Three US police officers killes, two injuredd in Pennsylvania shooting
America Firing news marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत गोळीबाराची (America Firing) धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण पेनसिल्व्हेनियात पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ३ पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हल्लेखोरही ठार झाला आहे. पेनसिल्व्हेनियाच्या नॉर्थ कोरोडस टाऊनशिपमध्ये बुधवारी (१७ सप्टेंबर) ही घटना घडली. सध्या या गोळीबाराला तीव्र निषेध केला जात असून शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिलाडेल्फियापासून १८५ किलोमीटर अंतरावर मेरीलॅंड परिसरात ही घटना घडली. पोलिस घरगुती वादाची चौकशी सुरु करत होते. यावेळी त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. यामध्ये तीन अधिकारी ठार झाले, तर दोन जखणी झाले आहेत. तर पोलिसांनी देखील हल्लेखोराला प्रत्युत्तरात ठार केले आहे.
मात्र घरगुती वाद कोणत्या कारणावरुन सुरु होता हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच हल्लेखोराची आणि मृत पोलिसांची ओळख देखील अधिकृत करण्यात आलेले नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून यावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. या घटनने संपूर्ण पेनसिल्व्हेनिया हादरला आहे.
US Firing : अमेरिकेच्या डेन्व्हर शहरातील शाळेत गोळीबाराचा थरार ; हल्ल्यात ३ विद्यार्थ्यी गंभीर जखमी
याच वेळी पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर यांनी याघटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जोश शापिरो यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, काऊंटी आणि देशाची सेवा करताना पोलिसांनी आपला जीव गमवला, या तीन अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल आम्हाला तीव्र दु:ख आहे. हे एक मोठे नुकसान असून अशा प्रकारची हिंसा अस्वीकार्य आहे. समाज म्हणून आपल्याला चांगले काम करण्याची अधिक गरज आहे.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच वेळी FBI आणि इतर संघीय संस्थांनी या घटनेवर तपासही सुरु केला आहे. यामुळे घटने मागील कारण समजू शकेल. या घटनेमुळे स्थानिक पोलिस आणि समुदायात शोकाकाळ पसरली आहे. तसेच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही काळात अमेरिकेत (America) गोळीबाराच्या घटनांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. यामुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या डेन्व्हर शहरात एका शाळेत अदांधुंद गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये ३ विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. या वाढत्या घटनांममुळे गेल्या ५० वर्षात १५ लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत.
अमेरिकेत कुठे आणि कधी घडला गोळीबार?
अमेरिकेच्या दक्षिण पेनसिल्व्हेनियाच्या नॉर्थ कोरोडस टाऊनशिपमध्ये बुधवारी १७ सप्टेंबर रोजी गोळीबाराची घटना घडली.
अमेरिकेत गोळीबारात कोणती जीवितहानी झाली का?
अमेरिकेतील दक्षिण पेनसिल्व्हेनियाच्या गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू झाला असून दोन जखमी झाले आहेत, तसेच हल्लेखोराला जागीच ठार करण्यात आले आहे.
काय आहे पेनसिल्व्हेनियातील गोळीबाराचे कारण?
पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार, एका घरगुती वादाची चौकशी सुरु होती. यावेळी त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला, पण अद्याप गोळीबाराचे कारण अस्पष्ट आहे.
अमेरिकेत पुन्हा रक्तपात! दक्षिण व्हर्जिनियात अंदाधुंद गोळीबार; अनेक अधिकारी जखमी