Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलवर दहशतवादी हल्ला: मोसाद मुख्यालयाजवळ ट्रकने अनेकांना चिरडले; घटनेचा तपास सुरू

इस्त्रायलमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलमध्ये दहशतवादी हल्ला झाला असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या तेल अवीव शहराजवळ एक भयानक दहशतवादी हल्ला झाला.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 28, 2024 | 10:27 AM
इस्रायलवर दहशतवादी हल्ला: मोसाद मुख्यालयाजवळ ट्रकने अनेकांना चिरडले; घटनेचा तपास सुरू

इस्रायलवर दहशतवादी हल्ला: मोसाद मुख्यालयाजवळ ट्रकने अनेकांना चिरडले; घटनेचा तपास सुरू

Follow Us
Follow Us:

जेरूसेलम: इस्त्रायलमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलमध्ये दहशतवादी हल्ला झाला असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या तेल अवीव शहराजवळ एक भयानक दहशतवादी हल्ला झाला. रमत हशारोन शहरातील बस स्थानकावर उभ्या असलेल्या 35 जणांना ट्रकने धडक दिली असून ते गंभीर जखमी झाल्याची माहिती इस्रायलच्या मॅगेन डेव्हिड अडोम रेस्क्यू सर्व्हिसने दिली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने अचानक वेगाने बसस्थानकात घुसून अनेकांना चिरडले.

हमास आणि इस्लामिक जिहादशी संबंधित दहशतवादी गटाकडून हल्ल्याचे कौतुक

मीडिया रिपोर्टनुसार, हल्ला इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादच्या मुख्यालयाजवळ घडला. यामुळे इस्त्रायल याकडे लक्ष्यदेत असून याचा तपास सुरू आहे. इस्त्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक अरब नागरिक होता आणि त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही, परंतु हमास आणि इस्लामिक जिहादशी संबंधित छोट्या दहशतवादी गटांनी या हल्ल्याचे कौतुक केले आहे.

हे देखील वाचा- इस्त्रायलचा पुन्हा एकदा उत्तरी गाझावर हल्ला; बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू

इस्त्रायली पोलिसांचे प्रवक्ते एएसआय अहारोनी यांनी मीडियाला माहिती देताना सांगितले की, हल्लेखोराला निष्प्रभ करण्यात आले आहे, मात्र तो मारला गेला आहे की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हल्ल्याच्या वेळी इस्रायली नागरिक एका आठवड्याच्या सुट्टीनंतर कामावर परतत होते. तेल अवीवच्या ईशान्येकडील रमत हशारोन शहरातील प्रमुख महामार्ग जंक्शनजवळ असलेल्या बस स्थानकावर हा हल्ला झाला.

घटनेचा तापास सुरू

या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोसाद मुख्यालयाजवळ हल्ला घडल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्रायलमध्ये अशा घटनांनी सतर्कता वाढवली आहे, आणि सुरक्षा यंत्रणांनी हल्ल्याचे पूर्ण तपास सुरु केले आहे. जखमींचे उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

अशा घटनांमुळे इस्रायलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नव्याने सामोरे जावे लागणार आहे. इस्त्रायली जनतेला या परिस्थितीचा सामना करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी लागतील.

हे देखील वाचा- गाझा रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण ओलीस; पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाचा इस्त्रायलवर आरोप

Web Title: Terror attack on israel truck attack near mossad headquarters incident is under investigation nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 10:25 AM

Topics:  

  • Israel
  • terror attack

संबंधित बातम्या

Netanyahu US Aid: ‘इस्रायल आता अमेरिकचे ‘पिल्लू’ राहणार नाही; ट्रम्पना थेट सुनावत नेतन्याहूंचे मोदींच्या पावलावर पाऊल
1

Netanyahu US Aid: ‘इस्रायल आता अमेरिकचे ‘पिल्लू’ राहणार नाही; ट्रम्पना थेट सुनावत नेतन्याहूंचे मोदींच्या पावलावर पाऊल

Israel-Turkey Conflict: इस्रायलच्या ‘त्या’ निर्णयाने तुर्कीला संताप अनावर; पहिल्या महायुद्धातील ‘या’ घटनेवरून जागतिक राजकारण तापले
2

Israel-Turkey Conflict: इस्रायलच्या ‘त्या’ निर्णयाने तुर्कीला संताप अनावर; पहिल्या महायुद्धातील ‘या’ घटनेवरून जागतिक राजकारण तापले

‘आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहा…’, कराची हल्ल्याच्या खोट्या आरोपांवर भारताने पाकिस्तानला चांगलाच बदडला
3

‘आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहा…’, कराची हल्ल्याच्या खोट्या आरोपांवर भारताने पाकिस्तानला चांगलाच बदडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.