Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Terror Alert: बांगलादेश हवाई दलात ‘TTP’ची एन्ट्री? ढाका हवाई तळावर मध्यरात्री मोठे छापे; 10 जवान ताब्यात, 4 जण परदेशात फरार

Bangladesh Air Force High Alert: बांगलादेश हवाई दलात टीटीपी या दहशतवादी संघटनेच्या घुसखोरीमुळे खळबळ उडाली आहे. ढाका येथे टाकलेल्या छाप्यांदरम्यान अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 24, 2026 | 02:53 PM
terrorist infiltration in bangladesh air force 10 soldiers arrested ttp connection 2026

terrorist infiltration in bangladesh air force 10 soldiers arrested ttp connection 2026

Follow Us
Follow Us:
  • हवाई दलात दहशतवाद्यांची घुसखोरी
  • ढाका हवाई तळावर मोठे छापे
  • मोठ्या कटाचा पर्दाफाश

Bangladesh Air Force high alert 2026 : दक्षिण आशियाई राजकारणात आणि सुरक्षेच्या संदर्भात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेश हवाई दलाच्या (BAF) अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या तळांवर चक्क दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने आपली पाळेमुळे रुजवल्याचे उघड झाले आहे. या माहितीनंतर बांगलादेशातील संरक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, हवाई दलाच्या गुप्तचर विभागाने आपल्याच कर्मचाऱ्यांविरुद्ध एक मोठी शोधमोहीम राबवली आहे.

ढाका ते चितगाव: हवाई तळांवर मध्यरात्री छापेमारी

२० एप्रिलच्या पहाटे जेव्हा संपूर्ण ढाका झोपले होते, तेव्हा हवाई दलाच्या गुप्तचर विभागाने ढाका येथील किमान दोन प्रमुख हवाई तळांवर छापे टाकले. या कारवाईत २ वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून १० कनिष्ठ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. या छाप्यांदरम्यान अनेक धक्कादायक कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे हाती लागले आहेत, जे थेट दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे समजते. विशेष म्हणजे, ज्या वेळी ही कारवाई झाली, तेव्हा बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान हे मलेशियाच्या अधिकृत दौऱ्यावर होते, त्यामुळे या कारवाईचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait: कोण म्हटलं माकड इराणच्या बाजूने? होर्मुझमोहिमेवर जाणाऱ्या US Navyच्या सैनिकासोबत घडले ‘असे’ विपरीत अन् तो चक्क…

टीटीपीचे स्लीपर सेल्स आणि फरार हवाई सैनिक

गुप्तचर विभागाला संशय आहे की, हवाई दलातील काही कर्मचारी टीटीपी (TTP) च्या विचारांनी प्रेरित झाले असून ते स्लीपर सेल्स म्हणून काम करत होते. या कारवाईची कुणकुण लागताच हवाई दलातील ९ ते १० कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील ४ हवाई सैनिक आधीच पाकिस्तान, पोर्तुगाल, तुर्की आणि न्यूझीलंड सारख्या देशांत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. हे जवान कॉक्स बाजार, चिटगाव आणि जेस्सोर सारख्या संवेदनशील तळांवर तैनात होते. या जवानांनी हवाई दलाची गुप्त माहिती दहशतवाद्यांना पुरवली असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Embassy: ‘कभी इंडिया आके देखो…’ भारताला नरक’ बोलणाऱ्या ट्रम्पना इराणने दाखवली जागा; केले ‘असे’ धडाकेबाज Tweet

मोबाईल जप्ती आणि हाय अलर्ट

हवाई दलातील या ‘घरभेदी’ प्रकरणामुळे सर्वच अधिकाऱ्यांची रजा तूर्तास रद्द करण्यात आली आहे. कनिष्ठ कमिशन्ड अधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात आले आहेत की, सर्व एअरक्राफ्टमन आणि कनिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करून ते तातडीने संरक्षण मुख्यालयात जमा करावेत. या जवानांच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि कॉल रेकॉर्ड्सची कसून चौकशी केली जात आहे. टीटीपी, जी संघटना पाकिस्तानच्या लष्करावर हल्ले करण्यासाठी कुख्यात आहे, तिचा बांगलादेश हवाई दलात शिरकाव होणे ही केवळ बांगलादेशासाठीच नव्हे, तर भारतासारख्या शेजारील देशासाठीही चिंतेची बाब आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेश हवाई दलात कोणत्या दहशतवादी संघटनेचे कनेक्शन सापडले आहे?

    Ans: बांगलादेश हवाई दलातील काही जवानांचे 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) या दहशतवादी संघटनेशी संभाव्य संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे.

  • Que: या कारवाईत किती जणांना अटक करण्यात आली आहे?

    Ans: आतापर्यंत २ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून १० कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, तर १० कर्मचारी फरार आहेत.

  • Que: टीटीपी (TTP) संघटना नक्की काय आहे?

    Ans: टीटीपीला 'पाकिस्तानी तालिबान' म्हटले जाते. हा एक सशस्त्र गट असून तो पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा भागात सक्रिय आहे आणि लष्करी तळांवर हल्ले करण्यासाठी ओळखला जातो.

Web Title: Terrorist infiltration in bangladesh air force 10 soldiers arrested ttp connection 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Afghanistan taliban
  • Bangladesh
  • World news

संबंधित बातम्या

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार
1

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा
2

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता
3

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता

Mossad Agent : ‘कोसळणार विमान पुन्हा उडू लागलं…’ तो प्लंबर इस्रायली मोसादचा एजंट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
4

Mossad Agent : ‘कोसळणार विमान पुन्हा उडू लागलं…’ तो प्लंबर इस्रायली मोसादचा एजंट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.