US Firing : अमेरिकेच्या डेन्व्हर शहरातील शाळेत गोळीबाराचा थरार ; हल्ल्यात ३ विद्यार्थ्यी गंभीर जखमी
America School Firing News : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या (America) डेन्व्हर शहरात एक दु:खद घटना घडली आहे. एका शाळेत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात ३ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. जेफरसन काऊंटी विभागाच्या प्रवक्त्या जॅकी केली यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डेन्व्हरच्या शहरात एव्हरग्रीन हायस्कूल मध्ये घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
जखमींना रुग्णालयात दाखल
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थ्यांना कोरोरॅडोच्या लेकवुडमधील सेंट अँथनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु तिन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या गोळीबारामध्ये हल्लेखोरही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
Charile Kirk : ‘गुन्हेगारांना सोडणार नाही…’ ; चार्ली कर्कच्या हत्येवर संतापले डोनाल्ड ट्रम्प
घटनेचा तपास सुरु
स्थानिक माध्यमांनी हल्लेखोर एव्हरग्रीन शाळेचा विद्यार्थी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे हल्लेखोर जखमी कसा झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. शिवाय पोलिसांनी देखील गोळीबार केल नव्हता, असा दुजोरा जॅकी केली यांनी दिला. सध्या या घटनेचा तापस सुरु करण्यात आला आहे. परंतु हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट आहे.
विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण
सेंट अँथनी रुग्णालयाच्या CEO केविन कलिनन यांनी विद्यार्थ्यींची स्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरलेली आहे. स्थानिक पोलिसांनी इतर मुलांच्या सुरक्षेसाठी दुसऱ्या शाळेत पाठवले आहे. या घटनेमुळे पालक आणि मुले अत्यंत घाबरले असल्याचे जॅकी केली यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्याची हत्या
दरम्यान या हल्ल्यापूर्वी बुधवारी (१० सप्टेंबर) ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची हत्या करण्यात येत आहेत. चार्ली कर्क युवा संघटना टर्निंग पॉइंट यूएसएचे सह-संस्थापक आणि सीईओ होते. एका कार्यक्रमात ते भाषण देत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. या घटनेने अमेरिकेत गोंधळ उडाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला. तसेच त्यांनी कर्क यांच्या हत्येत सहभागी असलेल्या लोकांना कडक शिक्षा दिली जाईल असेही स्पष्ट केले.
अमेरिकेत गोळीबारच्या वाढत्या घटना
गेल्या काही महिन्यात अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या महिन्यात दक्षिण मिनियापोलिसमध्ये कॅथोलिक प्रार्थनेच्या वेळी देखील गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला होता, तर २१ जण जखमी झाले होते. आतापर्यंत यामुळे अनेक लोकांचा बळी गेला आहे. गेल्या ५० वर्षात १५ लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत. अमेरिकेत लहान शस्त्र खरेदीसाठी किमान वय वर्षे १८ आणि इतर शस्त्रांसाठी २१ वर्षे आहे. यामुळे अमेरिकेत जवळपास अनेक लोकांकडे बंदूका आहेत अशा परिस्थिती अमेरिकेत गोळीबाराच्या (America Firing) घटना आता सामान्य झाल्या आहेत.
अमेरिकेत कुठे घडली गोळीबाराची घटना?
अमेरिकेमध्ये डेन्व्हर शहरात एव्हरग्रीन हायस्कूल गोळीबराची घटना घडली आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
अमेरिकेतील शालेय गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली का?
अमेरिकेतील डेन्व्हर शहरात झालेल्या शालेय गोळीबारा ३ विद्यार्थी जखमी झाले आहेत, तसेच हल्लेखोरही जखमी झाला आहे, सुदैवाने कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही.
काय आहे हल्ल्यामागचे कारण?
डेन्व्हर शहराच्या प्रवक्त्या जॅकी हेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबाराच्या मागे कारण सध्या अस्पष्ट असून घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या; भर कार्यक्रमात झाला हल्ला