Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thailand Accident : थायलंडमध्ये भीषण अपघात! अल्पवयीन मुलाने यात्रेकरुंच्या अंगावर चढवला ट्रक; ८ बौद्ध भिक्षूंचा दुर्दैवी मृत्यू

Thailand Accident News : थायलंडमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. एका अल्पवयीन मुलाने बौद्ध भिक्षूंच्या समूहावर पिकअप ट्रक चढवला असून यामध्ये ८ भिक्षूंचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2026 | 04:32 PM
thailand accident 8 buddhist monks killed

thailand accident 8 buddhist monks killed

Follow Us
Follow Us:
  • थायलंडमध्ये भीषण अपघात
  • अल्पवयीन मुलाने यात्रेकरूंच्या अंगावर चढवला ट्रक
  • ८ बौद्ध भिक्षुंचा दुर्दैवी मृत्यू
Thailand Accident News in Marathi : बँकॉक : थायलंडमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. मुकदाहान प्रांतात तीर्थयात्रेसाठी पायी निघालेल्या बौद्ध भिक्षूंच्या समूहावर एका अल्पवीयन मुलाने ट्रक चढवला आहे. यामध्ये ८ भिक्षूंचा मृत्यू झाला असून ११ वर्षयी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस सध्या अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.

Venezuela Red Sky : मोठ्या संकटाचा इशारा? भूकंपानंतर रक्तासारखे लाल झाले व्हेनेझुएलाचे आकाश; नागरिकांची उडाली झोप, नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्टनुसार, थायलंडच्या मुकदाहान प्रांतात गुरुवारी(०२ जुलै) सकाळी ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. तीर्थयात्रेसाठी पायी निघालेल्या बौद्ध भिक्षूंच्या समूहाला भरधाव पिकअप ट्रकने जोरात धडक दिली. यामध्ये आठ भिक्षूंना आपले प्राण गमवावे लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अपघाताच्या वेळी ११ वर्षीय अल्पवीयन तरुण वाहन चालवत होता.

पाच जण जागीच ठार

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ बौद्ध भिक्षू धार्मिक पदयात्रेसाठी निघाले होते. ते रस्त्याच्या कडेने शिस्तबद्ध पद्धतीने चालत आपली यात्रा करत होते. यावेळी अचानक एका पिकअप ट्रकने नियंत्रण गमावले आणि थेट त्यांच्या समूहाला टक्कर दिली. अपघात एवढा भयंकर होता की पाच भिक्षूंचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सध्या १४ गंभीर जखमी झालेल्या बौद्ध भिक्षूंना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्थानिक सरकारने म्हटले. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक होण्यापूर्वी वाहनाचे नियंत्रण सुटले होते आणि ते थेट भिक्षूंच्या दिशेने गेले.

घटनेचा तपास सुरु

स्थानिक पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ११ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. अपघातावेळी त्याचा हातात वाहन कसे आले याचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून रस्ते सुरक्षेसह अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या घटनांवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक सरकार जखमींच्या उपचाराला प्राधान्य देत आहे. तसेच अपघाताचा तपासही सुरु आहे.

US Iran Negotiations : ५७,००० कोटींची मालमत्ता इराणला परत मिळणार? दोहामधील अमेरिका-इराण चर्चा यशस्वी

Web Title: Thailand accident 8 buddhist monks killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Accident
  • thailand
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.