अमेरिकेच्या निवडणुकीत पेटला धार्मिक वाद? प्रचारासाठी ट्रम्प समर्थकाने जाळले थेट कुराण, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America news in Marathi : टेक्सास : एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील टेक्सास रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार व्हॅलेंटिना गोमेझ यांनी एक धक्कादायक असे कृत्य केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर कुराण जाळताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून त्यांनी टेक्सासमधून मुस्लिम संस्कृती नष्ट करण्याचे म्हटले आहे.
व्हॅलेंटिना गोमेझ यांनी अग्निशमन बंदुकने इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण पेटवले. त्यांनी म्हटले की, ‘मी टेक्सासमध्ये इस्लामिक संस्कृतीचा नाश करेन. हे देवा मला मदत कर. मुस्लिम लोक ख्रिश्चन देशांवर कब्जा करत असल्याचा व्हॅलेंटिनाने आरोप केला आहे. तसेच मुस्लिम लोक लैंगिक हिंसाचार आणि हत्याकांड करत असल्याचेही व्हॅलेंटिनाने म्हटले आहे. सध्या गोमेझ यांच्या या व्हिडिओने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
व्हॅलेंटिना गोमेझ २०२६ च्या टेक्सासमध्ये होणाऱ्या ३१ व्या कॉंग्रेसनल डिस्ट्रिक्टसाठी निवडणूका होणार आहेत. यासाठी रिपब्लिकन उमेदवार व्हॅलेंटिना गोमेझ निवडणूकीसाठी उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी लोकांना मतदान करण्याचे आणि त्यांना संसदेपर्यंत पोहोचण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे त्यांना मुस्लिम लोकांना नष्ट करता येईल. त्यांना देशातून हाकलून देता येईल असे त्यांनी म्हटले आहे.
Texas candidate Valentina Gomez has released a new campaign ad of her lighting the Islamic Quran on fire, saying Islam must be stopped “once and for all.”
“Muslims can f*** off to any of the 57 Muslim nations.I will end Islam in Texas,” https://t.co/MnxApLLV6c
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) August 26, 2025
यापूर्वी स्थलांतरितांना फाशी देण्याची मागणी केली होती
व्हॅलेंटिना नेहमी विवादात राहिल्या आहेत. यापूर्वी त्यांनी स्थालांतरितांना फाशी देण्याची मागणी केली होती. याचाही एक व्हिडिओ बनवण्यात आला होता. ज्यामध्ये व्हॅलेंटिना एका डमीला गोळी मारण्याचे नाटक करत होती. तिने अमेरिकन लोकांविरोधात गुन्हे करणाऱ्यांना सार्वजनिक फाशी देण्यात यावी असे म्हटले होते. तिच्या अशा प्रकारच्या भडकाऊ विधानांमुळे आणि व्हिडिओंमुळे मोठ्या प्रमाणात खळभळ उडाली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे व्हिडिओ हटवून अकाऊंटही ब्लॉक करम्यात आले होते. अमेरिकेतील अनेक लोकांनीही तिला विरोध केला होता.
तिने LGBTQ+ समुदायची पुस्तकेही जाळण्याचा व्हिडिओ बनवला होता. याचा मुलांवर वाईट परिणाम होत असल्याचे तिने म्हटले होते. यामुळेच तिला मतदारांचा पाठिंबा मिळू शकला नाही. पण तरीही तिने पुन्हा तसेच कृत्य केले आहे.तिच्या अशा कृत्यांमुळे तिचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहेत.
व्हॅलेंटिना एक रिअल इस्टेट गुंतवणूकदार, वित्तपुरवठादार आणि राजकीय कार्यकर्त्या असून नेमहमीच वादात राहिल्या आहेत. व्हॅलेंटिना गोमेझचा जन्म ८ मे १९९९ मध्ये कोलंबियात झाला होता. २००९ मध्ये तिचे कुटुंब अमेरिकेच्या न्यूजर्सीमध्ये स्थायिक झाले. व्हॅलेंटिनाचे शिक्षण सेंट्रल कनेक्टिकट स्टेट युनिव्हर्सिटीत झाले आहे.
ऑस्ट्रेलिया इराणवर संतापला; राजदूताला देश सोडण्याचे दिले आदेश, कारण काय?