'हा हिंदूंचा अपमान...' ; कंबोडियात भगवान विष्णूच्या मूर्तीची तोडफोड ; भारताने घेतला आक्षेप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर? हे सहा देश आमने-सामने, जाणून घ्या कोणत्या देशात पेटला संघर्ष
मिळालेल्या माहितीनुसार, थाई-कंबोडिया सीमावादग्रस्त भागात ही घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ही मूर्ती था सैनिकांनी तोडला असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र या घटनेमुळे हिंद समुदायाच्या भावानांना ठेच पोहोचली आहे.
दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाते प्रवक्त रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, थाई-कंबोडिया सैन्यात झालेल्या सीमावादात प्रभावित झालेल्या एका भागात भगवान विण्षूच्या मंदिराची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी या घटनेला अपमानजनक ठरवत यामुळे हिंदू भक्तांच्या भावान दुखावल्या गेले असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, थाई-कंबोडियातील हिंद आणि बौद्ध लोक देवतांचा मोठ्या श्रद्धेने सन्मान करतात. ही घटना अत्यंत चिंताजनक असून यामुळे धार्मिक भावनंना धक्का बसला आहे. तसेच ही घटना आशियाई देशांच्या सांस्कृति सभ्यतेवर आणि वारशावर आघात करणारी आहे, असेही जयस्वाल यांनी नमूद केले.
दरम्यान या घटनेनंतर हिंदू लोकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. तसेच भारताने थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची हिंसक कृत्य टाळावीत, संवादाच्या आणि शांततेच्या मार्गाने समस्या सोडवावी असे भारताने म्हटले आहे.
कंबोडियातील भगवान विष्णूंची ही मूर्ती २०१४ मध्ये उभारण्यात आली होती. ही प्रतिमा थायलंडच्या सीमेपासून १०० किलोमीटर अतंरावर आहे. २२ डिसेंबर रोजी ही पूर्ती पाडण्यात आली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून हिंदू लोकांनी तीव्र संताप व्यक्क केला आहे. यामुळे हिंदूच्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
याच वेळी कंबोडियातील अधिकाऱ्यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, बौद्ध आणि हिंदू समुदायाच्या अनुयायांनी पूजलेल्या प्राचीन मंदिरे आणि मूर्तींचे संरक्षण आवश्यक आहे.
थायलंड (Thailand) आणि कंबोडिात जुलैमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. यावेळी मलेशिया (Malyasia) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मध्यस्थीने द्विपक्षीय युद्धबंदी लागू करण्यात आली होती मात्र ८ डिसेंबर रोजी दोन्ही देशांत पुन्हा संघर्षाला सुरुवात झाली. तेव्हापासून दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे.
Cambodia has condemned the Thai army for demolishing a Hindu Vishnu statue in a disputed border area after more than two weeks of fighting between Cambodia and Thailand. According to Cambodian officials in Preah Vihear, the statue was built in 2014 and stood several hundred… pic.twitter.com/Epqzy6vzBk — Jacob in Cambodia 🇺🇸 🇰🇭 (@jacobincambodia) December 24, 2025
नोकरीच्या नावाखाली माानवी तस्करीचं जाळं उघड; म्यानमारमधून १२५ भारतीयांची सुटका
Ans: थाई-कंबोडिया सीमा वादात प्रभावित झालेल्या भागात भगवान विष्णूच्या मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप उसळला आहे.
Ans: भारताने भगवान विष्णूच्या मूर्ती पाडल्याच्या घटनेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ही घटना चिंताजनक आणि अत्यंत अपमानजनक असल्याचे आणि यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांना धक्का बसल्याचे भारताने म्हटले आहे.
Ans: भारताने थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची हिंसक कृत्य टाळण्याचे आणि शांततेने सीमावाद सोडवण्याचे आवाहन केले आहे.






