
syria army sdf ceasefire extended us transferring isis prisoners to iraq 2026
Syria SDF ceasefire extension January 2026 : मध्यपूर्वेतील युद्धग्रस्त देश असलेल्या सीरियातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सीरियाचे (Syria) अंतरिम सरकार आणि कुर्दिश नेतृत्वाखालील सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (SDF) यांनी एकमेकांविरुद्ध सुरू असलेला संघर्ष १५ दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री संपणारी ४ दिवसांची युद्धबंदी आता १५ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. या निर्णयामागे केवळ सीरियाचे अंतर्गत राजकारण नसून, अमेरिकेचे एक मोठे ‘मिशन’ लपलेले आहे.
सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, ही युद्धबंदी वाढवण्यामागे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेला सहकार्य करणे आहे. सध्या ईशान्य सीरियातील तुरुंगात सुमारे ९,००० इस्लामिक स्टेट (IS) चे खतरनाक दहशतवादी आहेत. सीरियातील अस्थिरतेमुळे हे दहशतवादी तुरुंग तोडून पळून जाण्याची भीती अमेरिकेला सतावत आहे. त्यामुळे, अमेरिकन सैन्य यातील किमान ७,००० कैद्यांना सुरक्षितपणे इराकमधील हाय-सिक्युरिटी तुरुंगात हलवण्याचे काम करत आहे. या हालचालींसाठी सुरक्षित मार्गाची गरज असल्यानेच ही १५ दिवसांची युद्धबंदी अत्यंत कळीची ठरली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Crisis: शी जिनपिंग यांचा जीव धोक्यात? भ्रष्टाचाराच्या नावाखाली स्वतःच्याच सैन्याचा नरसंहार; चीनमध्ये सत्तास्थैर्याला हादरा
रक्काजवळील अल-अक्तान (Al-Aqtan) तुरुंग हा या युद्धातील सर्वात संवेदनशील भाग ठरला आहे. शुक्रवारी या तुरुंगाचा ताबा सीरियन सैन्याने घेतला असून, तेथील १८ वर्षांखालील १२६ मुलांना मुक्त करून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तुरुंगात असलेल्या हजारो आयएसआयएस (ISIS) लढाऊंच्या सुरक्षेची जबाबदारी आता सीरियन सरकारकडे जात असली तरी, अमेरिका त्यांना इराकमध्ये नेण्यावर ठाम आहे. बुधवारी अमेरिकेने पहिल्या १५० कैद्यांना इराकमध्ये यशस्वीरित्या हलवल्याची पुष्टी केली आहे.
Breaking | Syrian Ministry of Defense 📍 We announce the extension of the ceasefire across all operational sectors of the Syrian Arab Army for an additional 15 days, effective starting at 23:00 on January 24, 2026. 📍 The extension comes in support of the U.S.-led operation to… pic.twitter.com/xX76yB43oj — ZamanAlwsl (@zamanalwslEN) January 24, 2026
credit – social media and Twitter
सीरियाचे अध्यक्ष अहमद अल-शारा आणि एसडीएफ प्रमुख मज्लूम अब्दी यांच्यात मार्च २०२५ मध्ये एक करार झाला होता. या करारानुसार, ‘एसडीएफ’ने आपल्या ताब्यातील तेल क्षेत्रे आणि शहरे सरकारला सोपवायची होती आणि बदल्यात त्यांच्या ५०,००० लढवय्यांना सरकारी सैन्य आणि पोलिसांत सामावून घ्यायचे होते. मात्र, हे सैनिक गट म्हणून सामील होतील की वैयक्तिक, यावरून चर्चा फिसकटली होती. आता नव्या वाटाघाटींनुसार, या सैनिकांना ‘वैयक्तिक’ स्तरावर भरती करण्यात येणार आहे, ज्यामुळे कुर्दिश सैन्याची सामूहिक ताकद कमी होण्याची भीती त्यांना वाटत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Press Freedom: पाकिस्तानात ‘कलम’ बनली गुन्हेगार! प्रेस स्वातंत्र्याची गळचेपी; पत्रकारांविरुद्ध 12,000 खटले दाखल
एसडीएफने निवेदनात म्हटले आहे की, जरी ते युद्धबंदीचे पालन करत असले, तरी सीरियन सैन्य सातत्याने रसद आणि लष्करी ताकद वाढवत आहे. जर १५ दिवसांच्या या मुदतीत राजकीय तोडगा निघाला नाही, तर सीरियात पुन्हा एकदा भीषण गृहयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. रशिया आणि इराण सीरियन सरकारला पाठिंबा देत असताना, अमेरिका आता थेट संघर्षाऐवजी केवळ आयएसआयएसच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.
Ans: मुख्यत्वे अमेरिकन सैन्याला ईशान्य सीरियातील तुरुंगातून ९,००० इस्लामिक स्टेट (ISIS) कैद्यांना इराकमध्ये सुरक्षितपणे हलवता यावे, यासाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे.
Ans: सीरियन सैन्याने या तुरुंगाचा ताबा घेतला असून तेथील अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे. तसेच तेथील दहशतवाद्यांना इराकमध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Ans: कुर्दिश सैनिकांचे (SDF) सरकारी लष्करात विलीनीकरण कसे करावे, यावरून हा वाद आहे. सरकारला ते वैयक्तिक स्तरावर हवे आहेत, तर एसडीएफला आपली वेगळी ओळख टिकवायची आहे.