Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुखोई ‘SU-35’ लढाऊ विमानावर गंभीर आरोप; भारतासाठी महत्त्वाचा इशारा, इजिप्तनेही केला करार रद्द

Su‑35 weak radar : रशियाच्या प्रसिद्ध सुखोई SU-35 लढाऊ विमानांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इजिप्तने 2018 मध्ये 24 SU-35 विमाने खरेदी करण्याचा करार रद्द केल्यानंतर तांत्रिक दोष समोर आले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 04, 2025 | 04:26 PM
Serious allegations against Sukhoi SU-35 fighter jet

Serious allegations against Sukhoi SU-35 fighter jet

Follow Us
Close
Follow Us:

Su‑35 weak radar : रशियाच्या प्रसिद्ध सुखोई SU-35 लढाऊ विमानांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इजिप्तने 2018 मध्ये केलेला 24 SU-35 विमाने खरेदी करण्याचा करार रद्द केल्यानंतर, आता या विमानातील गंभीर तांत्रिक दोष समोर आले आहेत. विशेष म्हणजे, रशिया हीच विमाने भारतासारख्या महत्त्वाच्या देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारताने ही विमाने का नाकारली यामागचे रहस्य उघड झाले आहे.

इजिप्तने SU-35 करार रद्द का केला?

इजिप्तच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, SU-35 विमानांमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी आढळून आल्या. विमानाचे Irbis-E रडार हे PESA (Passive Electronically Scanned Array) तंत्रज्ञानावर आधारित असून, ते आधुनिक AESA (Active Electronically Scanned Array) रडारच्या तुलनेत खूपच मागासलेले मानले जाते. आजच्या युगात राफेल आणि F-35 सारख्या विमानांमध्ये AESA रडार वापरले जात असून, ते अधिक अचूक, विश्वासार्ह आणि इलेक्ट्रॉनिक जामिंगविरोधात सक्षम असतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 5 जुलैची भविष्यवाणी खरी ठरणार?? दोन आठवड्यांत 1000हून अधिक भूकंप, जपानच्या टोकारा बेटांवर भीतीचं सावट

इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतेवरही प्रश्न

SU-35 मध्ये वापरण्यात आलेले AL-41F1S इंजिन उच्च शक्ती निर्माण करत असले तरी ते अत्याधिक उष्णता आणि आवाज निर्माण करते. त्यामुळे शत्रूच्या रडार किंवा इन्फ्रारेड सिस्टमना हे विमान सहजपणे सापडू शकते. यामुळे त्याची ‘स्टेल्थ’ (गुप्तता) क्षमता कमी होते. तसेच या विमानाची इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीही (Electronic Warfare System) अत्याधुनिक युद्धप्रणालींच्या तुलनेत फारच दुर्बल असल्याचे इजिप्तच्या लष्करी विश्लेषकांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकेच्या दबावाचीही भूमिका

इजिप्तने SU-35 चा करार रद्द करण्यामागे केवळ तांत्रिक कारणच नव्हते, तर अमेरिकेच्या CAATSA कायद्याअंतर्गत निर्बंधांची धमकी हीदेखील एक महत्त्वाची बाब ठरली. जर इजिप्तने रशियाकडून लढाऊ विमाने घेतली असती, तर दरवर्षी अमेरिकेकडून मिळणारी 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक लष्करी मदत धोक्यात आली असती. परिणामी, इजिप्तने करार रद्द करत रशियाला मोठा झटका दिला.

भारताकडे SU-35 विकण्याचा रशियाचा प्रयत्न

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताला SU-57 आणि SU-35 विकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, भारताकडून याबाबत अद्याप कोणताही उत्साह दाखवलेला नाही. भारतीय हवाई दलाने फ्रेंच राफेल लढाऊ विमानांची निवड करत रशियन प्लॅटफॉर्मवर अवलंबून न राहण्याचा संकेत दिला आहे. राफेलमध्ये वापरण्यात आलेले RBE2 AESA रडार आणि SPECTRA इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली या बाबतीत SU-35 पेक्षा अनेक पटींनी प्रगत आहेत.

रशियाच्या शस्त्रास्त्र उद्योगाची पडझड?

युक्रेन युद्धानंतर रशियाने आपल्या SU-35 ताफ्याचा जवळपास 40% भाग गमावल्याचे अहवाल सांगतात. रशियाने SU-35 विमाने इराणकडे वळवण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्या डिलिव्हरीतही विलंब होत आहे. त्यामुळे जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठेत रशियाच्या विश्वासार्हतेवर मोठा परिणाम झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भूकंपाचे 13 धक्के, 10 स्फोट… रशियाने युक्रेनची राजधानी कीववर अचानक डागले विनाशकारी क्षेपणास्त्र

इजिप्तच्या SU-35 करार

इजिप्तच्या SU-35 करार रद्दीकरणाच्या पार्श्वभूमीवर आता रशियन लढाऊ विमानांच्या गुणवत्ता आणि विश्वासार्हतेवर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. भारतासारखा देश जो उच्च दर्जाच्या लढाऊ विमानांच्या शोधात आहे, त्याने SU-35 पासून अंतर ठेवणे अधिक शहाणपणाचे ठरेल, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. पुतिन भारताला जी विमाने विकू इच्छितात, ती ‘रद्दी’ असल्याचा आरोप आता जोर धरत आहे – आणि हा आरोप केवळ राजकीय नाही, तर तांत्रिक कारणांवर आधारित आहे.

Web Title: Sukhoi su 35 under fire radar weak engine fails should india avoid it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • America
  • Egypt
  • international news
  • Russia

संबंधित बातम्या

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
1

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
2

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
3

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
4

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.