दमास्कस: सीरियात विद्रोही गटांनी बशर असदची सत्ता काबीज केल्यानंतर ताणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या असद आणि त्यांच्या कुटूंबीयांनी रशियामध्ये आश्रय घेतला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिनयांनी असद आणि त्यांच्या कुटूंबीयांना मानतावादी अधिकारावर आश्रय दिला आहे. मात्र, सीरियातील परिस्थिती गंभीर असून सत्तापालटानंतरही अशांतता आणि हिंसाचाराचे वातावरण आहे. दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सीरियातील नागरिकांसाठी एक ॲडव्हायझरी जारी केले आहे.
ऊारतीय परराष्ट्रमंत्रालयाने या ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, सर्व भारतीय नागरिकांना त्वरित उपलब्ध प्लाइटने देशात परतावे. तसेच सीरियातील भारतीय नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. सर्व नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने सीरियातील भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आपात्कालीन हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेल आयडी देखील जारी केला आहे. तसेच सर्व भारतीयांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोकांना सीरिया आणि त्याच्या आसपासच्या देशात प्रवास टाळण्याचा देखील आदेश देण्यात आला आहे.
Our statement on developments in Syria:https://t.co/GDlVeR0GOU pic.twitter.com/bKYOvcfswg
— Randhir Jaiswal (@MEAIndia) December 9, 2024
दमास्कस बंडखोरांच्या ताब्यात
सीरियाची राजधानी दमास्कसवर ताबा मिलवल्यानंतर राष्ट्रपती भवनात लुटमारीच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच सीरियातील नवीन राजकीय परिस्थितीमुळे दमास्कमध्ये हिंसाचार आणि अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या सीरियाची सत्ता एचटीए या दहशतवादी गटाच्या नियंत्रणाखाली आहे, परंतु पूर्णतः हस्तांतरित झालेली नाही.
राष्ट्राध्यक्ष असद यांच्या पळून गेल्यानंतर पंतप्रधान मोहम्मद गाझी अल-जलाली यांनी शांततेने सत्ता हस्तांतरणाचे आश्वासन दिले आहे. अल-जोलानी यांनीदेखील आपल्या सैन्याला सार्वजनिक स्थानांवरून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. नव्या सरकारची अधिकृत रचना पूर्ण होण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता आहे. सत्तांतराच्या प्रक्रियेमुळे देशातील अस्थिरता अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सीरियाचे भविष्य काय असे यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
इस्त्रायलचा आणि अमेरिकेचा सीरियावर हल्ला
काल इस्त्रायलने सीरियातील संशयित रासायनिक शस्त्रास्त्रे आणि लांब पल्ल्यांच्या रॉकेट्सच्या ठिकाणांवर हे हल्ले केले असल्याची माहिती समोर आली आहे. इस्त्रायलच्या आणि त्याच्या नागरिकांच्या सुरक्षा हे त्यांचे या हल्ल्यांचे उद्दिष्ट आहे. या कारवाईतून त्यांनी दहशतवादी गटांचा हाती ही शस्त्रे लागू नयेत म्हणून या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे.
इस्त्रायलच्या हल्ल्यांबरोबर अमेरिकेने देखील सीरियावर बॉम्ब हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, इस्लामिक स्टेटचा पुन्हा उद्यय होऊ शकतो, या कारणाने हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमुळे दहशतवादी गटांचे मोठे नुकसान झाले आहे.