Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prophecy : बायबलमधील ‘नोहा’ परतला? घानामध्ये हजारो लोक Eboh Noaजवळ आश्रय घेताना दिसले, पहा VIDEO

Christmas Flood Prophecy Ghana: 25 डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस आणि पूर येण्याची भविष्यवाणी केल्यानंतर घानाच्या एका माणसाने स्वतःला आधुनिक काळातील नोहा म्हणवून घेतले आहे, तो व्हायरल होत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 25, 2025 | 01:40 PM
The Great Flood will come today Thousands of people were seen taking shelter near Eboh Noa watch the video

The Great Flood will come today Thousands of people were seen taking shelter near Eboh Noa watch the video

Follow Us
Close
Follow Us:
  • घानामधील ‘एबोह नोहा’ नावाच्या व्यक्तीने २५ डिसेंबर २०२५ रोजी जगात महाप्रलय येईल आणि सलग ३ वर्षे पाऊस पडेल असा दावा केला आहे.
  •  या संकटातून वाचण्यासाठी त्याने स्वतःला बायबलमधील ‘नोहा’ म्हणवून घेत १० मोठ्या बोटी (Arc) बांधल्या आहेत.
  •  महाप्रलयाच्या भीतीने हजारो लोक या बोटींमध्ये जागा बुक करण्यासाठी धाव घेत असून याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Eboh Noah Ghana flood prophecy 25 December 2025 : आज २५ डिसेंबर, संपूर्ण जग नाताळच्या आनंदात मग्न असताना आफ्रिकेतील घाना देशातून एक अतिशय धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी बातमी समोर येत आहे. स्वतःला ‘आधुनिक काळातील नोहा’ (Modern-day Noah) म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीने आज पृथ्वीवर महाप्रलय येईल, अशी भविष्यवाणी केली आहे. या दाव्याने घानामध्ये इतकी दहशत पसरली आहे की, हजारो लोक आपलं घरदार सोडून या व्यक्तीने बांधलेल्या बोटींमध्ये आश्रय घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

कोण आहे हा ‘आधुनिक नोहा’ आणि त्याचा दावा काय?

सुमारे ३० वर्षांचा हा तरुण स्वतःला ‘एबोह नोहा’ किंवा ‘एबो येशू’ असे म्हणवतो. त्याने दावा केला आहे की, देवाने त्याला दृष्टांत दिला असून २५ डिसेंबर २०२५ पासून पृथ्वीवर मुसळधार पाऊस सुरू होईल. हा पाऊस एखादा दिवस नाही, तर सलग ३ वर्षे चालणार आहे, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी जलमय होईल. बायबलमधील नोहाच्या कथेची पुनरावृत्ती होणार असल्याचा त्याचा दावा असून, केवळ त्याच्या बोटीत बसणारे लोकच जिवंत राहतील, असे तो सांगत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tarique Rahman: 17 वर्षांनंतर ‘डार्क प्रिन्स’चे मायदेशी पुनरागमन; बांगलादेशात बदलाचे वारे, भारतासाठी आशा की धोक्याची घंटा?

१० जहाजांचा ताफा आणि ‘ऍडव्हान्स’ बुकिंग

एबोह नोहाने गेल्या काही महिन्यांपासून अतिशय वेगाने १० मोठ्या बोटी बांधल्या आहेत. या बोटींचे स्वरूप बायबलमधील ‘नोहाच्या जहाजा’सारखे (Noah’s Ark) आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये दिसत आहे की, लोक घाबरलेले आहेत आणि या बोटींमध्ये आपली जागा सुरक्षित करण्यासाठी धावपळ करत आहेत. काहींनी तर या बोटीत राहण्यासाठी आगाऊ पैसे देऊन जागा बुक केल्याचेही वृत्त आहे. एबोह म्हणतो की, “देवाने मला हे जहाज बांधण्याचा आदेश दिला जेणेकरून मी माझ्या अनुयायांना वाचवू शकेन.”

