Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

Taiwan-China : तैवानजवळ चीनच्या १४ लष्करी विमानांसह ७ नौदल जहाजे आणि एका अधिकृत जहाजाची हालचाल नोंदवण्यात आली. यातील ९ विमानांनी तैवानच्या ADIZ मध्ये प्रवेश केला. चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तैवानने विमाने, नौदल आणि किनारी क्षेपणास्त्र यंत्रणा सक्रिय केली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 07, 2026 | 08:21 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • १४ चिनी विमानांची तैवानजवळ हालचाल
  • तैवानकडून लढाऊ विमाने, नौदल आणि क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात
  • चीन-तैवान संघर्षाचा धोका पुन्हा चर्चेत
Taiwan-China :तैवानच्या आसपास चीनच्या लष्करी हालचालींमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे समोर आले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) १४ विमानांनी तैवानच्या हवाई परिसरात हालचाल केल्याची माहिती समोर आली आहे.

यातील ९ विमानांनी तैवानच्या उत्तर, मध्य आणि नैऋत्येकडील एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनमध्ये (ADIZ) प्रवेश केला. त्याचवेळी चीनच्या नौदलाची ७ जहाजे आणि एक अधिकृत जहाजही तैवानच्या आसपास आढळून आले. त्यामुळे तैवानच्या सुरक्षाव्यवस्थेने सतर्कता वाढवली आहे.

१४ चिनी विमानांची तैवानजवळ हालचाल

तैवानच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर सकाळी ६ वाजल्यापासून ७ ऑक्टोबर सकाळी ६ वाजेपर्यंत चीनच्या १४ लष्करी विमानांची हालचाल नोंदवण्यात आली. यातील ९ विमानांनी तैवानच्या उत्तर, मध्य आणि नैऋत्येकडील ADIZ मध्ये प्रवेश केला.

चीनकडून तैवानभोवती सातत्याने अशा प्रकारच्या लष्करी गस्त घातल्या जात असल्याने तैवानसाठी ही परिस्थिती आता नवी राहिलेली नाही. मात्र, विमानांची संख्या आणि त्यांची विविध दिशांमधील हालचाल यामुळे तणाव कायम आहे.

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!

तैवानकडून लढाऊ विमाने, नौदल आणि क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात

चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तैवाननेही आपली लष्करी यंत्रणा सक्रिय केली. तैवानच्या हवाई दलातील गस्तीची विमाने, नौदलाची जहाजे तसेच किनारपट्टीवरील क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करण्यात आली.

चीनच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात असून कोणत्याही संभाव्य धोक्याला उत्तर देण्यासाठी तैवानची संरक्षण यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही काळापासून चीनकडून तैवानच्या आसपास विमान आणि नौदलाच्या माध्यमातून दबाव वाढवण्याची रणनीती दिसून येत आहे.

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

चीन-तैवान संघर्षाचा धोका पुन्हा चर्चेत

तैवानला चीन आपला अविभाज्य भाग मानतो आणि बेटावर नियंत्रण मिळवण्यासाठी गरज पडल्यास बळाचा वापर करण्याचा पर्यायही बीजिंगने कायम खुला ठेवला आहे. दुसरीकडे, तैवान स्वतःचे सरकार, सैन्य आणि स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था चालवतो.

त्यामुळे तैवानचा प्रश्न हा आशिया-पॅसिफिकमधील सर्वात संवेदनशील मुद्द्यांपैकी एक मानला जातो. चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींमुळे अमेरिका, जपान आणि इतर देशांचेही या भागातील घडामोडींवर लक्ष आहे. सध्या चीनकडून मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू झाल्याचे संकेत नसले तरी तैवानभोवती वाढलेली लष्करी उपस्थिती भविष्यातील तणावाची शक्यता कायम ठेवत आहे.

Web Title: Taiwan china chinese military activity near taiwan incursion by 8 ships and 14 fighter jets tensions rise cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • China
  • Marathi News
  • Taiwan
  • World news

संबंधित बातम्या

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
1

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!
2

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!
3

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!

Pechora S125 : F-35 ला पाडणारे रशियन क्षेपणास्त्र आता मोबाईल लाँचरवर; जाणून घ्या भारताला कसा होणार मोठा फायदा
4

Pechora S125 : F-35 ला पाडणारे रशियन क्षेपणास्त्र आता मोबाईल लाँचरवर; जाणून घ्या भारताला कसा होणार मोठा फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.