मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी; एस. जयशंकर यांनीही दिल्या शुभेच्छा (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
माले : पंतप्रधान मोदी सध्या मालदीवच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या आमंत्रणावरुन हा दौरा होत आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी शनिवारी (२६ जुलै) मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. मालदीव आज त्यांच्या स्वातंत्र्यांचा हरीक महोत्सव साजरा करत आहे. यासाठी पंतप्रधान मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले आहे. भारत आणि मालदीवचे संबंध दृढ असल्याचे यावरुन स्पष्ट होते.
पंतप्रधान मोदींनी मालदीवच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोहम्मद मुइझ्झू आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील मालदीवच्या जनेतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये, “मालदीवच्या सरकार आणि जनतेला त्यांच्या स्वातंत्र्याच्या हरीक मोहत्सवरी समारंभाबद्दल अभिनंदन. आज मला मालदीवची राजधानी माले येथे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळाले. यावेळी भारत आणि मालदीव राजनैतिक संबंधांचा ६० वर्षे साजरी करत आहे”, असे म्हटले.
तसेच त्यांनी मालदीव आणि भारताच्या हिंद महासागरातील शांततेसाठी, समृद्धीसाठी आणि स्थिरतेसाठी दोन्ही देशांच्या भागीदारीचला आणखी मजबूत करण्यासाठीच्या वचनाचा पुनरुच्चारही केला.
Congratulate the Government and the people of Maldives on the diamond jubilee celebrations of their Independence.
Honoured to join PM @narendramodi for the Independence Day celebrations in Malé today.
We celebrate 60 years of 🇮🇳 🇲🇻 diplomatic relations as well, reiterating… pic.twitter.com/HYJ69Zaypx
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) July 26, 2025
पंतप्रधान मोदी यांनी २५ जुलै रोजी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि मालदीवमधील संबंध अधिक मजबूत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
दरम्यान आज २६ जुलै रोजी मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभातही पंतप्रधान मोदी सहभागी झाले. या समारंभानंतर मालदीवचे उपराष्ट्रपती हुसेन मोहम्मग लतीफ यांचीही पंतप्रधान मोदींनी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि मालदीवचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर आणि परस्पर हितसंबंध मजबूत करण्यावर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी मोहम्मद लतीफ यांच्याशी झालेल्या चर्चेवर एक्सवर माहिती दिली.
त्यांनी म्हटले की, मालदीवचे उपराष्ट्रपती हुसेन मोहम्मद लतीफ यांच्याशी सकारात्मक आणि उपयुक्त चर्चा झाली. भारत आणि मालदीवच्या मैत्रीच्या प्रमुख मुद्यांवर ही चर्चा केंद्रित होती. दोन्ही देशांमध्ये पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, हवामान बदल, उर्जा, आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाला. येत्या काळात दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा देखील पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.