Ebo Noah, a man in Ghana people there call a “prophet,” is building arks to save humanity from a flood. This extinction level catastrophe is said to be happening tomorrow, December 25, 2025. People in Ghana are flocking to the arks in anticipation of the flood. pic.twitter.com/TePpSRjshv — Kentucky Girl (@Notwokenow) December 24, 2025

credit : social media and Twitter

३० वर्षांपूर्वीचा इशारा आणि ऑगस्टचा व्हिडिओ

एबोह नोहा याने ऑगस्ट २०२५ मध्ये पहिल्यांदा ‘काय होईल आणि कसे होईल’ या शीर्षकाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. तेव्हापासून तो सतत २५ डिसेंबरच्या विनाशाबद्दल लोकांना सावध करत आहे. त्याच्या मते, ख्रिसमसच्या दिवशी सुरू होणारा हा पाऊस मानवी इतिहासातील सर्वात मोठा विनाशकारी पाऊस असेल. जरी शास्त्रज्ञ आणि हवामान खात्याने अशा कोणत्याही महाप्रलयाची शक्यता फेटाळली असली, तरी स्थानिक लोकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL

अंधश्रद्धा की भीती? तज्ज्ञांचे मत

जगभरातून या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक याला निव्वळ अंधश्रद्धा आणि भीतीचे राजकारण म्हणत आहेत, तर काही जण निसर्गाच्या वाढत्या कोपाकडे पाहून घाबरलेले आहेत. बायबलनुसार, नोहाने ४० दिवस आणि ४० रात्री चाललेल्या महाप्रलयापासून जगाला वाचवले होते. आता एबोह नोहाचा हा दावा किती खरा ठरतो की ही केवळ एक अफवा ठरते, हे आजच्या दिवसाच्या अखेरीस स्पष्ट होईल. तरीही, हजारो लोकांचा जीव धोक्यात घालून बोटींमध्ये झालेली ही गर्दी चिंतेचा विषय बनली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एबोह नोहाने २५ डिसेंबर २०२५ साठी काय भविष्यवाणी केली आहे?

    Ans: एबोह नोहाचा दावा आहे की २५ डिसेंबर २०२५ रोजी महाप्रलय येईल आणि पृथ्वीवर सलग ३ वर्षे पाऊस पडेल.

  • Que: लोकांनी बोटींमध्ये आश्रय का घेतला आहे?

    Ans: प्रलयापासून वाचण्यासाठी एबोह नोहाने १० मोठी जहाजे बांधली आहेत, त्यात बसूनच प्राण वाचतील या विश्वासाने लोकांनी तिथे गर्दी केली आहे.

  • Que: एबोह नोहा कोण आहे?

    Ans: तो घानाचा एक रहिवासी आहे, जो स्वतःला देवाने पाठवलेला आधुनिक नोहा मानतो आणि विनाशाची चेतावणी देत आहे.

Web Title: The great flood will come today thousands of people were seen taking shelter near eboh noa watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • Flash floods
  • Flood situation
  • international news

संबंधित बातम्या

Adani Power: PM Modi यांचा एक इशारा आणि बांग्लादेशात होईल अंधारमय; भारताविरुद्ध विष ओकले तर भोगावे लागतील ‘असे’ परिणाम
1

Adani Power: PM Modi यांचा एक इशारा आणि बांग्लादेशात होईल अंधारमय; भारताविरुद्ध विष ओकले तर भोगावे लागतील ‘असे’ परिणाम

Atal Jayanti: 101व्या जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त लखनौ ‘अटलमय’; PM मोदींच्या हस्ते 230 कोटींच्या ‘राष्ट्र प्रेरणा स्थळा’चे  लोकार्पण
2

Atal Jayanti: 101व्या जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त लखनौ ‘अटलमय’; PM मोदींच्या हस्ते 230 कोटींच्या ‘राष्ट्र प्रेरणा स्थळा’चे लोकार्पण

Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL
3

Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL

India Sri-Lanka Ties : शेजारधर्म! जयशंकर दौऱ्यावर, संकटकाळात भारतच मदतीला येतो; श्रीलंकेला 45 कोटी डॉलर्सची मदत
4

India Sri-Lanka Ties : शेजारधर्म! जयशंकर दौऱ्यावर, संकटकाळात भारतच मदतीला येतो; श्रीलंकेला 45 कोटी डॉलर्सची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.