इराणच्या सीमेजवळ का पाठवले गेले ७,००० इस्लामिक स्टेट दहशतवादी? वाचा सविस्तर... ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
US moving 7000 ISIS fighters Syria to Iraq 2026 : पश्चिम आशियातील राजकारण आणि सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. अमेरिकन लष्कराच्या ‘सेंट्रल कमांड’ने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, सीरियातील विविध तुरुंगांमध्ये कैद असलेल्या ७,००० इस्लामिक स्टेट (ISIS) दहशतवाद्यांना शेजारील देश इराकमध्ये हलवण्यात येत आहे. यातील पहिल्या १५० अट्टल दहशतवाद्यांची तुकडी बुधवारी हसाका प्रांतातून इराकी सीमेवर पोहोचली आहे. मात्र, इराणच्या सीमेजवळ या दहशतवाद्यांना नेण्यामागे अमेरिकेचा काय उद्देश आहे, यावरून जागतिक स्तरावर चर्चा रंगू लागली आहे.
सीरियातील परिस्थिती सध्या अत्यंत अस्थिर आहे. गेल्या काही दिवसांत सीरियन सरकारी सैन्य आणि अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या कुर्दिश नेतृत्वाखालील ‘एसडीएफ’ (SDF) यांच्यात संघर्ष तीव्र झाला आहे. या गोंधळाचा फायदा घेऊन आयसिसचे दहशतवादी तुरुंग फोडून पळून जाण्याची भीती अमेरिकेला वाटत आहे. नुकत्याच झालेल्या एका घटनेत सुमारे २०० कनिष्ठ दर्जाचे दहशतवादी शदादी (Shaddadi) तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ७,००० ‘हाय-रिस्क’ दहशतवाद्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणे अमेरिकेसाठी अनिवार्य ठरले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-EU Summit 2026: युरोपची मोठी कबुली! ‘भारताशिवाय आमचा व्यापार चालूच शकत नाही’; प्रजासत्ताक दिनापूर्वी आनंदाची बातमी
हे ७,००० दहशतवादी केवळ सामान्य गुन्हेगार नाहीत, तर त्यातील अनेक जण जगभरातील दहशतवादी हल्ल्यांचे मास्टरमाईंड आहेत. त्यांना इराकमधील ज्या केंद्रांमध्ये हलवले जात आहे, ती ठिकाणे इराणच्या सीमेपासून फार लांब नाहीत. इराक सरकारने या हालचालीला अधिकृत मान्यता दिली असून, हे दहशतवादी इराकी कायदे आणि आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली असतील असे स्पष्ट केले आहे. मात्र, इराणने आपल्या सीमेजवळ इतक्या मोठ्या संख्येने आयसिस दहशतवाद्यांच्या उपस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
The US military said up to 7,000 people will be moved from a detention facility in Hasakah, Syria to to a secure location in Iraq https://t.co/CuTmHDGKbw pic.twitter.com/VjolwcQdCY — Al Jazeera English (@AJEnglish) January 22, 2026
credit – social media and Twitter
सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शरा आणि एसडीएफ यांच्यात नुकताच युद्धबंदीचा करार झाला आहे. या करारानुसार, ईशान्य सीरियातील तुरुंगांची जबाबदारी आता सीरियन सरकारकडे जाणार आहे. मात्र, अमेरिकेला सीरियन प्रशासनाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास नसल्याने त्यांनी तातडीने हे ‘एअरलिफ्ट’ ऑपरेशन राबवले. अमेरिकेचे अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी म्हटले आहे की, “दहशतवाद्यांचे सुरक्षित हस्तांतरण हे केवळ अमेरिकेसाठीच नाही, तर संपूर्ण प्रादेशिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Gold India: ट्रम्प यांचे निर्बंध हवेत विरले! रशियाने भारतासाठी उघडली सोन्याची खाण; तेलावरच्या ‘टॅरिफ वॉर’ला सडेतोड उत्तर
२०१७ मध्ये इराक आणि २०१९ मध्ये सीरियातून आयसिसचा भौतिक पराभव झाला असला तरी, या संघटनेचे ‘स्लीपर सेल्स’ अजूनही सक्रिय आहेत. जर हे ७,००० दहशतवादी पळाले, तर ते पुन्हा एकदा या प्रदेशात रक्ताचा सडा घालू शकतात. म्हणूनच अमेरिका कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. या ऑपरेशनमुळे इराक आणि इराणमधील सीमेवर कडक लष्करी पहारा वाढवण्यात आला असून, जगाचे लक्ष आता या ‘मृत्यूच्या साठ्याच्या’ नव्या पत्त्याकडे लागले आहे.
Ans: सीरियातील सुरक्षा व्यवस्था ढासळल्यामुळे आणि तुरुंग फोडून दहशतवादी पळून जाण्याची दाट शक्यता असल्यामुळे अमेरिकेने त्यांना सुरक्षित इराकी तुरुंगात हलवले आहे.
Ans: या दहशतवाद्यांना इराकमधील अत्यंत सुरक्षित लष्करी केंद्रांमध्ये ठेवले जाणार आहे, जे इराक-इराण सीमेजवळ आहेत.
Ans: आपल्या सीमेजवळ इतक्या मोठ्या संख्येने आयसिस दहशतवादी असल्याने इराणला सुरक्षेच्या कारणास्तव आपला लष्करी पहारा वाढवावा लागला असून, तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.






