Terrible accident in African country Congo 50 people dead, 100 missing after boat capsizes in river
ब्राझाव्हिल:आफ्रिकन देश कॉंगोच्या वायव्य भागात बोटीला आग लागल्याने बोट उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या बोटीवर किमान 400 प्रवासी होते. या घटनेत अनेक लोक बेपत्ता झाले असून त्यांच्या बचावासाठी शोधकार्य सुरु आहे. पोलिस आणि बचाव पथक लोकांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तसेच आगीत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (16 एप्रिल 2025) रात्री उशिरा ही घटना घडली. या बोटीचे नाव ‘एचबी कोंगोलो’ असे असून ती मतानकुमु बंदरातून बोलोम्बा क्षेत्राच्या दिशेने निघाली होती. मात्र मबंडाका शहराजवळ बोटीला अचानक आग लागली आणि ही भयानक दुर्घटना घडली.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी एक महिला बोटीत अन्न बनवत होती. याच वेळी अचानक आगीचा भडका उडाला. आग लागल्यानंतर अनेक प्रवाशांनी, विशेषतः महिला आणि लहान मुलांनी घाबरून नदीत उड्या घेतल्या, परंतु त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आले. रेड क्रॉस आणि प्रांतीय प्रशासनाच्या मदतीने पोलिस आणि बचाव पथकांनी मृतदेहांची शोधमोहीम सुरू ठेवली आहे. बुधवारीही शोधकार्य सुरु आहे. आतापर्यंत सुमारे 100 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना मबंडाका येथील टाउन हॉलमध्ये तात्पुरत्या निवाऱ्यात हलवण्यात आले आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
बोटीवर 400 लोक होते
मीडिया रिपोर्टनिसार, लाकडी मोटारी बोटीत सुमारो 400 प्रवासी होते. एचबी कोंगोलो नावाची बोचट माटनकुमु बंदरातून बोलोम्बाकडे निघाली होती. परंतु मबंडाका शहराजवळ या बोटीला आग लागली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 250 लोक अजूनही बेपत्ता आहेत सध्या त्यांचे शोधकार्य सुरु असून कोणताही ठाविकाणा लागलेला नाही.
काँगोत अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असतात. काँगोत जलमार्गच लोकांसाठी प्रवासाचे मुख्य साधन आहे. देशातील बहुतेक रस्ते खराब अवस्थेत आहेत किंवा वापरण्यासाठी योग्य नाहीत. यामुळे प्रवासासाठी नागरिक नदी प्रवासावर अवलंबून आहेत. मात्र, सरकारकडून बोटींच्या सुरक्षिततेवर दुर्लक्ष होत आहे. बोटींची तपासणी वेळवर होत नाही, तसेच अनधिकृत बोटीही मोठ्या प्रमाणावर चालवल्या जातात.गेल्या काही वर्षात काँगोत अनेक बोट अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये आतापर्यंत शएकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.