Taliban Foreign Minister trip to India
India Afhganistan Relation : काबूल : भारत आणि अफगाणिस्तानचे संबंधामध्ये गेल्या काही काळापासून सुधारत आहेत. पाकिस्तानविरोधी घटनांमुळे यामध्ये सुधारणा झाली आहे. याच वेळी अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर येणार आहेत. यासाठी दिल्लीमध्ये भेटीचे नियोजनही करण्यात आले असून भारताने त्यांना निमंत्रण पाठवले आहे. मुत्ताकी यांचा हा दौरा पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक मानला जात जात आहे.
अफगाण माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान मुत्ताकी यांचा भारत दौरा होणार आहे. सध्या भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेला तालिबान परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांना प्रवास सुट देण्यासाठी विनंती केली आहे. यापूर्वी त्यांचा पाकिस्तानचा दौरा होणार होता, परंतु संयुक्त राष्ट्राने याला नकार दिला. आता भारताची विनंतीवर संयुक्त राष्ट्र सध्या विचार करत आहे.
ऑस्ट्रेलिया इराणवर संतापला; राजदूताला देश सोडण्याचे दिले आदेश, कारण काय?
सध्या त्यांच्या परदेश दौऱ्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या परिषदेकडे प्रवास बंदी हटवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेने तालिबानच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर परदेश प्रवासावर बंदी घातली आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांचाही समावेश आहे. UN च्या निर्बंधांमुळे परदेशी प्रवास करण्यासाठी त्यांना आधी परवानगी घ्यावी लागते. यूएनकडून परवानगी मिळाल्यानंतरच तालिबानी अधिकारी परदेशात प्रवास करु शकतात. परंतु गेल्या काही महिन्यात यूएनने निर्बंध कडक केले आहेत.
सध्या मुत्ताकी यांचा भारत अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. कारण अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यानंतर हा परराष्ट्र मंत्र्यांचा पहिलाच भारत दौरा होणार होता. शिवाय या भेटीदरम्यान क्षेत्रीय सुरक्षा, व्यापार, संपर्क आणि नागरिकांमध्ये दळण-वळण यावर चर्चा होणार आहे. अफगाणिस्तान आणि भारतामधील संबंध मजबूत होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते हा दौरा पाकिस्तानसाठीही मोठा राजनैतिक धक्का आहे. कारण पाकिस्तानने भारत आणि तालिबानला धमक्या दिल्या आहेत. शिवाय दोन्ही देशांवर दबाव आणण्याचाही पाकिस्तान प्रयत्न करत आहे. अशा परिस्थिती भारत-तालिबानचे संबंध पाकिस्तानसाठी चिंताजनक ठरतील. यापूर्वी तालिबानचे एक प्रतिनिधी मंडळ भारतात येऊन गेले आहे.
पण यावेळी हा अधिृत दौरा नव्हता. यामुळे यावेळी अमीर खान मुत्ताकी यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सध्या संयुक्त राष्ट्राच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता संयुक्त राष्ट्र परिषद (UNSC) काय निर्णय घेईल हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. सध्या सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीत पेटला धार्मिक वाद? प्रचारासाठी ट्रम्प समर्थकाने जाळले थेट कुराण, VIDEO