
Teachers Student Protest against yunus government before general election
Bangladesh news in Marathi : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) पुन्हा एकदा मोठा गोंधळ सुरु झाला आहे. शेख हसीनानंतर (Sheikh Hasina) आता युनूसविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थी अंतरिम सरकारविरोधात निषेध करत आहे. या आंदोलनाने मोठे रुप घेतले आहे. यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर वॉटर कॅनन आणि अश्रुधुरांचा वापर, लाठीचार्ज केला आहे.
‘बांगलादेश सरकार त्यांच्या नियंत्रणाखाली नाही…’ ; शेख हसीना यांचा मोहम्मद युनूसबद्दल मोठा दावा
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, या आंदोलनाची सुरुवात प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पगारवाढीच्या मागणीसाठी झाली होती. परंतु पोलिसांच्या कारवाईमुळे या आंदोलनाने तीव्र रुप घेतले. आंदोलकांवर पाण्याच्या तोफांचा, अश्रुधुराचा, ध्वनी ग्रेनेडचा वापर करण्यात आला. यामुळे डझनभर लोक जखमी झाले होते.
तसेच मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) सरकारने प्राथमिक शाळांमध्ये संगीत आणि शीरीरिक शिक्षण विषयांच्या शिक्षकांना काढून टाकले. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळला होता. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळला होता. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिसांनी बलाचा वापर केला. यामुळे काही अहवालांमध्ये १०० हून अधिक लोक जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे.
बांगलादेशच्या प्रायमरी टीचर्स असोसिएशनच्या यनेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झाली होती. शिक्षकांनी अंतरिम सरकारसमोर काही मागण्या मांडल्या होता. शिक्षकांनी म्हटले की, त्यांच्या पगारात १९९० च्या दशकापासून वाढ झालेली नाही. सध्या महागाई आणि खर्च प्रचंड वाढला आहे. यामुळे आमचा पगार वाढवण्यात यावा. एका शिक्षिकेने म्हटले की, आम्ही मुलांना शिकवतो आणि स्वत: उपाशी राहतो. यामुळे शिक्षकांनी ५०% वेतन वाढीची मनागणी केली आहे. बऱ्याच काळापासून ही मागणी केली जात आहे.
ही मागणी पूर्व होत नसल्यानेच आंदोलनाला सुरुवात झाली होती. परंतु पोलिसांनी बलाचा वापर करुन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी म्हटले की, आंदोलन कर्त्यांनी वाहतूक अडवून ठेवली होती. यामुळे त्यांनी कारवाई केली. पण शिक्षण आणि विद्यार्थ्यांनी असे काहीही झाले नसल्याचे म्हटले आहे. कारण निदर्शनांमध्ये बहुतेक करुण वृद्ध आणि महिला शिक्षिका होत्या.
सध्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात आणि सोशल मीडियावर #TeachersRightsBD हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. नागरिक सरकारच्या भूमिकेवर टीका करत आहे. बांगलादेशातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शिवाय येत्या वर्षात २०२६ फेब्रुवारीमध्ये बांगलादेशच्या निवडणुका होणार आहेत. अशी परिस्थितीत एका बाजूला पक्षांची युनूस सरकारवरील टीका आणि शिक्षक-विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे गोंधळ उडाला आहे. शिक्षकांनी देशव्यापी संप पुकारला जाईल असेही म्हटले आहे. बांगलादेशात बेरोजगारी, महागाई, गरीबी यांसारख्या गोष्टींमुळे देखील जनतेमध्ये रोष आहे.
बांगलादेशची धुरा डोनाल्ड ट्रम्पच्या हाती? आंतरराष्ट्रीय राजकारणात उडाली एकच खळबळ
Ans: बांगलादेशात युनूस सरकारविरोधात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे गोंधळ सुरु आहे.
Ans: बांगलादेशात प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पगारवाढीच्या मागणीसाठी आणि संगीत आणि शीरीरिक शिक्षण विषयांच्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केल्याच्या कारणाने आंदोलन सुरु आहे,
Ans: आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी बांगलादेश पोलिसांनी आंदोलकांवर वॉटर कॅनन आणि अश्रुधुरांचा वापर, लाठीचार्ज केला आहे.