Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : तेहरान विमानतळावर स्फोट, तेल अवीवमध्ये हल्ला… रात्रभर इस्रायल आणि इराणमध्ये क्षेपणास्त्र वर्षाव

Israel Iran War : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून दोन्ही देशांनी एकमेकांवर थेट क्षेपणास्त्र हल्ले चढवले आहेत. इराण इस्राइल युद्धसंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 14, 2025 | 11:57 AM
Tehran airport blast Tel Aviv hit overnight missile strikes rock Iran & Israel 10 key updates

Tehran airport blast Tel Aviv hit overnight missile strikes rock Iran & Israel 10 key updates

Follow Us
Close
Follow Us:

Israel Iran War : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून दोन्ही देशांनी एकमेकांवर थेट क्षेपणास्त्र हल्ले चढवले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी ( दि 13 आणि 15 जून 2025 ) सकाळपर्यंत अनेक हल्ल्यांची मालिका घडली असून, या संघर्षामुळे संपूर्ण पश्चिम आशिया प्रदेशातील शांतता धोक्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी आक्रमकता गाठलेली असताना, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना त्वरित युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, इस्रायलच्या महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्रवर्षाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

महत्त्वाच्या 10 घडामोडी – एक झलक:

१. इराणी क्षेपणास्त्रांचा तेल अवीव-येरुशलेमवर मारा :

शनिवारी पहाटे इस्रायलच्या तेल अवीव आणि येरुशलेम या दोन प्रमुख शहरांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. इराणकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा हल्ला करण्यात आला, त्यातील बहुतांश क्षेपणास्त्रे इस्रायली संरक्षण प्रणालीने रोखली, मात्र काही क्षेपणास्त्रे तेल अवीवमध्ये कोसळली.

२. जीवितहानीबाबत इस्रायल मौन, मदत कार्य सुरू :

इस्रायलने अद्याप हल्ल्यामुळे झालेल्या जीवितहानीबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, तेल अवीवमध्ये आपत्कालीन बचाव पथके कार्यरत असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

३. इस्रायलचा इशारा: ‘लाल रेषा ओलांडली’

इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव्ह गॅलंट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, इराणने नागरी वस्तीवर क्षेपणास्त्रे डागून लाल रेषा ओलांडली आहे. याचे तीव्र परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी सूचित केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : ‘जो कोणी इस्रायलसोबत आहे तो आमचा निशाणा’, इराणचा अमेरिकेसह जगाला थेट इशारा; चीनचाही संताप

४. इस्रायलचे प्रत्युत्तर: तेहरान विमानतळाजवळ स्फोट :

इस्रायलनेही शनिवारी सकाळी इराणवर प्रत्युत्तरादाखल हल्ला चढवला. तेहरान विमानतळ परिसरात स्फोट झाले, तसेच ड्रोनद्वारे हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

५. खामेनी यांच्या निवासाजवळ इस्रायली ड्रोन पाडला :

इराणच्या राजधानीत अयातुल्ला खामेनी यांचे निवासस्थान आणि राष्ट्रपतींच्या निवासाजवळ इस्रायली ड्रोन दिसून आला, जो इराणच्या हवाई संरक्षण प्रणालीने पाडला.

६. इराणचा तिसरा हल्ला सुरू :

शनिवारी सकाळी इराणने हल्ल्यांचा तिसरा टप्पा सुरू केला असून, अनेक क्षेपणास्त्रे व ड्रोन इस्रायलकडे पाठवले जात आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

७. युद्धाची ठिणगी: इस्रायली हल्ल्याने पेटला संघर्ष:

या तणावाची सुरूवात शुक्रवारी रात्री इस्रायलच्या हल्ल्याने झाली. इस्रायलने इराणच्या अणुशास्त्रज्ञ, लष्करी तळ, व कमांड सेंटरवर हल्ला चढवला, ज्यामुळे इराणने उग्र प्रतिक्रिया दिली.

८. व्यापक युद्धाचा धोका :

या दोन्ही देशांच्या हल्ल्यांमुळे गाझा, सीरिया, लेबनॉन व येमेनमध्येही तणाव वाढला आहे. त्यामुळे, पश्चिम आशियात व्यापक युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

९. अणुस्थळेही लक्ष्य :

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवरही हल्ले केले, तर इराणने तेल अवीवमध्ये अचूक क्षेपणास्त्र मारा केला, ज्यामुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे.

१०. संयुक्त राष्ट्रांचे आवाहन :

यूएन सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना त्वरित शस्त्रसंधीचे आवाहन केले आहे. “युद्ध सुरू राहिल्यास त्याचा फटका संपूर्ण जगाला बसेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ईरानचा तेल अवीववर जोरदार क्षेपणास्त्र हल्ला; इस्रायलच्या ‘Multilayer Air Defense System’ला भेदण्याची यशस्वी चाल

जागतिक शांततेला गंभीर आव्हान

इस्रायल-इराण संघर्षाचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. दोन्ही देश अणुशक्तिसज्ज असून, त्यांच्यातील थेट युद्ध जागतिक शांततेला गंभीर आव्हान ठरू शकते. या परिस्थितीत त्वरित शांततामध्ये तोडगा न निघाल्यास पश्चिम आशिया दहशत, अस्थिरता आणि मानवी हानीच्या खाईत लोटला जाऊ शकतो. जगभरातील नेत्यांनी आता युद्ध थांबवण्यासाठी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.

Web Title: Tehran airport blast tel aviv hit overnight missile strikes rock iran israel 10 key updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • international news
  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह
1

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?
2

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

भारत रशियाला मोठा धक्का देणार? ‘या’ आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी
3

भारत रशियाला मोठा धक्का देणार? ‘या’ आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी

म्यानमार गृहयुद्ध भीषण वळणावर; लढाऊ विमानांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी
4

म्यानमार गृहयुद्ध भीषण वळणावर; लढाऊ विमानांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.