बांगलादेशची धुरा डोनाल्ड ट्रम्पच्या हाती? आंतरराष्ट्रीय राजकारणात उडाली एकच खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करतोय अमेरिका?
नुकतेच अमेरिकेने बांगलादेशची राजधानी ढाका येथे गैर-सरकारी संस्था, इंटरनॅशनल रिपल्बिकन इन्स्टिट्यूट(IRI) आणि नॅशन डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूट (NDI) पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या आहेत. या संस्थांनी दावा केला आाहे की, त्यांचा उद्देश बांगलादेशातील लोकशाही मजबूत करणे आणि निवडणुकांची पारदर्शकता वाढवणे आहे. परंतु बांगलादेशच्या राजकीय तज्ज्ञांच्या मते या संस्था अमेरिकेच्या राजकीय अजेंडाचा भाग आहेत. या संस्था बांगलादेशच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या IRI आणि NDI संस्थेमुळे बांगलादेशात मोठा वाद निर्माण झाला होता. १९९० च्या दशकात या संस्थांनी राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक समूहांसोबत विविध प्रशिक्षण आणि कार्यशाळांचे बांगलादेशात आयोजन केले आहे. ढाकाच्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या संस्था लोकशाही मजबूत करण्याचा दावा करत आहेत, परंतु युक्रेन. सर्बिया व्हेनेझुएला आणि म्यानमार यांसारख्या देशांमध्ये या संस्थांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
या संस्थांना मिळणारा निधी हा अमेरिकेन काँग्रेसमार्फत नॅशनल एंडाउमेंट फॉर डेमोक्रसी (NED) आणि USAID कडून दिला जातो. पण त्यांच्या कार्यावर पूर्णपण अमेरिकेचा राजकीय प्रभाव आहे, यामुळे अनेक तज्ज्ञांच्या मते, बांगलादेशात अमेरिका आपला प्रभाव वाढण्यासाठी त्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करत आहे.
शेख हसीना यांना हटवण्यात अमेरिकेचा डाव?
शिवाय बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) यांनीबी अनेकदा, त्यांना सत्तेवरुन हटवण्यात अमेरिकेचा हात असल्याचा आरोप केला आहे. २०२४ ऑगस्टमध्ये शेख हसीना विरोधात बांगलादेशात तीव्र आंदोलन सुरु झाले होते. यावेळी त्यांच्या रहिवासी घरावर हल्ला करण्यात आला होता. यामुळे हसीना यांना देश सोडून जावे लागले होते.
दरम्यान हसीना यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने या खेळीत अमेरिकेला साथ दिली आहे. CIA च्या इशाऱ्यावरच हसीना सरकार उलथवण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच बांगलादेशचे माजी गृहमंत्री असादुज्जमान खान कमाल यांनी देखील असाच आरोप केला आहे.
सध्या या घडामोडींमुळे बांगलादेशच्या आगामी निवडणूकांपूर्वीच राजकीय तणाव निर्माण झाला आहे. यामुळे आता बांगलादेशसाठी येते काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या सगळ्यांचे लक्ष बांगलादेशातील राजकीय घडामोडींकडे लागले आहे.
प्रश्न १. अमेरिकेवर बांगलादेश राजकीय तज्ज्ञांनी आणि नागरिकांनी काय आरोप केला आहे?
अमेरिकेवर बांगलादेशातील राजकीय तज्ज्ञ आणि नागरिकांनी अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे.
प्रश्न २. अमेरिकेने बांगलादेशात कोणत्या संस्था सुरु केल्या आहेत?
अमेरिकेने बांगलादेशात गैर-सरकारी संस्था, इंटरनॅशनल रिपल्बिकन इन्स्टिट्यूट(IRI) आणि नॅशन डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूट (NDI) पुन्हा एकदा सुरु केल्या आहेत.
प्रश्न ३. काय आहे बांगलादेशात संस्था पुन्हा सुरु करण्यामागाचा हेतू?
बांगलादेशात पुन्हा स्वयंसेवी संस्था सुरु करण्याचा उद्देश बांगलादेशातील लोकशाही मजबूत करणे आणि निवडणुकांची पारदर्शकता वाढवणे आहे.






