Texas Bans Sharia law erupts anger among Muslim organizations
Texas Ban Sharia Law : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे मुस्लिम संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेक्सास राज्याने शरिया कायद्यावर बंदी आणली आहे. यामुळे मुस्लिम संघटनांमध्ये गोंधळ उडाला आहे, तसेच स्थानिक सरकारच्या या निर्णयाला विरोध केला जात आहे. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी टेक्सासमध्ये कोणत्याही प्रकारचा इस्लामिक शरिया कायदा लागू होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. एबॉट यांनी राज्यातील नागरिकांना आवाहने केल आहे की, कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने धार्मिक कायदे लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याची पोलिसांकडे किंवा टेक्सास डिपार्टमेंट ऑफ सेफ्टीकडे तातडीने तक्रार करावी.
हा निर्णय ह्यूस्टनमधून झालेल्या वादानंतर घेण्यात आला आहे. ह्यूस्टनमधून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये एका मौलवीने व्यापारांना मद्य पेय, डुकरांचे मास आणि लॉटरी तिकीट न विकण्याचे आवाहान केले होते. या व्हिडिओमुळे मुस्लिम आणि गैर-मुस्लिमांमध्ये मोठा वाद झाला होता. दरम्यान टेक्सासचे गव्हर्नर एबॉट यांनी अशा प्रराकारच्या आवानाला छळ म्हटले आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, टेक्सासमध्ये धार्मिक कायदे सार्वजनिक जीवनावर थोपवले जाणार नाही. त्यांनी सांगितले की, मी असे कायदे आधीच मंजूर केले आहे ज्यामुळे शरिया कायदा शरिया कपांउड्सवर राज्यात बंदी घालण्यात आली आहे आहे. यामुळे व्यावसायिक किंवा नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, असे एबॉट यांनी स्पष्ट केले आहे.
Charlie Kirk : चार्ली कर्क हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; खूनापूर्वी मिळाला होता सतर्कतेचा इशारा
तसेच पाहायला गेले तर अमेरिकेच्या टेक्सामध्ये स्वतंत्र शरिया बंदीचा कोणताही कायदा नाही. पण २०१७ मध्ये पास झालेल्या American Laws for American Courts या कायद्याअंतर्गत अमेरिकन न्यायालय कधीही परकीय किंवा धार्मिक कायद्यावर बंदी घालू शकतात. यामुळे अमेरिकन कायद्यांना धोका निर्माण होत असेल तर हा निर्णय घेता येतो.
मुस्लिम संघटनांमध्ये संतापाचे वातावरण
सध्या टेक्सासच्या या निर्णयामुळे मुस्लिम संघटनांनमध्ये संतापाचे वातावरण आहे. यामुळे अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स (CAIR) सारख्या मुस्लिम संघटनांनी एबॉट यांचा निर्णय दिशाभूल करणार असल्याचे म्हटले आहे. मुस्लिम संघटनांच्या मते, शरिया कायदा वैयक्तिक धार्मिक आचारांशी संबंधित आहे. नागरी कायद्यांशी नाही. यामुळे यावर बंदी घालणे आणि याला राजकीय मुद्या बनवणे हे भेदभावपूर्ण आहे.
यापूर्वी देखील झाला होता विरोध
एबॉट हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मानले जातात. त्यांनी यापूर्वी देखील इस्लामिक केंद्राच्या प्रकल्पांना विरोध केला आहे. स्थलांतर, धर्म आणि सांस्कृतिक प्रश्नांवर त्यांनी विरोधी आणि कठोर भूमिका घेतला आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये काय निर्णय घेण्यात आला आहे?
अमेरिकेच्या टेक्सामध्ये शरिया कायद्यावर बंदी घालण्यात आली आहे.
कोण घेतला हा निर्णय?
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग रॉबर्ट यांनी हा निर्णय घेतला आहे.
काय आहे शरिया कायदा?
शरिया कायदा हा इस्लामिक श्रद्धांवर आधारित आहे, ज्यामध्ये काही धार्मिक आणि सामाजिक नियम ठरण्यात आले आहेत. हा कायदा मुस्लिमांसाठी अत्यंत महत्वाचा असून त्यांना नैतिक आणि सामाजिक जीवनावर आधारित गोष्टींचे मार्गदर्शन करतो.