तालिबानला मान्यता देणार का भारत? काबूलमध्ये दूतावास पुन्हा सुरु झाल्याने चर्चांणा उधाण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India Taliban Relations : काबूल/ नवी दिल्ली : एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताने अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल येथील दुतावास पुन्हा सुरु केला आहे. हा निर्णय भारत आणि तालिबान (Taliban) संबंधासाठी नवा टप्पा मानला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत अफगाणिस्तानमध्ये तांत्रिक मिश राबवत होते, आता याला अधिकृत दूतावासाचा दर्जा देण्यात आला हे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याची माहिती दिली.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये दुतावास पुन्हा सुरुच करण्यामागे अफगाणिस्तानच्या सर्वांगीण विकास, मानवी मदत आणि क्षमता विकासाला चालना देणे आणि अधिक मजबूत करणे आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दूतावासाचे नेतृत्त्व एका वरिष्ठ राजनियक अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आले आहे. चार्ज द अफेअर्स म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले आहे.
हा निर्णय अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमिर मुत्तकी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या १० ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयामुळे भारत आणि अफगाणिस्तानमधील राजनैतिक संबंध पुन्हा औपचारिकरित्या प्रस्थापित झाले आहे. परंतु सध्या भारताच्या या निर्णयामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आहे. भारत तालिबान सरकारला अधिकृत मान्यता देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
India restoring the status of its Technical Mission in Kabul to that of Embassy with immediate effect. pic.twitter.com/ISnkIz0DQw — Rajat Pandit (@rajatpTOI) October 21, 2025
पाकिस्तानचा भारतावर गंभीर आरोप
दरम्यान याच वेळी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष सुरु आहे. यावेळी पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत सुरु असलेल्या संघर्षासाठी भारताला जबाबदार धरले आहे. परंतु अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
त्यांनी स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान- अफगाण संघर्षामध्ये भारताचा कोणताही हात नाही. त्यांनी म्हटले की, आम्ही स्वतंत्र्य राष्ट्र आहोत आणि कोणतीही परदेशी शक्ती आम्हाला आमच्या भूभागाचा वापर करण्याची परवानगी देत नाही. भारत आणि पाकिस्तानसोबत असलेले संबंध हे केवळ राष्ट्रीय हिंतावर आधारित आहे.
काही दिवसांपूर्वी देखील पाकिस्तानचे संरक्षणमंत्री आसिफ ख्वाज यांनी अमीर मुत्ताकी यांच्या भारत भेटीवर भारतावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दावा केला होता की, अमीर मुत्ताकी यांच्या भेटीवरुन लक्षात येते की, पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये घडणाऱ्या घटनांमागे भारताचा हात आहे. त्यांच्या मते, तालिबान भारताच्या प्रभावाखाली नेतृत्त्व करत आहे. भारताने या आरोपांना तीव्र उत्तर देत पाकिस्तान त्यांच्या अपयशासाठी स्वत:च जबाबदार असल्याचेही म्हटले होते.
सध्या या सर्व घटनांमुळे पाकिस्तान आणि भारतातील तणाव पुन्हा वाढत आहे. यामुळे दक्षिण आशियामध्ये अस्थिरता निर्माण होत आहे. भारत अफगाणिस्तानमध्ये आपली उपस्थिती वाढवून राजनैतिक संतुलनाचा प्रयत्न करत आहे. परंतु पाकिस्तानच्या अशी डावेपचांमुळे परिस्थिती बिघडत आहे.
America Shutdown : २२ दिवसानंतरही अमेरिकेत शटडाऊन ; सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम