Terrorist attack on court in Zahedan city of Iran
तेहरान : इराणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इराणच्या झाहेदान प्रांतात दहशतवादी हल्ला झाला आहे. शनिवारी (२६ जुसै) सकाळी इराणच्या झाहेदान प्रांतात न्यायिक मुख्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात ५ जणांचा मृत्यू, तर १३ जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या या घटनेने इराणमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.
इराणच्या न्यायपालिका माहिती केंद्राने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरु केला. यामुळे इराणच्या झाहेदान शहरात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात गेल्या काही काळाता दहशतवादी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जैश-अल-अदल नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली आहे. या संघटनेने आतापर्यंत इराणवर अनेकवेळा दहशतवादी कारवाया केला आहे. इराणविरोधी अतेरिक गट म्हणून या संघटनेला ओळखले जाते. झाहेदान शहरात सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात अशांतता वाढत आहेत. यामुळे इराणच्या सरकारमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान शनिवारी (२६ जुलै) झालेल्या गोळीबाराने मोठा गोंधळ उडाला आहे. तसेच नागरिकांना न्यायालयाचा परिसर रिकामा करण्यात आदेश देण्यात आले आहेत. बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी सुरक्षा दल आणि हल्लेखोरांमध्ये चकामक झाली. यामध्ये तीन हल्लेखोर कारवाईत ठार झाले आहे. सध्या इतर हल्लेखोरांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
गेल्या जून महिन्यात इराणमध्ये तीव्र संघर्ष सुरु होता. इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु झाले होते. जवळपास १२ दिवस मध्यपूर्वेत अशांतता पसरली होती. इराणच्या अणु कार्यक्रमाविरोधात इस्रायलने कारवाई केली होती. दरम्यान इस्रायलने इराणच्या अनेक अणु शास्त्रज्ञांचा आणि लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केली.
शिवाय अमेरिकेने देखील यामध्ये सहभाग घेत इराणच्या तीन प्रमुख अणु केंद्रांवर हल्ला केला होता. यामुळे इराणच्या अणु कार्यक्रमाला मोठा धक्का बसला. दरम्यान इराणने देखील इस्रायलवर हल्ले केले होते. इस्रायलच्या प्रत्येक कारवाईला इराणने प्रत्युत्तर दिले होते.