्हते, यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या अनुउपस्थितीबद्दल प्रश्न विचारला जात आहे.
गेल्या सात वर्षांपासून एस. जयशंकर भारताच्या परराष्ट्र धोरणात सक्रियपणे सहभाग घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेची आणि भारताच्या प्रदेशातील ब्रॅंडिगची पूर्ण जबाबादारी त्यांच्यावर असते, असे मानले जाते. यामुळे जपान आणि चीनच्या दौऱ्यादरम्यान त्यांची अनुपस्थिती अनेकांना खटकत आहे.
‘आम्ही धमक्यांना घाबरत नाही…; विक्ट्री डे परेडमध्ये जागतिक नेत्यांसमोर चीनचे लष्करी ताकदीचे प्रदर्शन
जयशंकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दित जपान आणि चीनमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. २००९ ते २०१३ मध्ये जयशंकर यांनी चीनमध्ये भारताचे राजदूत आणि १९९६ मध्ये त्यांनी जपानमध्ये उपराजदूत म्हणून कार्य केले आहे.
शिवाय परराष्ट्र मंत्री झाल्यानंतरही त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत अमेरिका दौऱ्यादरम्यान उपस्थिती दर्शवली आहे. मात्र यावेळी चीन आणि जपान दौऱ्यात जयशंकर यांना पंतप्रधान मोदींसोबत नसल्याने सोशल मीडियावर याची चर्चा सुरु झाली आहे.
शिवाय चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी देखील त्यांनी भारत आणि चीन संबंधावर चर्चा केली आहे. दोन्ही देशांच्या सहकार्य वाढवण्यावर ही चर्चा होती. तसेच मॉस्कोमध्ये भारत आणि रशिया दौऱ्यातही ते उपस्थित होते.
काही वृत्तसंस्थांनी एस. जयशंकर त्यांच्या आरोग्याचा कारणास्तव दौऱ्याला उपस्थित नव्हते असे म्हटले आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीवर अद्याप परराष्ट्र मंत्रालयाने कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. याच वेळी भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांना एस. जयशंर यांच्या पंतप्रधान मोदींच्या जपान चीन दौऱ्यातील अनुपस्थिती बाबत प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी त्यांनी यामागे जयशंकर यांची काही वैयक्तिक कारणे असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यांनी असेही म्हटले की, यातून कोणताही चुकीचा अर्थ काढणे योग्य नाही. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली परराष्ट्र धोरण ठरवले जाते. त्यानुसारच जयशंकर काम करतात असे सिब्बल यांनी सांगिले. तर दुसरीकडे सलमान खुर्शीद यांनी याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी याबाबत त्यांच्याकडे कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याचे सांगितले. हे त्यांच्यासाठीही आश्चर्यकारक होते असे त्यांनी म्हटले. यावरुन एस. जयशंकर यांच्या चीन आणि जपान दौऱ्यातील अनुपस्थितीचे कारण अद्याप अस्पष्टच राहिले आहे.
पुतिन यांचा पंतप्रधान मोदींना भेटीचा खास नजराणा; भारताला S-400 ची मिळणार आणखी एक खेप