Russia fired missile on Kyiv : युक्रेन आणि रशियामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घटना घडली असून, रशियाने युक्रेनची राजधानी कीववर इतका भीषण आणि तीव्र हल्ला केला आहे की संपूर्ण शहर हादरून गेले आहे. रशियाच्या लोकल वृत्तसंस्थेनुसार, अवघ्या एका मिनिटात १० क्षेपणास्त्रे कीववर डागण्यात आली. या आक्रमणामुळे कीवमध्ये तब्बल १३ भूकंपाचे धक्के जाणवले असून, शहरात आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अमेरिकेच्या मदतीचा अंत आणि रशियाचा प्रहार
रशियाने हा हल्ला अमेरिकेच्या भूमिकेनंतर केला आहे. अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवला असून, या संधीचा लाभ घेत रशियाने कीववर आक्रमक पवित्रा घेतला आहे. कीव इंडिपेंडंटच्या रिपोर्टनुसार, रशियाने या हल्ल्यासाठी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्याच्या काही तास आधीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Independence Day 2025: जगाला पुरून उरणाऱ्या अमेरिकेवरही केलं होतं कोणीतरी राज्य; ‘असा’ आहे यामागचा रंजक इतिहास
प्रभाव आणि गंभीर जखमी
या भीषण हल्ल्यात आतापर्यंत किमान १९ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. हल्ल्यानंतर परिसरातील हवामान विषारी झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. नागरिकांना घरामध्ये राहण्याचे, खिडक्या-दारे बंद ठेवण्याचे आवाहन संरक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
युद्धाचा टोकाचा टप्पा
या हल्ल्यानंतर तज्ज्ञांचे मत आहे की युक्रेन-रशिया युद्ध एका निर्णायक आणि अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचले आहे. कीववर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच हल्ला करण्यात आला असून, या कृतीद्वारे रशियाने युक्रेनला चेतावणी दिली आहे. शहरातील आगीच्या ज्वाळा आणि जमिनीला झालेला कंप यामुळे सामान्य जनतेमध्ये भितीची लाट पसरली आहे.
रशियाचा रणनीती बदल
या हल्ल्यामुळे असे स्पष्ट होते की, रशिया आता युक्रेनला मनोबलाने कमकुवत करण्यासाठी आणि लवकर युद्ध समाप्तीसाठी अधिक आक्रमक धोरण स्वीकारत आहे. गेल्या काही दिवसांत युक्रेनने रशियाचे १० लाख सैनिक मारल्याचा दावा केला जात आहे, तसेच ४२० विमाने आणि ३४० हेलिकॉप्टर पाडल्याचेही सांगितले जाते. रशिया हे युद्ध अधिक काळ ओढण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे अमेरिकेच्या निष्क्रीयतेचा फायदा घेत, आता कीववरचा हल्ला म्हणजे पुतीन यांचा अंतिम दबावाचाच भाग असल्याचे मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सीमेवर चीनचे ‘राक्षस’ तैनात! मानवाऐवजी यंत्रांचा वापर; भारतासाठी समोर उभे ठाकले नवे सुरक्षा आव्हान
युक्रेनपुढे नव्या आव्हानांची मालिका
या हल्ल्यामुळे युक्रेनपुढे आता तिहेरी संकट निर्माण झाले आहे. देशाच्या संरक्षण यंत्रणेवरील ताण, नागरी जनतेचे प्रचंड मनोबल खच्चीकरण आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतीच्या अपेक्षांवर अनिश्चितता. या घटनेमुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्यासमोर नव्या व्यूहरचनेची गरज निर्माण झाली आहे. ही घटना केवळ युक्रेनच्याच नव्हे, तर संपूर्ण युरोपच्या सुरक्षिततेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.