
Alien Ship, Astrophysicist Avi Loeb
जर कोणी तुम्हाला सांगितलं की “२९ ऑक्टोबरच्या आधी तुमचा विनाश होणार आहे”, तर तुमचा पहिला रिऍक्शन काय असेल? घाबराल? हसाल? की विचार कराल की खरंच असं काही घडू शकतं का? पण हे सांगणारे कोणीतरी इंटरनेटवरील अफवा नाहीत तर हार्वर्ड विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ एव्ही लोएब आहेत! त्यांनी एक धक्कादायक दावा केला आहे की पृथ्वीच्या दिशेने एक एलियन शिप येत आहे आणि २९ ऑक्टोबरनंतर मानव आणि एलियन यांच्यात “स्टार वॉर” सुरु होऊ शकतो.
‘डेली स्टार’ या इंग्रजी वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यापासून मॅनहॅटन इतक्या मोठ्या आकाराची गूढ वस्तू (interstellar object) अंतराळात वेगाने फिरत आहे. या वस्तूला 3I/ATLAS असे नाव देण्यात आले आहे. लोएब यांच्या मते ही वस्तू साधा धूमकेतू नसून, ती एलियन तंत्रज्ञान असलेली शिप असू शकते.
एवढा निष्काळजीपणा! प्रवाशांचा जीवघेणा प्रवास पाहून येईल तुमच्याही अंगावर काटा
या शिपचं वजन सुमारे ३३ अब्ज टन असून ती प्रकाशाच्या वेगाच्या दुप्पट वेगाने फिरत आहे. विशेष म्हणजे ती निकेल टेट्राकार्बोनिल नावाचं मिश्रधातू बाहेर फेकत आहे — जे निसर्गात आढळत नाही, तर फक्त मानव निर्मित औद्योगिक धातू आहे. त्यामुळे लोएब यांच्या मते ही वस्तू नैसर्गिक धूमकेतू नसून तंत्रज्ञानयुक्त एलियन यान असू शकते.एव्ही लोएब यांनी सांगितलं की २९ ऑक्टोबरच्या आधी सुट्टी घ्या, कारण त्या नंतर या वस्तूचं सूर्याजवळील जवळचं स्थान (perihelion) येणार आहे. त्यांच्या मते, जर ते खरंच एलियन यान असेल, तर तेव्हाच काही मोठं घडू शकतं. त्यामुळे त्यांचा हा सल्ला सध्या चर्चेत आहे.
ये कौन सा ब्रॅंड है? तरुणीने ऑनलाइन मागवली चप्पल
तथापि, NASA आणि इतर वैज्ञानिक संस्था या दाव्याशी सहमत नाहीत. त्यांच्यानुसार, ही वस्तू एक अंतरिक्षीय धूमकेतू असू शकते ज्याचे रासायनिक गुणधर्म वेगळे आहेत, पण ते परग्रहवासी यानाचे पुरावे नाहीत.म्हणूनच लोकांनी घाबरण्याचं काही कारण नाही. विज्ञान हे निरीक्षण आणि पुराव्यांवर चालतं — आणि सध्या तरी एलियन शिपचे ठोस पुरावे नाहीत. मात्र एवढं नक्की — जर तुम्हाला सुट्टी घ्यायचीच असेल, तर २९ ऑक्टोबरपूर्वी घेणं वाईट ठरणार नाही!